Appleचा मोठा धमाका! iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max कितीला मिळणार? किंमत पाहून धक्का बसेल!
September 10, 2026 12:25 PM
मुंबई: iPhone प्रेमी गेल्या अनेक दिवसांपासून ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, अखेर तो क्षण येऊन ठेपला. काल (09 सप्टेंबर- बुधवारी) रात्री iPhone 18 Pro, iPhone 18 Pro Max आणि iPhone Duo असे तीन फोन लॉन्च झाले आहेत. सध्या ह्या तिन्हीही मोबाईल्सची आयफोन युजरमध्ये प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकांमध्ये या फोनच्या किंमतीची तुफान चर्चा सुरू आहे. जर तुम्ही सुद्धा नवीन आयफोन घेण्याच्या तयारीत असाल तर एकदा किंमत नक्की पाहा.
कुपर्टिनो (कॅलिफोर्निया) येथील प्रसिद्ध 'स्टीव्ह जॉब्स थिएटर'मध्ये ॲपलच्या भव्य सोहळ्याची पूर्ण तयारी झाली आहे. आज रात्री भारतीय वेळेनुसार १०:३० ...
ॲपलने iPhone 18 Pro, iPhone 18 Pro Max आणि iPhone Duo असे तीन मोबाईल लॉन्च केले आहेत. नवीन iPhone Pro मॉडेल्समध्ये कॅमेरा, प्रोसेसर आणि एआयमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. पण अशातच सर्वाधिक चर्चा होतेय ती, iPhone च्या किंमतींची... भारतात, iPhone 18 Pro ची किंमत 1,64,900 रूपयांपासून सुरू होत आहे, तर iPhone 18 Pro Max ची किंमत 1,79,900 रूपयांपासून सुरू होत आहे. तर, भारतात iPhone Duoची सुरुवातीची किंमत 2,99,900 रूपयांपासून आहे. ॲपलने आता iPhone 18 Pro सिरीजमध्ये नवीन A20 Pro चिपचा समावेश केला आहे.
कंपनीच्या मते, हा नवीन प्रोसेसर सुधारित कार्यक्षमता आणि एआय (AI) क्षमता प्रदान करेल. या नवीन आयफोनमध्ये Apple Intelligence च्या फिचर्सचाही समावेश असणार आहे. iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max मध्ये 48 मेगापिक्सेलचा Fusion Main कॅमेरा आहे. हा कॅमेरा व्हेरिएबल ॲपर्चरलाही सपोर्ट करतो. याव्यतिरिक्त, 6.3 इंचाचा प्रोमोशन 120 हर्ट्झ डिस्प्ले मिळतोय. यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या लाईटिंग कंडिशन्समध्ये फोटोज् कॅप्चर करण्यासाठी मदत होऊ शकते. जर तुम्ही फोटोग्राफीसाठी फोन घेण्याच्या विचारात असाल, तर तुमच्यासाठी हा फोन खास असेल. यामध्ये तुम्हाला अनेक नवीन फिचर्स अनुभवायला मिळणार आहेत.
नवी दिल्ली : कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रातील जगातील आघाडीची कंपनी 'ओपनएआय'ने (OpenAI) आपले नवीन आणि प्रगत इमेज जनरेशन मॉडेल 'चॅटजीपीटी इमेजेस २.५' (ChatGPT Images 2.5) ...
नवीन iPhone Pro मॉडेल्सच्या डिझाइनमध्येही बदल करण्यात आले आहेत. सेल्फी कॅमेरापूर्वी मोठा होता, पण आता त्याची डिझाईन पूर्वीपेक्षा लहान करण्यात आली आहे. आयफोनने मॉडेलमध्ये नवीन रंगांचे पर्यायही सादर केले आहेत. या वेळी बरगंडी रंग विशेषतः लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे. सर्व आयफोनच्या किंमतींमध्ये स्टोरेजप्रमाणे वाढ होत जाणार आहे. ॲपलकडून दरवर्षी सुद्धा या वर्षी सुद्धा आयफोनच्या किंमती प्रीमियम सेगमेंटमध्ये ठेवल्या आहेत. ॲपलने म्हणण्यानुसार, iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max साठी प्री-बुकिंग 12 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. तर, दोन्हीही फोनची विक्री 18 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. इतकी किंमत असतानाही आयफोन लव्हर या नवीन iPhone Pro मॉडेल्सला कसा प्रतिसाद देतायत, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.