ब्रेकिंग न्यूजराजकीयमहत्वाची बातमी
CM Devendra Fadnavis : 'एमपीएससी'च्या जुन्या परीक्षांमधील गुणांचेही ‘री-चेकिंग’ होणार
September 10, 2026 07:31 PM
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासोबत बैठक, आठ दिवसांत कारवाईचे आश्वासन
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांमधील कथित गैरप्रकार आणि विद्यार्थ्यांच्या तक्रारींची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यापक चौकशी आणि परीक्षा प्रक्रियेत सुधारणा करण्याची घोषणा केली आहे. एमपीएससीच्या जुन्या परीक्षांमधील गुणांचे ‘री-चेकिंग’, संशयास्पद प्रकरणांची एसआयटीमार्फत चौकशी, ग्रुप बी आणि सीच्या २०२५ पूर्व व मुख्य परीक्षांची तपासणी, तसेच पोलिसांच्या प्राथमिक अहवालाचे प्रकटीकरण करण्याची प्रक्रिया पुढील आठ दिवसांत सुरू करण्यात येईल, असे फडणवीस यांनी गुरुवारी विद्यार्थ्यांशी झालेल्या चर्चेनंतर स्पष्ट केले. गैरप्रकारात अधिकारी, विद्यार्थी किंवा दलाल यापैकी कोणीही सहभागी असल्याचे आढळल्यास त्याला पाठीशी घातले जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले. (CM Devendra Fadnavis)
एमपीएससीच्या संदर्भात अलीकडे घडलेल्या घटनांनंतर विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेला उद्रेक योग्य असल्याचे मत फडणवीस यांनी व्यक्त केले. अनेक बाबी दीर्घकाळ साचत गेल्या आणि त्या त्या वेळी आवश्यक असलेल्या सुधारात्मक उपाययोजना झाल्या नाहीत. त्यामुळे परीक्षा व्यवस्थेत अनेक त्रुटी निर्माण झाल्या आहेत. सध्याच्या परिस्थितीचा उपयोग करून या त्रुटी दूर करण्याची संधी मिळाली आहे, असे त्यांनी सांगितले. ड्रग इन्स्पेक्टरच्या परीक्षेतील प्रकरणाचा संदर्भ देताना फडणवीस यांनी सरकारने प्रकरण दडपण्याऐवजी पोलिसांना स्वतंत्रपणे तपास करण्याची मुभा दिल्याचे स्पष्ट केले. पोलिसांचा तपास अद्याप पूर्ण झालेला नसून, प्रकरणातील इतर संबंधित व्यक्तींचा शोध सुरू आहे. त्यामुळे सध्याच्या प्रकरणापुरती कारवाई न करता त्याची ‘बॅकवर्ड लिंक’ तपासली जाणार आहे. तीन आरोपींच्या संपर्कात असलेल्या उमेदवारांचे कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) तपासण्याची प्रक्रिया सुरू असून, त्यातून इतर परीक्षांमधील गैरप्रकारही समोर येण्याची शक्यता असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले. (CM Devendra Fadnavis)
CM Devendra Fadnavis : गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
१० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या हातांनी साकारले बाप्पा
पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मितीचा महाराष्ट्राचा ‘गिनीज वर्ल्ड ...
">
CM Devendra Fadnavis : गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
१० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या हातांनी साकारले बाप्पा
पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मितीचा महाराष्ट्राचा ‘गिनीज वर्ल्ड ...
" class="section-post-content-internal-post-title">CM Devendra Fadnavis : गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
१० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या हातांनी साकारले बाप्पा
पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मितीचा महाराष्ट्राचा ‘गिनीज वर्ल्ड ...
विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या गुणांच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर ‘री-चेकिंग’ करण्यास सरकारने मान्यता दिली आहे. विद्यार्थ्यांकडून तक्रारी स्वीकारून त्यांची प्राथमिक पडताळणी करण्यात येईल. ज्या प्रकरणांमध्ये प्रथमदर्शनी संशय किंवा अनियमितता दिसून येईल, ती प्रकरणे एसआयटीकडे पाठवून सखोल चौकशी करण्यात येईल. ग्रुप बी २०२५ पूर्व व मुख्य तसेच ग्रुप सी २०२५ पूर्व व मुख्य परीक्षांचीही चौकशी करण्यास सरकार तयार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. अभियांत्रिकी, कृषी सेवा आणि एफएसओ परीक्षांमध्ये गुणांबाबत विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचीही पुन्हा तपासणी करण्यात येणार आहे. या प्रक्रियेपर्यंत संबंधित मुलाखती थांबविण्याच्या सूचना एमपीएससीला देण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले. परीक्षेच्या उत्तरपत्रिका आरटीआयअंतर्गत विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याची मागणीही योग्य असून, त्यासंदर्भात एमपीएससीला सरकारकडून सूचना करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. (CM Devendra Fadnavis)
एमपीएससीच्या भविष्यातील परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत अत्यंत विश्वासार्ह आणि निष्पक्ष प्रतिमा असलेल्या पाच व्यक्तींचा समावेश असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. समितीने विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या अनुभवातून परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी आणि ‘लूपहोल्स’ समजून घ्यावेत, अशी सूचना करण्यात आली आहे. १२ तारखेपासून पुण्यासह विविध विभागीय स्तरांवर समिती विद्यार्थ्यांशी संवाद साधणार असून, विद्यार्थ्यांनी आपापल्या विभागात समितीसमोर आपल्या सूचना आणि अडचणी मांडाव्यात, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. ‘प्रेफरन्स’ पद्धतीबाबत विद्यार्थ्यांनी मांडलेला मुद्दाही समितीसमोर ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तीन वेगवेगळ्या परीक्षा देऊन निवडीची प्रक्रिया लांबत राहिल्याने विद्यार्थ्यांची दोन-तीन वर्षे जातात. त्यामुळे ही पद्धत बदलण्याचा मुद्दा योग्य असून, त्याचे फायदे-तोटे तपासून समितीने शिफारस करावी, असे फडणवीस यांनी सांगितले. (CM Devendra Fadnavis)
CM Devendra Fadnavis : गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
१० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या हातांनी साकारले बाप्पा
पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मितीचा महाराष्ट्राचा ‘गिनीज वर्ल्ड ...
">
CM Devendra Fadnavis : गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
१० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या हातांनी साकारले बाप्पा
पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मितीचा महाराष्ट्राचा ‘गिनीज वर्ल्ड ...
" class="section-post-content-internal-post-title">CM Devendra Fadnavis : गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
१० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या हातांनी साकारले बाप्पा
पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मितीचा महाराष्ट्राचा ‘गिनीज वर्ल्ड ...
अध्यक्षांच्या राजीनाम्याला विरोध
एमपीएससीच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची विद्यार्थ्यांची मागणी मात्र फडणवीस यांनी मान्य केली नाही. संबंधित घटना घडली त्या वेळी अध्यक्ष पदावर नसलेल्या व्यक्तीचा राजीनामा मागणे तर्कसंगत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, परीक्षा प्रक्रियेतील गैरप्रकारासाठी जो कोणी प्रत्यक्ष जबाबदार असेल, त्याच्यावर कारवाई केली जाईल. अध्यक्ष, सचिव किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीविरोधात विद्यार्थ्यांकडे पुरावे असल्यास ते सादर करावेत; त्या पुराव्यांच्या आधारे स्वतंत्र चौकशी करण्याची सरकारची तयारी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. (CM Devendra Fadnavis)
पोलीस भरतीतील पद्धतीतही बदल
- पोलीस भरतीतील चिपच्या वापराबाबतही विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर योग्य पद्धत निश्चित केली जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले. दोन्ही पायांना चिप लावणे किंवा त्यासाठी पर्यायी पद्धत स्वीकारणे, याबाबत निर्णय घेण्यात येईल. दौंड एसआरपीटीच्या प्रकरणाची चौकशी करण्याचेही आश्वासन देण्यात आले. प्रत्येक जिल्ह्यात पोलीस भरतीसाठी गुण देण्याची पद्धत वेगळी असण्याऐवजी राज्यस्तरावर एकसमान पॅटर्न निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
- सारथी, बार्टी आणि महाज्योतीच्या योजनांमधील विद्यार्थ्यांनी मांडलेल्या अडचणी दूर करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. क्रीडा क्षेत्रातील निवड प्रक्रियेबाबत अन्याय होत असल्यास त्याची माहिती घेऊन तो दूर केला जाईल, असेही फडणवीस यांनी सांगितले. पोलीस उपनिरीक्षक पदासाठी वाढीची मागणी मान्य करण्यात येणार असून, विभागीय पीएसआयच्या संदर्भातील २०२२चा वयोमर्यादेबाबतचा शासन निर्णय लागू करण्याचेही त्यांनी स्पष्ट केले. स्टेनोग्राफर भरती प्रक्रियेत आवश्यक बदल करून भरती प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. (CM Devendra Fadnavis)
MMRDA transfer : एमएमआरडीएच्या सामाजिक विकास शाखेत मोठा फेरबदल; १६ अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्या, अनधिकृत व्यक्तींना प्रवेशबंदी
Mumbai : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीएच्या सामाजिक विकास विभागात मोठा प्रशासकीय फेरबदल करण्यात आला आहे. प्रकल्पग्रस्त व्यक्ती ...
