MPSC Group C : स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! गट-क पूर्व परीक्षेच्या तारखेत बदल; 'या' दिवशी होणार नवी परीक्षा

मुंबई  : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 25 ऑक्टोबर 2026 रोजी होणारी ही परीक्षा आता पुढे ढकलण्यात आली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ही 3 जानेवारी 2027 रोजी राज्यातील सर्व जिल्हा केंद्रांवर घेतली जाणार आहे. त्यामुळे या परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना नव्या तारखेनुसार अभ्यासाचे नियोजन करावे लागणार आहे. ( MPSC Group C)



आयोगाने जाहिरात क्रमांक 017/2026 अंतर्गत या परीक्षेचे आयोजन केले होते. यापूर्वी 25 ऑक्टोबर 2026 रोजी ऑफलाइन OMR पद्धतीने परीक्षा घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र, विविध प्रशासकीय आणि स्थानिक परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यातील विविध जिल्ह्यांमधील परीक्षा केंद्रांची उपलब्धता आणि जिल्हा प्रशासनाकडून मिळालेले अहवाल यांचा विचार करण्यात आला. तसेच सणासुदीचा कालावधी, स्थानिक परिस्थिती आणि वाहतूक व्यवस्थेचा परीक्षेवर होणारा परिणाम लक्षात घेण्यात आला आहे. उमेदवारांना परीक्षा केंद्रांवर सुरक्षितपणे आणि वेळेत पोहोचता यावे, यासाठीही या बाबींचा विचार करण्यात आला. ( MPSC Exam Update)

याशिवाय राज्य सेवा मुख्य परीक्षा 2026 चे नियोजन, इतर भरती संस्थांच्या परीक्षांचे वेळापत्रक आणि राज्य शासनाचे हिवाळी अधिवेशन या बाबींचाही आढावा घेण्यात आला. त्यानंतर परीक्षेची सुधारित तारीख निश्चित करण्यात आली आहे. ( MPSC Exam New Date)

परीक्षेचे नवीन प्रवेशपत्र, परीक्षा केंद्र, वेळ आणि इतर आवश्यक सूचना आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्यामुळे उमेदवारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता MPSC च्या अधिकृत संकेतस्थळावर नियमितपणे माहिती तपासावी. नव्या तारखेनुसार अभ्यासाचे नियोजन करून परीक्षेची तयारी सुरू ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Comments
Add Comment

Mumbai Airport News : मुंबई विमानतळावरील अनधिकृत मशीद हटवा!

- ‘एमएमआरडीए’चे निर्देश; ‘लँड जिहाद’ झाल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज

Supreme Court Abu Salem: अबू सालेमला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; 25 वर्षांची शिक्षा पूर्ण झाल्याचा दावा फेटाळला

मुंबई : 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट आणि बांधकाम व्यावसायिक प्रदीप जैन (Pradeep Jain) यांच्या हत्या प्रकरणात जन्मठेपेची

Mumbai airport illegal mosque : मुंबई विमानतळ परिसरातील अनधिकृत मशिदीवर कारवाईचे MMRDA चे निर्देश; किरीट सोमय्या यांची FIR नोंदवण्याची मागणी

मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus) टर्मिनल २ (T2) परिसरातील

BMC News : मुंबई महापालिकेत दोन्ही शिवसेना एकत्र, भाजपचा सभात्याग

सुधार समितीत निर्माण झाला वाद, जोगेश्वरीतील प्रकल्प बाधितांच्या घरांची उभारणी करण्याचे आरक्षण रद्द वगळण्या

Goregaon Patra Chawl : गोरेगाव पत्राचाळीत परिसरातील आरक्षण बदलाचा प्रस्ताव फेटाळला

सुधार समितीच्या बैठकीत प्रस्ताव फेरविचारसाठी पाठवला मुंबई (विशेष प्रतिनिधी) : गोरेगावमधील वादग्रस्त

BMC Water Department : मुंबईतील पाणी साठे सॅटेलाईटद्वारे शोधा

गळती, अनधिकृत जोडणी, पाणी चोरी,नवीन बांधकामांचे पाणी रोखा; स्थायी समिती अध्यक्षांनी दिले आदेश मुंबई (विशेष