Nashik : नाशिकमध्ये मतदार यादीत मोठी उलथापालथ ! १० लाख २७ हजार मतदारांची नावे वगळली

Nashik : मतदार यादीच्या सखोल पुनरीक्षण अर्थात एसआरआर मोहिमेत नाशिक जिल्ह्यात तब्बल १० लाख २७ हजार ८९४ मतदारांची नावे प्रारूप मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. मात्र, आतापर्यंत या वगळलेल्या नावांच्या अनुषंगाने कोणतीही हरकत किंवा तक्रार दाखल झालेली नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे पात्र मतदारांनी आपले नाव यादीत आहे की नाही, याची खात्री करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


जिल्हाधिकारी कार्यालयात विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक डॉ. प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली मतदार यादी पुनरीक्षणाचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला आमदार सीमा हिरे, नितीन पवार, हिरामण खोसकर, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद तसेच सर्व विधानसभा मतदारसंघांचे निवडणूक निर्णय अधिकारी आणि विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.



चार शहरी मतदारसंघांतूनच ५.५ लाख नावे वगळली


जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांमध्ये विविध कारणांमुळे १० लाख २७ हजारांहून अधिक मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. यामध्ये नाशिक शहरातील चार मतदारसंघांचा वाटा मोठा आहे. नाशिक मध्य, नाशिक पश्चिम, नाशिक पूर्व आणि देवळाली या चार विधानसभा मतदारसंघांमधून एकत्रितपणे सुमारे ५.५ लाख मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, प्रारूप यादीतून वगळण्यात आलेल्या मतदारांच्या संदर्भात आतापर्यंत कोणत्याही हरकती किंवा तक्रारी प्राप्त झाल्या नसल्याची माहिती बैठकीत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना देण्यात आली.



बीएलए नियुक्त करण्याचे आवाहन


मतदार यादी पुनरीक्षणाच्या प्रक्रियेत कोणताही पात्र मतदार वंचित राहू नये, यासाठी राजकीय पक्षांनी बूथ स्तरावरील एजंट अर्थात बीएलए नियुक्त करावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. दरम्यान, काही राजकीय प्रतिनिधींनी बीएलओ अर्थात बूथ स्तरावरील अधिकाऱ्यांकडून घरोघरी जाऊन गणना प्रपत्र भरून घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याच्या तक्रारी बैठकीत मांडल्या. त्याची दखल घेत संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी, अशा सूचना डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिल्या.



३० सप्टेंबरपर्यंत हरकत दाखल करता येणार


ज्या पात्र मतदारांची नावे प्रारूप मतदार यादीतून वगळली गेली आहेत, त्यांना ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे दावे आणि हरकती दाखल करता येणार आहेत. तसेच, यादीत नाव नसलेल्या पात्र नागरिकांना नमुना अर्ज क्रमांक ६ भरून नव्याने मतदार म्हणून नोंदणी करण्याचीही संधी आहे. १ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकाला किंवा त्यापूर्वी १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांनीही नमुना अर्ज क्रमांक ६ भरून मतदार यादीत आपले नाव नोंदवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी १९, २० आणि २६, २७ सप्टेंबर रोजी विशेष शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे.



पात्र मतदाराचे नाव चुकीने वगळू नका


मतदार यादी पुनरीक्षणाच्या कामाचा क्षेत्रीय पातळीवर नियमित आढावा घेण्याचे निर्देश डॉ. प्रवीण गेडाम यांनी अधिकाऱ्यांना दिले. पात्र मतदाराचे नाव कोणत्याही परिस्थितीत चुकीच्या पद्धतीने वगळले जाणार नाही, याची दक्षता घेण्यास त्यांनी सांगितले. दावे आणि हरकतींची नियमानुसार काटेकोरपणे छाननी करावी तसेच संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष आणि नागरिकाभिमुख पद्धतीने राबवावी, असेही निर्देश देण्यात आले.कामात जाणीवपूर्वक दिरंगाई किंवा निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्याचा इशाराही डॉ. गेडाम यांनी दिला आहे. त्यामुळे आता वगळलेल्या १० लाख २७ हजार ८९४ मतदारांच्या नावांपैकी किती जण हरकत दाखल करतात आणि अंतिम मतदार यादीत किती नावे पुन्हा समाविष्ट होतात, याकडे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Ambernath beef truck : अंबरनाथमध्ये १६.८ टन संशयित गोमांसाचा ट्रक जप्त? पोलिसांच्या कारवाईने खळबळ

ठाणे : अंबरनाथ परिसरात मोठ्या प्रमाणात संशयित गोमांसाची वाहतूक होत असल्याचा प्रकार समोर आल्याची माहिती आहे. एका

Live Event SOP : ‘लाइव्ह इव्हेंट’साठी राज्य सरकारकडून ‘एसओपी’

- १५ दिवस आधी अर्ज बंधनकारक; पूर्वमंजूर ठिकाणांना पुनर्तपासणीतून सवलत मुंबई : संगीत कार्यक्रम, सांस्कृतिक

Box Office Collection : ‘मिर्झापूर: द मूव्ही’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ! जगभरात 200 कोटींचा टप्पा पार

Mumbai : ‘मिर्झापूर’ या लोकप्रिय वेबसीरिजच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. पंकज त्रिपाठी, अली फजल आणि

MPSCच्या सचिवांना काळे फासल्याप्रकरणी संभाजी ब्रिगेडवर कारवाई करणार, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती

मुंबई: नवी मुंबईतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) कार्यालयात घुसून सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या

Eknath Shinde : लंडनमध्ये होणार 'विश्व मराठी साहित्य संमेलन'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

महाराष्ट्र मंडळाकडून ‘ग्लोबल प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्काराने सन्मान लंडन : जगभरातील मराठी बांधव, उद्योजक आणि

Nepal PM UN Address : नेपाळचे पंतप्रधान यूएन महासभेत मांडणार हवामान बदल आणि महापुराचा मुद्दा; २४ सप्टेंबर रोजी करणार संबोधित

काठमांडू: नेपाळचे पंतप्रधान बालेंद