आले आले हो आले... गणपती बाप्पा आले! यंदा 14 सप्टेंबर 2026 पासून गणरायाच्या नामाचा गजर आणि जयघोष सर्वत्र ऐकायला मिळणार असून, भक्तांना आतुरतेने वाट पाहत असलेला गणेशोत्सव अखेर सुरू होणार आहे.

यंदा खास योग
यंदा 14 सप्टेंबर रोजी हरतालिका तृतीया आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी येत असल्याने अनेकांच्या मनात दोन्ही पूजांपैकी आधी कोणती पूजा करावी, असा संभ्रम निर्माण झाला आहे.

आधी हरतालिकेची पूजा, हरतालिका पूजेचा शुभ मुहूर्त
पुणे: गणेशोत्सवाच्या काळामध्ये, पुणेकरांना महामेट्रोकडून दिलासा मिळाला आहे. मुंबई- पुण्यामध्ये गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी ...
पंचांगानुसार 14 सप्टेंबर रोजी सकाळी 7:06 वाजेपर्यंत तृतीया तिथी असल्याने सकाळच्या वेळेत हरतालिका व्रताची आणि शिव-पार्वतीची पूजा करणे योग्य मानले जाते. हरतालिका पूजेसाठी 14 सप्टेंबर रोजी सकाळी 6:05 ते 7:06 हा शुभ काळ सांगण्यात आला असून, या वेळेत महिलांनी व्रत आणि पूजेचे विधी पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे.

त्यानंतर गणपतीची स्थापना

सकाळी 7:06 वाजता गणेश चतुर्थीची तिथी सुरू झाल्यानंतर गणपती बाप्पाच्या स्थापनेचा मार्ग मोकळा होतो आणि पंचांगानुसार सकाळी 11:16 ते दुपारी 1:43 हा गणपती स्थापना आणि पूजेसाठी शुभ मुहूर्त आहे.
योग्य पूजा क्रम कोणता?

यामुळे 14 सप्टेंबर रोजी प्रथम हरतालिकेची पूजा आणि त्यानंतर गणपती बाप्पाची स्थापना व पूजा असा क्रम ठेवणे योग्य ठरेल, असे पंचांगानुसार सांगण्यात येते.
हरतालिका व्रताचे महत्त्व

हरतालिका व्रत हे माता पार्वती आणि भगवान शिव यांच्या उपासनेशी संबंधित असून, विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि वैवाहिक सुखासाठी, तर अविवाहित मुली चांगला जीवनसाथी मिळावा या श्रद्धेने हे व्रत करतात.
गणेश चतुर्थीचे धार्मिक महत्त्व

गणेश चतुर्थी हा भगवान श्रीगणेशांच्या जन्मोत्सवाचा सण मानला जातो आणि या दिवशी घरात गणेशमूर्तीची स्थापना करून विधिवत पूजा, आरती आणि नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा आहे. हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी आल्याने दोन्ही सणांचे धार्मिक महत्त्व कमी होत नाही, तर तिथी आणि शुभ मुहूर्त लक्षात घेऊन सकाळी हरतालिका पूजा आणि त्यानंतर मध्यान्हकाळात गणपतीची स्थापना करता येते.