मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत आंदोलनासाठी येण्याचा इशारा दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, छत्रपती शिवरायांना मानणाऱ्यांनी हिंदूंच्या सणांमध्ये किंवा गणेशोत्सवात विघ्न आणू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली. जरांगे यांच्या मुंबईत धडकण्याच्या घोषणेवर प्रतिक्रिया देताना फडणवीस यांनी, “माझी फक्त एवढीच अपेक्षा आहे की छत्रपती शिवरायांना मानणारे जे जे आहेत, ते हिंदूंच्या सणांमध्ये किंवा गणपतीमध्ये विघ्न आणणार नाहीत,” असे म्हटले.(Devendra Fadnavis)
नांदेड जिल्ह्यातील भीषण रस्ते अपघाताने महाराष्ट्र हादरला आहे. नांदेड-भोकर मार्गावरील सीताखंडी घाट परिसरात गुरुवारी सायंकाळी प्रवासी वाहन आणि ...
मुंबईत जाण्याची तारीख आणि आंदोलनाचा मार्ग निश्चित करण्यासाठी अंतरवाली सराटी येथे बैठक घेण्यात येणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात होणाऱ्या संभाव्य आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांची प्रतिक्रिया महत्त्वाची मानली जात आहे.(Hindu festival Maharashtra)
मुंबई: गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणामध्ये जाणाऱ्या प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेकडून १२ हॉलिडे स्पेशल गाड्यांची घोषणा ...
दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरही भाष्य केले. या प्रश्नावर गुरुवारी सविस्तर बैठक झाली असून सकारात्मक चर्चा झाली असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, काही जण विद्यार्थ्यांच्या माध्यमातून राजकारण करण्याचा प्रयत्न करीत असून त्यातून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला.(Devendra Fadnavis)






