Mumbai : सणासुदीचा काळ जवळ येत असताना अन्न व औषध प्रशासनाने (FDA) ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांविरुद्ध तीव्र मोहीम उघडली आहे. ठाणे, मुंबई, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर परिसरात FDA ने धडक कारवाई करत अनेक नामांकित हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि फरसाण उत्पादकांचे परवाने निलंबित केले आहेत. यामध्ये शिळ-दिवा परिसरातील बेकायदा कारखान्यांवर कारवाई करत तब्बल २०.४८ लाखांचा अस्वच्छ आणि घातक माल जप्त करण्यात आला आहे.
पुणे : पुणे महानगर प्रदेशाच्या नियोजित आणि सर्वांगीण विकासासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (PMRDA) मास्टर प्लॅन गतिमान करून पायाभूत ...
शिळ-दिवा रोडवर २१ लाखांचा माल जप्त आणि ११ आस्थापनांवर कारवाई
अन्न व औषध प्रशासन, ठाणे यांनी गोपनीय माहितीच्या आधारे ९ सप्टेंबर २०२६ रोजी वास्कर कंपाउंड, शिळ-दिवा रोड, खर्डी गाव परिसरात अचानक छापे टाकले. फरसाण, वेफर्स, चिवडा आणि नमकीन तयार करणाऱ्या ११ आस्थापनांची तपासणी केली असता तेथे अत्यंत निकृष्ट आणि मानवी आरोग्यास हानिकारक प्रकार सुरू असल्याचे निष्पन्न झाले.
-
बहुतांश आस्थापनांकडे अन्न सुरक्षा मानदे कायद्यानुसार आवश्यक वैध परवाना नव्हता.
-
उत्पादन क्षेत्राची फरशी अतिशय घाणेरडी, चिकट आणि साचलेल्या तेलामुळे दूषित झालेली आढळली.
-
परिसराबाहेर सांडपाणी साचल्याने तीव्र दुर्गंधी पसरली होती, तसेच झुरळे आणि उंदरांचा मोठा प्रादुर्भाव आढळला.
-
कामगार कोणतेही अप्रोन, हातमोजे किंवा टोपी न घालता अत्यंत अस्वच्छ वातावरणात अन्नपदार्थ बनवत होते.
मुंबई: ॲपलकडून नव्या iphone 18 pro ची सीरीज लाँच करण्यात आली. काल आयफोन लाँच झाल्यापासून सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. iphone 18 pro, iphone 18 pro max आणि iphone duo हे ...
कारवाई झालेल्या प्रमुख पेढ्या:
९. मे. अंतिमा फरसाण आणि वेफर्स
या सर्व ११ आस्थापनांकडून एकूण २८,९५५ किलो आणि ५६ लिटर असा एकूण २०,४८,८०१.५ रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला असून त्यांचे परवाने व नोंदणी त्वरित निलंबित करण्यात आली आहे.
Navi Mumbai : नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर परिसरात तीन वाहनांच्या भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. आगरी कोळी गावाजवळील रेल्वे उड्डाणपुलावर दोन कार आणि एका ...
मुंबईतील नामवंत हॉटेल्स आणि स्नॅक्स सेंटरचे परवाने निलंबित
-
श्री गजानन वडापाव, स्नॅक्स सेंटर (कांजूरमार्ग पश्चिम): तापमानाचे नियमित निरीक्षण न करणे, कीटक प्रवेश रोखण्यासाठी अपूर्ण उपाय आणि उघड्या स्वयंपाकघरात वडापाव बनवणे यांसारख्या त्रुटी आढळल्या.
-
M/s. Samarth Sweets (जोगेश्वरी पूर्व): प्रवेशद्वाराजवळ उघडी गटारे, कचरा आणि 'linear workflow' नसल्यामुळे क्रॉस-कंटामिनेशचा धोका आढळला.
-
एकविरा झुणका भाकर केंद्र (मुलुंड पूर्व): अत्यंत दाटीवाटीची जागा, वायुविजनाचा अभाव आणि उघडी कचराकुंडी आढळली.
-
मनीषा स्वीट्स (मुलुंड पूर्व): उघड्या व अस्वच्छ जागेत उत्पादन विभाग चालवणे आणि छतावर काजळी साचल्याचे निदर्शनास आले.
-
याशिवाय मे. नवाब सीख कॉर्नर आणि हॉटेल अश्विन तसेच मे. जय महाराष्ट्र मसाला डोसा कॉर्नर यांच्यावरही स्वच्छता नियमांचे उल्लंघन केल्यामुळे कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
पुणे : गणेशोत्सवाची चाहूल लागताच पुणे शहरात गणरायाच्या स्वागताची लगबग सुरू झाली आहे. गणेशमूर्ती खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी होत असतानाच, रविवार ...
पुणे आणि संभाजीनगरमध्येही कारवाईचा सपाटा
पुणे विभागातील ३ प्रमुख हॉटेल्सचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत:
१. हॉटेल शाही (मलकापूर, कराड, सातारा)
२. M/s. Saber Restaurant (भुशी गाव, लोणावळा)
३. M/s. Sairat Biryani (कोरेगाव पार्क, पुणे)
याशिवाय, छ. संभाजीनगरमधील मे. शेळके मामा ढाबा रेस्टॉरंट (खुलताबाद) येथे यापूर्वी बजावलेल्या सुधारणा नोटीसची अंमलबजावणी न केल्यामुळे प्रशासनाकडून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
रस्ते, जेट्टी, पोहोचरस्ते आणि प्रवासी सुविधांच्या १०४ कामांना मंजुरी मुंबई : महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील बंदरांपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक ...
सामूहिक अन्नवाटपाबाबत FDA चे महत्त्वाचे आवाहन
-
परवानाधारक केटरर किंवा स्वयंपाकगृहामार्फत अन्न तयार होत असल्यास, कार्यक्रमाच्या किमान ७ दिवस अगोदर Food & Drug Grievance Portal या पोर्टलवर "सामूहिक अन्नवाटप पूर्वसूचना नमुना" सादर करणे अनिवार्य आहे.
-
आयोजकांनी स्वच्छता, शुद्ध पिण्याचे पाणी, तापमान नियंत्रण आणि सुरक्षित अन्न साठवणुकीचे नियम पाळावेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
अन्नपदार्थाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तक्रार असल्यास नागरिकांनी टोल-फ्री क्रमांक १८००२२२३६५ वर किंवा वरील पोर्टलवर संपर्क साधावा. जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.






