Pune Ganeshotsav : पुण्यात गणेशोत्सवासाठी प्रशासन सज्ज; वाहतूक, सुरक्षा आणि स्वच्छतेवर विशेष भर

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून तयारीचा आढावा; गर्दीच्या ठिकाणी २४ तास पोलिसांचा बंदोबस्त


पुणे : पुण्यातील गणेशोत्सवासाठी देशभरातून मोठ्या संख्येने नागरिक येत असल्याने वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता, वीजपुरवठा आणि गर्दी व्यवस्थापनाची यंत्रणा अधिक सक्षम ठेवण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी प्रशासनाला दिले. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नातून यंदाचा गणेशोत्सव सुरक्षित, शिस्तबद्ध आणि आनंददायी वातावरणात साजरा करूया, असे आवाहनही त्यांनी केले.


विभागीय आयुक्त कार्यालयात गणेशोत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. शीतल तेली-उगले, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे आणि पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. (Pune Ganeshotsav)



गर्दीच्या काळात अतिरिक्त यंत्रणा तैनात करा


गणेशोत्सवासाठी रेल्वे, बस आणि सार्वजनिक वाहतुकीतून मोठ्या संख्येने नागरिक पुण्यात येतात. त्यामुळे प्रत्येक रेल्वेगाडीनंतर होणारी गर्दी लक्षात घेऊन संबंधित दिवशी आणि गर्दीच्या वेळेनुसार अतिरिक्त मनुष्यबळ व वाहतूक यंत्रणा उपलब्ध ठेवण्याच्या सूचना सुनेत्रा पवार यांनी दिल्या.


विविध गणेश मंडळांच्या सांस्कृतिक आणि अन्य कार्यक्रमांना हजारो नागरिक उपस्थित राहतात. त्यामुळे अशा ठिकाणी स्वतंत्र वाहतूक व गर्दी व्यवस्थापन करावे. वाहतूक बदल, पर्यायी मार्ग, पार्किंग व्यवस्था आणि गर्दीच्या ठिकाणांची माहिती नागरिकांना वेळेत देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. (Pune Ganeshotsav)



२४ तास पोलिसांचा बंदोबस्त


गणेशोत्सव हा पुण्याच्या सांस्कृतिक वैभवाचा महत्त्वाचा उत्सव असल्याने महिला, बालके आणि सर्वसामान्य नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले. गर्दीच्या ठिकाणी मंगळसूत्र चोरी, पाकीटमारी यांसारख्या घटना रोखण्यासाठी २४ तास पोलिसांची गस्त आणि प्रभावी बंदोबस्त ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.


मागील वर्षीच्या अनुभवातून आलेल्या अडचणींचा आढावा घेऊन यंदा आवश्यक सुधारणा कराव्यात आणि सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असेही सुनेत्रा पवार यांनी सांगितले.



वीजपुरवठा आणि विसर्जन व्यवस्थेवर भर


गणेश मंडळांसह ग्रामीण भागातील नागरिकांना सुरळीत वीजपुरवठा मिळावा, यासाठी संबंधित यंत्रणांनी विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश देण्यात आले. विसर्जनाच्या दिवशी विविध विसर्जनस्थळी होणारी गर्दी लक्षात घेऊन विसर्जन कुंड आणि निर्धारित ठिकाणी पुरेशी प्रकाशव्यवस्था, सुरक्षा आणि स्वच्छतेची व्यवस्था करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. विसर्जन सुरू असतानाच संबंधित ठिकाणी सातत्याने स्वच्छता करण्यात यावी, जेणेकरून नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. (Pune Ganeshotsav)



‘परंपरेला साजेसे वातावरण निर्माण करा’


लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी समाजातील सर्व घटकांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाला व्यापक स्वरूप दिले. या परंपरेला साजेसे वातावरण निर्माण करून गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा करावा. सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही, पारंपरिक पद्धतीला प्राधान्य राहील आणि उच्च न्यायालयाच्या नियमांचे पालन केले जाईल, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन सुनेत्रा पवार यांनी केले.



महापालिकेकडून विविध सुविधा


पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी मुख्य रस्त्यांवरील खड्डे दुरुस्ती, सुलभ शौचालये, अतिरिक्त प्रकाशव्यवस्था, सार्वजनिक ध्वनिक्षेपक, सीसीटीव्ही सनियंत्रण आणि आपत्कालीन प्रतिसाद पथकांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती दिली. गर्दीच्या ठिकाणी वैद्यकीय पथकेही सज्ज ठेवण्यात आली आहेत. नागरिकांना काही अडचण आल्यास तात्काळ प्रशासनाला माहिती देण्याचे आवाहन त्यांनी केले. (Pune Ganeshotsav)



मेट्रोच्या प्रवाशांसाठीही विशेष नियोजन


गणेशोत्सवातील वाढती गर्दी लक्षात घेऊन पुणे मेट्रोने विशेष नियोजन केले आहे. मंडई स्थानकाचा वापर केवळ बाहेर पडण्यासाठी करावा, तर गणपती दर्शनासाठी येणाऱ्या प्रवाशांनी भूमिगत मार्गावरील कसबा पेठ किंवा स्वारगेट स्थानकांचा वापर करावा, असे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. (Pune Ganeshotsav)


गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी केलेल्या सुरक्षा तयारीचे सादरीकरणही बैठकीत करण्यात आले. तसेच विविध शासकीय विभागांच्या तयारीची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.

Comments
Add Comment

Sangli News : कृष्णेच्या डोहात ८ फूट लांबीच्या मगरीचा वावर; औदुंबर घाटावर भाविकांची गर्दी

सांगली : औदुंबर येथील कृष्णा नदीच्या डोहात सध्या तब्बल ८ ते १० फूट लांबीची मगर वावरत असल्याचे दिसून येत आहे. दररोज

Nagpur Marbat Festival : नागपूरचा १४५ वर्षांचा अनोखा ‘मारबत उत्सव’; जाणून घ्या परंपरा, इतिहास अन् खासियत

नागपूर : नागपूर म्हटलं की गणेशोत्सव, ताडोबा आणि रसाळ संत्र्यांसोबतच शहराच्या खास सांस्कृतिक ओळखीचा एक अविभाज्य

Railway Megablock News: ऐन सणासुदीच्या दिवसांत प्रवाशांचा खोळंबा, रविवारी 'या' मार्गावर ९ तासांचा ब्लॉक, लोकलसह एक्स्प्रेसही रद्द

पुणे: गणेशोत्सवासाठी जेमतेम काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. नोकरदारवर्ग आता गणेशोत्सवासाठी आपल्या गावी

Live Event SOP : ‘लाइव्ह इव्हेंट’साठी राज्य सरकारकडून ‘एसओपी’

- १५ दिवस आधी अर्ज बंधनकारक; पूर्वमंजूर ठिकाणांना पुनर्तपासणीतून सवलत मुंबई : संगीत कार्यक्रम, सांस्कृतिक

Ganpati Special Train: गावी जाणाऱ्या गणेशभक्तांना रेल्वेकडून मोठा दिलासा, मुंबई- कोकण मार्गावर धावणार १२ विशेष गाड्या

मुंबई: गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणामध्ये जाणाऱ्या प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. मध्य

Yavatmal : यवतमाळ तालुक्यात महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर पावसाचे दमदार पुनरागमन; करपणाऱ्या खरिपाच्या पिकांना नवसंजीवनी

यवतमाळ : गेल्या महिनाभरापासून दडी मारून बसलेल्या पावसाने अखेर यवतमाळ तालुक्यात दमदार पुनरागमन केले आहे. तब्बल