Food Poising Case : छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) एक धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना घडली आहे. खिचडी खाल्यानंतर एका कुटुंबावर मोठे संकट ओढावले आहे. या संकटात कुटुंबातील लहान मुलाचा मृत्यू झालाय तर कुटुंबातील इतरांची जगण्यासाठी झुंज सुरू आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडालीय.
नेमकं काय घडलं ?
छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. घरात रात्री खिचडी खाल्ल्यानंतर कुटुंबियांना अन्नविषबाधा झाली. एकाच कुटुंबातील चारही सदस्यांना अचानक जुलाब आणि उलट्यांचा त्रास सुरु झाला. घरात रात्री खिचडी खाल्यानंतर नारायण थोटे, त्यांची पत्नी देवशाला, मुलगी गायत्री आणि मुलगा आयुष यांना पहाटेपासून त्रास सुरू झाला. सुरुवातीला त्यांनी स्थानिक पातळीवर उपचार घेतले मात्र, प्रकृतीत सुधारणा न जाणवल्याने त्यांना गावातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथेही बरे न वाटल्याने डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी त्यांना सिल्लोड येथे हलविण्याचा सल्ला दिला. (Food Poising Case )
Agra Crime News : पती-पत्नीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना आग्राच्या खंदौली पोलीस ठाणे (Khandauli Police Station) हद्दीतील पिलपोखर गावात घडलीय.तब्बल महिनाभर घरापासून ...
खिचडीतून अन्नबाधा झाल्याचा संशय
मात्र, सिल्लोडला नेत असताना गुरूवारी आयुषचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर सात वर्षीय गायत्रीवर छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान खिचडी खाल्यांनंतर कुटुंबियांना त्रास झाल्याने खिचडीतून अन्नबाधा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेमुळे चिंचोली लिंबाजी परिसरात खळबळ उडाली आहे. अन्नविषबाधेमुळे एका हसत्या - खेळत्या कुटुंबावर अशा प्रकारे संकट ओढावल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.