Thursday, September 10, 2026

Sanjay Dutt Controversy : ‘जय महाराष्ट्र’ म्हणत संजय दत्तचा प्रताप सरनाईकांना फोन; मराठी भाषेबाबतच्या वक्तव्याबद्दल व्यक्त केली दिलगिरी

Sanjay Dutt Controversy : ‘जय महाराष्ट्र’ म्हणत संजय दत्तचा प्रताप सरनाईकांना फोन; मराठी भाषेबाबतच्या वक्तव्याबद्दल व्यक्त केली दिलगिरी

ठाणे : ठाण्यातील संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडी सोहळ्यात अभिनेता संजय दत्तने केलेल्या मराठी भाषेसंदर्भातील वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा झाल्यानंतर त्याने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना फोन करून स्पष्टीकरण दिल्याची माहिती समोर आली आहे. “प्रताप भाई, जय महाराष्ट्र…” अशी मराठीतून सुरुवात करत संजय दत्तने दहीहंडीच्या कार्यक्रमात केलेली टिप्पणी ही केवळ मस्करी होती, असे स्पष्ट केल्याचे सांगण्यात येत आहे. (Sanjay Dutt Controversy)

प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठानची ठाण्यातील दहीहंडी महाराष्ट्रातील प्रसिद्ध दहीहंडींपैकी एक मानली जाते. यंदाच्या सोहळ्याला संजय दत्त, सुनील शेट्टी आणि क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव यांच्यासह अनेक सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांनी उपस्थिती लावली होती. (Sanjay Dutt Controversy)

कार्यक्रमादरम्यान संजय दत्तने, “प्रताप भाई, मी सहा वर्षे येरवडा जेलमध्ये राहिलो, तरी मला मराठी शिकता आली नाही,” असे वक्तव्य केले होते. त्यानंतर या वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा झाली. काहींनी त्यावर टीका करत मराठी शिकण्याची जबाबदारी केवळ रिक्षा-टॅक्सी चालकांचीच आहे का, असा सवाल उपस्थित केला होता. (Sanjay Dutt Controversy)

या पार्श्वभूमीवर संजय दत्तने प्रताप सरनाईक यांच्याशी फोनवरून संवाद साधल्याचे सांगितले जात आहे. “माझ्या बोलण्यामुळे चुकीचा संदेश गेला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. मी केवळ मस्करी करत होतो. मला चांगली मराठी येते,” असे त्याने सांगितल्याचे समजते. यावेळी संजय दत्तने आपले कुटुंबीय मुंबईकर असून आपण याच मातीत वाढलो असल्याचेही म्हटले. महाराष्ट्राने आपल्याला भरभरून दिले असून, महाराष्ट्राबद्दल आपल्याला कायम आदर असल्याचे त्याने स्पष्ट केल्याची माहिती आहे.(Sanjay Dutt Controversy)

बाळासाहेब ठाकरेंचीही आठवण

या संवादादरम्यान संजय दत्तने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचीही आठवण काढल्याचे सांगण्यात येत आहे. आपल्या आणि कुटुंबीयांच्या कठीण काळात बाळासाहेब ठाकरे ठामपणे पाठीशी उभे राहिले होते, असा उल्लेख संजय दत्तने केल्याची माहिती आहे. मराठी भाषेवरील वक्तव्यावरून निर्माण झालेला वाद त्यानंतर स्पष्टीकरणामुळे शांत होण्याची शक्यता आहे. (Sanjay Dutt Controversy)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >