Pune Crime : ज्या वयात नव्या संसाराची स्वप्नं रंगवायची, त्याच वयात एका नवविवाहितेने टोकाचं पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुण्याच्या कोथरूड परिसरात २५ वर्षीय नवविवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.पतीचे दुसऱ्या महिलेसोबत विवाहबाह्य संबंध आणि त्यातून होणाऱ्या कथित शारीरिक-मानसिक छळाला कंटाळून तिने हे पाऊल उचलल्याचा आरोप आहे. या प्रकरणी तिच्या पतीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मृत महिलेचं नाव सोनाली गोविंद पवार, वय २५, असं आहे. त्या सुतारदरा परिसरात राहत होत्या. (Pune Crime News)
गुजरात : मुलांसाठी आई-वडील कोणत्याही थराला जाऊ शकतात, याचा प्रत्यय देणारी एक भावूक आणि फिल्मी वाटावी अशी घटना गुजरातमधून समोर आली आहे. दोन ...
सुरुवातीला सुखाचा संसार पण...
सोनाली आणि गोविंद यांचं लग्न काही महिन्यांपूर्वीच झालं होतं. सुरुवातीचे दिवस आनंदात गेले. मात्र, त्यानंतर सोनालीला पतीच्या दुसऱ्या महिलेसोबत संबंध असल्याची माहिती मिळाल्याचं सांगितलं जात आहे. या कारणावरून दोघांमध्ये वारंवार वाद होऊ लागले. पतीचे विवाहबाह्य संबंध समोर आल्यानंतर गोविंदकडून सोनालीला शिवीगाळ, मारहाण आणि मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. सततचा वाद आणि कथित छळ असह्य झाल्याने सोनालीने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे. २२ ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास सुतारदरा येथील राहत्या घरी सोनालीने साडीच्या साहाय्याने गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत सोनालीचा मृत्यू झाला होता. (Pune Crime News)
मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप घेतली आहे. सप्टेंबर महिन्यातही अनेक भागांत अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यामुळे ...
पतीविरोधात गुन्हा दाखल
या घटनेनंतर सोनालीच्या कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांच्या आधारे कोथरूड पोलिसांनी पती गोविंद पवार याच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून, सोनालीच्या आत्महत्येमागचा नेमका घटनाक्रम आणि कथित छळाची सत्यता तपासानंतर स्पष्ट होणार आहे.