मुलाखतीसाठीही मार्गदर्शक तत्त्वे
- एमपीएससीच्या मुलाखतीतील २७५ गुणांबाबतही विद्यार्थ्यांनी प्रश्न उपस्थित केला. मुलाखतीसाठी स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे असणे आवश्यक असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. उमेदवाराच्या व्यक्तिमत्त्वाबाबत व्यक्तिगत पसंती-नापसंतीच्या आधारे गुण देण्याची पद्धत योग्य नसल्याचे त्यांनी नमूद केले. हा मुद्दा व्ही. राधा समितीसमोर मांडून त्याबाबत योग्य व्यवस्था सुचविण्याच्या सूचना करण्यात येणार आहेत.
- पीएमसी आणि एमएमआरडीएशी संबंधित विद्यार्थ्यांनी मांडलेल्या मुद्द्यांचीही पोलिस आणि संबंधित यंत्रणांच्या माध्यमातून सखोल चौकशी केली जाईल. तसेच लेंडवे, मराठे आणि नखाते यांच्या कार्यकाळातील गेल्या दोन-तीन वर्षांतील परीक्षांचीही एसआयटीमार्फत चौकशी करण्यात येईल. एजंट्सच्या सहभागाची चौकशीही या तपासाचा अविभाज्य भाग असेल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. कॉमर्सच्या संदर्भातील राजुरकर समितीच्या शिफारशींची पडताळणी करून योग्य शिफारशी लागू करण्याबाबतही कार्यवाही केली जाईल. (CM Devendra Fadnavis)
स्वतंत्र तक्रार निवारण कक्ष
एमपीएससीच्या भविष्यातील कामकाजात विद्यार्थ्यांच्या तक्रारींसाठी स्वतंत्र ‘ग्रीव्हन्स सेल’ स्थापन करण्याची सरकारची तयारी आहे. हा कक्ष एमपीएससीशी संबंधित असला तरी स्वतंत्रपणे कार्य करावा आणि शक्य असल्यास निवृत्त न्यायाधीशाला त्याचे प्रमुख करण्यात यावे, अशी संकल्पना फडणवीस यांनी मांडली. विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा असणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या कक्षाची रचना कशी असावी, याबाबत राधा समितीने शिफारस करावी, अशी सूचनाही त्यांनी केली आहे. टेलिग्रामवरून परीक्षांबाबत प्रसारित होणाऱ्या माहिती आणि दाव्यांचीही चौकशी केली जाणार आहे. विद्यार्थ्यांकडे उपलब्ध असलेले पुरावे घेऊन त्यांचा माग काढण्यात येईल आणि ही माहिती नेमकी कोणाकडून प्रसारित केली जात आहे, याचा शोध घेतला जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले. (CM Devendra Fadnavis)
पारदर्शक पद्धतीनेच परीक्षा होणार
एमपीएससीच्या पुढील परीक्षेकडे सरकारचे विशेष लक्ष असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. मोठ्या प्रमाणावर पदांची जाहिरात झाल्याने या परीक्षेसाठी सुमारे १२ लाख ५० हजार अर्ज आले आहेत. काही अर्जांमध्ये दुबार नोंदणी असल्याने प्रत्यक्ष उमेदवारांची संख्या सुमारे १० ते ११ लाखांच्या आसपास राहू शकते. एवढ्या मोठ्या संख्येने उमेदवारांची परीक्षा घेण्याचा अनुभव एमपीएससीला यापूर्वी नसल्याने ही परीक्षा १०० टक्के पारदर्शक पद्धतीने घेणे हे सरकारसमोरील महत्त्वाचे लक्ष्य असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. (CM Devendra Fadnavis)