Maratha Kunbi Certificate : मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्र वाटपाला वेग; ३ लाख १६ हजारांहून अधिक प्रमाणपत्रांचे वितरण

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र वाटपाच्या प्रक्रियेला मोठी गती मिळाली आहे. शिंदे समितीच्या स्थापनेपासून ७ सप्टेंबर २०२६ पर्यंत प्राप्त झालेल्या ३ लाख १७ हजार ५६९ अर्जांपैकी ३ लाख १६ हजार ९७७ प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. म्हणजेच प्राप्त अर्जांपैकी सुमारे ९९.८ टक्के अर्जांवर कार्यवाही पूर्ण झाली आहे. (Maratha Kunbi Certificate)


जात पडताळणीच्या प्रक्रियेतही मराठवाड्यात प्राप्त २१ हजार ५१ प्रकरणांपैकी १६ हजार ११० प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. दरम्यान, मराठा समाजाला १० टक्के एसईबीसी आरक्षणाच्या अनुषंगाने २०२४ ते २०२६ या तीन वर्षांत मराठवाड्यात २ लाख ९५ हजार ३०५ एसईबीसी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले आहे.



बीड जिल्हा कुणबी प्रमाणपत्र वाटपात आघाडीवर


कुणबी प्रमाणपत्र वाटपात बीड जिल्हा सर्वाधिक पुढे आहे. जिल्ह्यात प्राप्त २ लाख १० हजार ९४१ अर्जांपैकी २ लाख १० हजार ९३१ प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये २५ हजार ९५८, जालन्यात १८ हजार ६५३, परभणीत २० हजार १९०, हिंगोलीत १३ हजार ७०७, नांदेडमध्ये ४ हजार ८९३, लातूरमध्ये २ हजार ८७० आणि धाराशिवमध्ये १९ हजार ७७५ प्रमाणपत्रांचे वाटप झाले आहे. (Maratha Kunbi Certificate)


मराठवाड्यातील एकूण प्राप्त अर्जांपैकी आता केवळ ४४ अर्ज प्रलंबित आहेत. विशेष म्हणजे जालना, हिंगोली आणि बीड या तीन जिल्ह्यांत एकही अर्ज प्रलंबित नाही.



१६ हजारांहून अधिक जात पडताळणी प्रकरणे निकाली


जात पडताळणीच्या २१ हजार ५१ प्रकरणांपैकी १६ हजार ११० प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. यामध्ये बीडमधील १३ हजार ७७४ पैकी ११ हजार ४३७, छत्रपती संभाजीनगरमधील १ हजार ३५३ पैकी १ हजार १४२, जालन्यातील १ हजार ६६४ पैकी १ हजार १६, परभणीतील १ हजार २७१ पैकी ८२५, हिंगोलीतील ५६९ पैकी ३८५, नांदेडमधील ४६३ पैकी २७५, लातूरमधील २७८ पैकी १५० आणि धाराशिवमधील १ हजार ६७९ पैकी ८८० प्रकरणांचा समावेश आहे. (Caste Certificate Verification)



तीन वर्षांत २.९५ लाख एसईबीसी प्रमाणपत्रे


१० टक्के एसईबीसी आरक्षणाच्या अनुषंगाने २०२४ मध्ये ८० हजार ३८८, २०२५ मध्ये १ लाख ३४ हजार ४६० आणि २०२६ मध्ये ८० हजार ४५७ प्रमाणपत्रांचे वाटप झाले. तीन वर्षांच्या एकत्रित आकडेवारीत छत्रपती संभाजीनगरमध्ये ४७ हजार ८२६, जालना ३५ हजार ९८१, परभणी ३९ हजार ५५८, हिंगोली ९ हजार ५९७, नांदेड ४० हजार ९०१, बीड ४२ हजार ४३, लातूर ४४ हजार ७५० आणि धाराशिवमध्ये ३४ हजार ६४९ प्रमाणपत्रे वितरित झाली आहेत.


दरम्यान, १ सप्टेंबर २०२५ ते ७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत मराठवाड्यात ७७ हजार ९५६ कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप झाले. यामध्ये बीड जिल्ह्याचा वाटा सर्वाधिक असून, तेथे ४७ हजार ८०८ प्रमाणपत्रे देण्यात आली. छत्रपती संभाजीनगर ६ हजार ३०४, जालना ४ हजार २७८, परभणी ७ हजार ४६५, हिंगोली ५ हजार २८, नांदेड ५९८, लातूर ६६१ आणि धाराशिवमध्ये ५ हजार ८१४ प्रमाणपत्रांचे वितरण झाले. (Caste Certificate Verification)



जुन्या अभिलेखांची तपासणी; १० ते १७ सप्टेंबर विशेष शिबिरे


कुणबी प्रमाणपत्राच्या प्रक्रियेत जुन्या महसुली, शैक्षणिक आणि इतर अभिलेखांमधील नोंदी शोधणे, त्यांची पडताळणी, वंशावळीची जुळवाजुळव आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली जात आहे. आढळलेल्या कुणबी नोंदींचे जतन आणि प्रसिद्धीकरण करण्याबरोबरच जुन्या अभिलेखांमधील नोंदी संगणकीकृत करून नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत.


नागरिकांना ही प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी यासाठी १० ते १७ सप्टेंबरदरम्यान विशेष शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. या शिबिरांमध्ये नागरिकांना जुन्या नोंदी पाहणे, अर्ज करणे आणि प्रमाणपत्रासंदर्भात आवश्यक मार्गदर्शन मिळणार आहे. (Caste Certificate Verification)

Comments
Add Comment

Nanded Road Accident : नांदेड-भोकर मार्गावर भीषण अपघात! ट्रक-टाटा मॅजिकची जोरदार धडक; ५ जणांचा मृत्यू, ८ गंभीर

नांदेड : नांदेडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नांदेड-भोकर मार्गावर ट्रक आणि टाटा मॅजिक प्रवासी व्हॅनचा

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ‘स्टेट्समनशिप अवॉर्ड’; ब्रिटिश गुंतवणूकदारांना महाराष्ट्रात येण्याचे आवाहन

लंडन : महाराष्ट्राच्या विकासासाठी केलेले नेतृत्व आणि सार्वजनिक सेवेतील योगदानाची दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ

Friendly match against India : ब्राझीलच्या २६ सदस्यीय स्टार फुटबॉल संघाची घोषणा, कार्लो अँसेलोटी यांच्याकडे मुख्य प्रशिक्षकपद

नवी दिल्ली : पाच वेळा विश्वचषक विजेता असलेला ब्राझीलचा फुटबॉल संघ ३ ऑ

Ganpati Special Train : कोकण आणि गणेशोत्सवासाठी रेल्वेचा मोठा दिलासा; मुंबई-कोल्हापूर दरम्यान ४ अतिरिक्त गणपती विशेष गाड्या धावणार

Mumbai :

Nitesh Rane : मंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने 'मोदी एक्सप्रेस' आज रवाना होणार

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी अत्यंत लोकप्रिय ठरलेली 'मोदी एक्सप्रेस' शुक्रवारी

Asian Games 2026 : भारतीय संघात मोठा बदल, दुखापतग्रस्त जेमिमा रॉड्रिग्जच्या जागी प्रतिका रावलला संधी

नवी दिल्ली : येत्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ साठी भारतीय महिला क्रि