Mumbai : मुंबईसह जगभरातील गणेशभक्तांची प्रतीक्षा आता संपली आहे. यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 'लालबागचा राजा २०२६'चे पहिले दर्शन आज, शुक्रवारी (११ सप्टेंबर) घडणार आहे. लालबागच्या राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून आज संध्याकाळी ७ वाजता बाप्पाच्या विलोभनीय रूपाचे अनावरण केले जाईल.(Lalbaugcha Raja 2026)
गणेशोत्सव २०२६ दरम्यान विसर्जन मिरवणुका निर्विघ्न पार पडाव्यात आणि शहरातील वाहतूक कोंडी टाळावी, यासाठी ठाणे शहर पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. ...
संध्याकाळी ७ वाजता होणार पहिली झलक सादर
लालबाग मार्केट, परळ येथील मुख्य मंडपात हा सोहळा पार पडणार आहे. अनावरणापूर्वी मंडळाने माध्यम प्रतिनिधींसाठी विशेष फोटो सेशनचे आयोजन केले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही राजाच्या पहिल्या दर्शनासाठी भाविकांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे. यंदा लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आपले ९३ वे वर्ष साजरे करत असून, १४ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत गणेशोत्सव रंगणार आहे.(Lalbaugcha Raja 2026)