Ganeshotsav 2026 : ‘मूर्ती तुमची, किंमतही तुमची’; पुण्यात गणेशभक्तांसाठी सहा वर्षांपासून राबवली जाणारी ही अनोखी परंपरा नेमकी आहे तरी काय?

पुणे : गणेशोत्सवाची चाहूल लागताच पुणे शहरात गणरायाच्या स्वागताची लगबग सुरू झाली आहे. गणेशमूर्ती खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी होत असतानाच, रविवार पेठेतील लोककल्याण प्रतिष्ठानने ‘गणपती तुमचा, किंमतही तुमचीच’ या अनोख्या संकल्पनेतून समाजोपयोगी उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमात नागरिकांना आपल्या इच्छेनुसार गणपतीची मूर्ती घेता येते आणि त्यासाठी किती पैसे द्यायचे हेही त्यांच्या इच्छेवर सोपवण्यात आले आहे.


प्रल्हाद गवळी यांच्या पुढाकारातून गेल्या सहा वर्षांपासून हा उपक्रम राबविला जात आहे. दरवर्षी सुमारे एक हजार गणेशमूर्ती नागरिकांसाठी उपलब्ध करून दिल्या जात असून, आतापर्यंत जवळपास सहा हजार मूर्तींचे वाटप करण्यात आले आहे. पुणे शहरासह पुण्याबाहेरील गणेशभक्तांकडूनही या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.



कोरोना काळात अनेक कुटुंबांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे गणेशमूर्ती खरेदी करणंही काहींसाठी कठीण झालं होतं. याच परिस्थितीतून प्रेरणा घेत, प्रत्येकाच्या घरी आर्थिक परिस्थितीचा विचार न करता गणरायाचं आगमन व्हावं, या उद्देशाने ही संकल्पना सुरू करण्यात आली. त्यामुळे श्रद्धेला किंमतीची अट न ठेवता गणेशभक्तांना आपल्या ऐपतीनुसार बाप्पाची मूर्ती घरी नेण्याची संधी मिळत आहे.


त्या काळात दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी ठेवण्यात आलेली काही रक्कम शिल्लक राहिली होती. याच रकमेचा उपयोग गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांसाठी हा उपक्रम सुरू करण्यासाठी करण्यात आला. सुरुवातीला प्रायोगिक स्वरूपात सुरू केलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर तो दरवर्षी राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.


पुण्यातील या गणेश कार्यशाळेत लहान आकारापासून तुलनेने मोठ्या आकारापर्यंत विविध गणपती मूर्ती उपलब्ध करून दिल्या जातात. शाडू माती, पीओपी तसेच लाल मातीच्या मूर्तीही येथे पाहायला मिळतात. पर्यावरणपूरक गणेशमूर्ती घेण्याकडे नागरिकांचा कल वाढत असून, त्यानुसार विविध प्रकारच्या मूर्ती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जातो. आकर्षक रंगकाम आणि सुंदर मूर्ती पाहण्यासाठीही नागरिकांची गर्दी होत आहे.



या उपक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे गणपतीची किंमत ठरवून दिली जात नाही. ‘मूर्ती तुमची, किंमतही तुमचीच’ या संकल्पनेनुसार नागरिकांनी आपल्या इच्छेनुसार किंवा परिस्थितीनुसार रक्कम द्यायची आणि गणपतीची मूर्ती घेऊन जायची. त्यामुळे आर्थिक परिस्थिती कोणतीही असली तरी प्रत्येकाला आपल्या घरी गणपतीची स्थापना करता येते.


कात्रज, नगर, सातारा यांसह पुण्याबाहेरील विविध भागांतूनही नागरिक या ठिकाणी गणपतीच्या मूर्ती घेण्यासाठी येतात. काही नागरिक सलग दोन-तीन वर्षे या उपक्रमाचा लाभ घेत आहेत. अनेक नागरिकांकडून या उपक्रमाबाबत सकारात्मक प्रतिक्रिया मिळत असल्याचे आयोजक सांगतात. विशेष म्हणजे मूर्ती घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना त्यांच्या आवडीची मूर्ती निवडण्याचे स्वातंत्र्य दिले जाते.



गणेशोत्सव हा केवळ उत्सव नाही, तर प्रत्येकाच्या श्रद्धा आणि आनंदाशी जोडलेला सण आहे. आर्थिक परिस्थिती कोणतीही असो, प्रत्येकाच्या घरात बाप्पाचं आगमन व्हावं आणि कुणालाही गणेशोत्सवाच्या आनंदापासून वंचित राहावं लागू नये, हाच या उपक्रमामागचा मुख्य हेतू आहे. या अनोख्या संकल्पनेला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता, भविष्यात हा उपक्रम आणखी मोठ्या प्रमाणावर राबवण्याचा मानस लोककल्याण प्रतिष्ठानने व्यक्त केला आहे. श्रद्धेला किंमत नसते, हे कृतीतून दाखवणाऱ्या या उपक्रमातून सामाजिक बांधिलकीची एक सुंदर परंपराच जपली जात आहे. त्यामुळे गणरायाचा आनंद प्रत्येकाच्या दारी पोहोचवणाऱ्या या उपक्रमाचं पुणेकरांकडून कौतुक होत आहे.


Comments
Add Comment

Bigg Boss 20 : बिग बॉसच्या घरात राडा झाल्यानंतर काशवी बॅकफूटवर; म्हणाली, दुसऱ्याच्या चारित्र्यावर...माफी मागितली पण लव गिलच्या नावासमोर मौन!

मुंबई : प्रसिद्ध गेमिंग स्टार स्काउटची (ScoutOp) गर्लफ्रेंड काशवी हिरानंदानी हिने 'बिग बॉस २०' (Bigg Boss 20) च्या एका वादग्रस्त

Nashik : नाशिकमध्ये सिटी लिंक बसचा थरार ! दरवाजा उघडल्याने वाहक रस्त्यावर फेकला गेला अन्...

Nashik :  नाशिक शहरातील विनयनगर चौक परिसरात रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास सिटी लिंक बसच्या अपघाताची घटना घडली.

Central Railway Delayed Today : मुंबई लोकलचा बोजवारा! ओव्हरहेड वायरला आग अन् रिले रूममधील धुरामुळे मध्य रेल्वे विस्कळीत; संतापलेल्या प्रवाशांची रुळांवरून पायपीट

मुंबई : सोमवारी सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी दिवस अतिशय मनस्तापाचा ठरला. मध्य रेल्वेच्या (Central Railway) मुख्य

न्यूझीलंडसाठी करो या मरोची स्थिती! तर भारताला मालिका विजयाची संधी, तिसरा टी20 सामना कुठे पाहणार? जाणून घ्या

भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर असून पाच सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यावर

मुंबईतील अंधेंरीत संतापजनक प्रकार : १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलाने चालवला पाण्याचा टँकर; कार आणि इमारतीच्या भिंतीला दिली धडक!

मुंबई : मुंबईतील अंधेरी पूर्व भागातून एक अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक बाब समोर आली आहे. येथे एका अवघ्या १४

Pune Shivai bus fire: पुण्यात धावत्या इलेक्ट्रिक शिवाई बसला भीषण आग; 17 प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला, VIDEO व्हायरल

पुणे : पुण्यातील स्वारगेट परिसरात अपोलो हॉस्पिटलसमोर धावत्या इलेक्ट्रिक शिवाई बसला अचानक भीषण आग लागल्याची