Saturday, November 28, 2026

10,000 mAh बॅटरीचा महाधमाका! Realme 17 Pro चा लूक लिक, पण चार्जिंग आणि कॅमेऱ्यात मोठा झटका?

तब्बल 10,000 mAh क्षमतेच्या बॅटरीसह येणाऱ्या Realme 17 Pro चे फोटोज् लिक झाले असून, या फोनमुळे सर्वांचेच लक्ष वेधलेय. 144 Hz AMOLED डिस्प्ले, MediaTek Dimensity 7300 प्रोसेसर आणि बदललेल्या कॅमेरा डिझाइनसह येणाऱ्या या फोनमध्ये चार्जिंग स्पीड आणि सेल्फी कॅमेऱ्यामध्ये काही प्रमाणात बदल केले जाण्याची शक्यता आहे.

मुंबई: ज्यांना मोठ्या प्रमाणावर मोबाईल वापरण्याची सवय असते, ज्यांची फार कमी वेळेमध्ये मोबाईलची बॅटरी संपते, अशा लोकांसाठी रिअलमीकडून एक हटके मोबाईल लाँच करण्यात आहे. चार्जिंगची चिंता कायमची मिटवण्यासाठी रिअलमीने एक जबरदस्त स्मार्टफोन लाँच केला आहे. आगामी मिड- रेंज स्मार्टफोन रिअलमी 17 प्रो (Realme 17 Pro) चा पहिला लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मॅट ब्लॅक किंवा डार्क ग्रे फिनिश, फ्लॅट डिस्प्ले आणि नवीन कॅमेरा डिझाइन यामुळे हा फोन लक्ष वेधून घेत आहे. मात्र, या फोनची खरी चर्चा त्याच्या मोठ्या बॅटरी बॅकअपमुळे चर्चा रंगली आहे. जर ही माहिती खरी ठरली, तर नियमित वापरल्या जाणाऱ्या स्मार्टफोन्सच्या तुलनेत यात प्रचंड मोठी बॅटरी पाहायला मिळेल.
काही सोशल मीडिया युजर्सने दिलेल्या माहितीनुसार, फोनच्या मागील बाजूस मॅट फिनिश आणि स्क्वेअर कॅमेरा आयलँड दिसत आहे. कॅमेरा सेटिंगमध्ये दोन लांब कटआउट आणि त्याखाली LED फ्लॅश देण्यात आला आहे. ह्या फोनचा लूक काहीसा अलीकडच्या OnePlus च्या फोनसारखा दिसत आहे. डिस्प्लेच्या बाजुला मध्यभागी पंच- होल सेल्फी कॅमेरा दिसत आगहे. अर्थात, हे सुरुवातीचे लिक फोटो असल्यामुळे प्रत्यक्ष लाँचच्या वेळी रचनेत काही बदल होण्याची शक्यता आहे. मोबाईल युजर्सना सर्वाधिक उत्सुकता आहे ती, मोबाईलच्या 10,000 mAh बॅटरीची. सध्या अनेक स्मार्टफोन्समध्ये 5000 mAh ते 7000 mAh पर्यंतची बॅटरी आहे. Realme 16 Pro मध्ये 7000 mAh बॅटरी होती, त्यामुळे नवीन मॉडेलमध्ये सुमारे 43 टक्क्यांनी अधिक बॅटरी क्षमता मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.   मात्र, बॅटरी मोठी असली तरी ती प्रत्यक्षात किती दिवस टिकेल, हे स्क्रीन ब्राइटनेस, गेमिंग, इंटरनेट वापर, कॅमेरा आणि बॅकग्राउंड अॅप्सवर अवलंबून राहील. बॅटरी क्षमता वाढत असली, तरी चार्जिंगच्या वेगाबाबत मात्र निराशा होऊ शकते. सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या माहितीनुसार, Realme 17 Pro ला ६५W फास्ट चार्जिंग मिळू शकते, तर Realme 16 Pro मध्ये 80 W चार्जिंगचा पर्याय होता. त्यामुळे 10,000 mAh बॅटरी पूर्ण चार्ज होण्यास किती वेळ लागेल, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. दुसरीकडे, फोनमध्ये 144 Hz रिफ्रेश रेट असलेला AMOLED डिस्प्ले आणि 4 nm तंत्रज्ञानावर आधारित MediaTek Dimensity 7300 प्रोसेसर मिळण्याची चर्चा आहे. 144 Hz रिफ्रेश रेटमुळे स्क्रोलिंग आणि गेमिंग अधिक सुरळीत होण्याची शक्यता आहे, युजर्सला कोणते प्रोसेसर मिळणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
कॅमेरामध्येही काही बदल होण्याची शक्यता आहे. कथित माहितीनुसार, या फोनमध्ये 32 MP सेल्फी कॅमेरा मिळू शकतो. जो आधीच्या मॉडेलच्या 50 MP सेल्फी कॅमेऱ्यापेक्षा कमी आहे. म्हणजेच कंपनीने बॅटरीवर भर देताना सेल्फी कॅमेऱ्यात कपात केल्याचे दिसते. रियर कॅमेऱ्याबाबत अद्याप ठोस माहिती नाही. Realme 16 Pro मध्ये 200 MP मुख्य कॅमेरा होता, पण तोच कॅमेरा पुढेही कायम राहील की नाही हे निश्चित नाही. कंपनीने अद्याप भारतातील लाँच तारीख किंवा किंमत जाहीर केलेली नाही. Realme 16 Pro जानेवारी 2026 मध्ये 31,999 रुपयांपासून सुरू होणाऱ्या किमतीत लाँच झाला होता, तर नवीन मॉडेलच्या किमतीबाबत अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करावी लागेल.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >