मोकी (चीन) : महिला ज्युनियर आशिया कप २०२६ च्या उपांत्यपूर्व फेरीत भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाने पाकिस्तानचा तब्बल १९-० असा पराभव करत संस्मरणीय विजय मिळवला आहे. सामन्याच्या चारही क्वार्टर्समध्ये जबरदस्त आक्रमक खेळ करत भारताने हा एकतर्फी सामना गाजवला आणि स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली.(Junior Women's Asia Cup 2026)
नवी दिल्ली : पाच वेळा विश्वचषक विजेता असलेला ब्राझीलचा फुटबॉल संघ ३ ऑक्टोबर २०२६ रोजी कोलकाता येथील विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर भारताविरुद्ध ...
पहिल्याच क्वार्टरपासून भारताचे आक्रमक वर्चस्व
११ व्या मिनिटाला तनुश्री दिनेश काडूने गोल केला, तर १३ व्या मिनिटाला पाकिस्तानने सर्कलमध्ये फाऊल केल्यामुळे मिळालेल्या पेनल्टी स्ट्रोकवर सुखवीर कौरने सहज गोल नोंदवला. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच सानिका चंद्रकांत मानेने आणखी एक फील्ड गोल करत पहिल्या क्वार्टरच्या अखेरीस भारताला ५-० अशी भक्कम आघाडी मिळवून दिली.(Junior Women's Asia Cup 2026)
Mumbai : गणेशोत्सवाच्या काळात क ...
दुसऱ्या आणि तिसऱ्या क्वार्टरमध्ये गोलचा पाऊस
भारताच्या गोल करण्याची ही मालिका दुसऱ्या क्वार्टरमध्येही अखंड सुरू राहिली.
-
१६ वे मिनिट: मधू सिदार (गोल - ६-०)
-
१८ वे मिनिट: गीता यादव (गोल - ७-०)
-
२३ वे मिनिट: सानिका माने (तिचा दुसरा गोल - ८-०)
-
२५ वे मिनिट: तनुजा टोप्पो (गोल - ९-०)
-
२७ वे मिनिट: पूजा मलिक (पेनल्टी कॉर्नरवर गोल - १०-०)
शेवटच्या क्वार्टरमध्येही गोलचा सिलसिला कायम
सामन्याच्या अखेरच्या चौथ्या क्वार्टरमध्ये भारतीय खेळाडूंनी आणखी सहा गोल करत पाकिस्तानच्या गोलपोस्टवर आक्रमण सुरूच ठेवले.
-
४८ वे मिनिट: कृष्णा शर्मा (१४-०)
-
४९ व ५१ वे मिनिट: पूजा मलिकने लागोपाठ दोन गोल करत आपली शानदार हॅट-ट्रिक पूर्ण केली (१६-०).
-
५४ वे मिनिट: सुप्रियाने पेनल्टी कॉर्नरवर आपला दुसरा गोल केला (१७-०).
-
५५ वे मिनिट: बिनिमा धन (१८-०).
-
६० व्या मिनिटाला: रोशनी ऐंदने आपल्या दुसऱ्या आणि संघाच्या १९ व्या गोलसह सामन्याची सांगता केली.
मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी अत्यंत लोकप्रिय ठरलेली 'मोदी एक्सप्रेस' शुक्रवारी रवाना होणार आहे. सिंधुदुर्गचे पालकमंत्री ...
आकडेवारीतून भारताचे एकतर्फी वर्चस्व
या सामन्याची आकडेवारी भारताच्या परिपूर्ण वर्चस्वाची साक्ष देते. संपूर्ण सामन्यात भारताने एकूण १९ गोल नोंदवले, १८ पेनल्टी कॉर्नर आणि १ पेनल्टी स्ट्रोक मिळवला. याउलट, संपूर्ण सामन्यात पाकिस्तानच्या संघाला एकही गोल करता आला नाही, तसेच त्यांना एकही पेनल्टी कॉर्नर किंवा पेनल्टी स्ट्रोकचे रूपांतर गोलमध्ये करता आले नाही. या दणदणीत विजयामुळे भारतीय संघाने महिला ज्युनियर आशिया चषकाच्या उपांत्य फेरीत आपले स्थान अत्यंत मजबूत केले आहे.(India 19-0 Pakistan)





