BJP on Thackeray brothers : महाराष्ट्र गीत सुरू असताना ठाकरे बंधू उभेही राहिले नाहीत; लालबागमधील व्हिडिओवरून भाजप आक्रमक

मुंबई: लालबाग येथील एका कार्यक्रमादरम्यानचा व्हिडिओ समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात नवीन वाद निर्माण झाला आहे. महाराष्ट्र गीत सुरू असताना आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे दोघेही जागेवर उभे राहिले नाहीत, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेवर भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.(BJP on Thackeray brothers)







भाजपचे ठाकरे बंधूंवर जोरदार टीकास्त्र या मुद्द्यावरून भाजप मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी ठाकरे बंधूंच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतला आहे. "मराठी माणसाच्या नावाने राजकारण करायचं आणि प्रत्यक्षात महाराष्ट्राचाच अपमान करायचा, हीच ठाकरे बंधूंची नवी कार्यपद्धती आहे," असा घणाघाती आरोप त्यांनी केला.(BJP on Thackeray brothers)



पुढे बोलताना नवनाथ बन म्हणाले, "राज्यगीत सुरू असताना साधे एकाजागी उभे राहण्याचे भानही राहू नये? महाराष्ट्राच्या अस्मितेच्या गप्पा मारणाऱ्यांकडूनच जर राज्यगीताचा असा अवमान होत असेल, तर हा सरळ सरळ महाराष्ट्राचा अपमान नाही का? मराठी माणूस, महाराष्ट्र आणि मराठी अस्मितेचा ठेका घेत फिरणाऱ्यांनी आधी राज्यगीताचा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा सन्मान कसा करायचा, हे शिकले पाहिजे." आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंचे मराठी आणि महाराष्ट्र प्रेम केवळ राजकारणासाठीच असल्याचा दावा याद्वारे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचे त्यांनी नमूद केले.(BJP on Thackeray brothers)

Comments
Add Comment

Nagpur Marbat Festival : नागपूरचा १४५ वर्षांचा अनोखा ‘मारबत उत्सव’; जाणून घ्या परंपरा, इतिहास अन् खासियत

नागपूर : नागपूर म्हटलं की गणेशोत्सव, ताडोबा आणि रसाळ संत्र्यांसोबतच शहराच्या खास सांस्कृतिक ओळखीचा एक अविभाज्य

Thane Plastic Ban : ठाण्यात प्लास्टिकविरोधात महापालिकेची धडक कारवाई! ९९ किलो प्लास्टिक जप्त, ७९ हजारांचा दंड

Thane : ठाणे शहरात प्रतिबंधित प्लास्टिकविरोधात ठाणे महापालिकेने धडक कारवाई सुरू केली आहे. शहरातील विविध भागांमध्ये

Minister Dattatray Bharne : राज्यावर दुष्काळाचे सावट ! - कृषिमंत्री दत्तात्रय भरणे; पुढील ३-४ दिवसांत अहवालानंतर कार्यवाही करणार

पुणे : राज्यातील अनेक भागांत पावसाने ओढ दिल्याने पिके संकटात सापडली असून, दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली

Nashik : पशुवैद्यकीय दवाखान्याच्या जागेचा पेच मिटला, ५० हजारांहून अधिक पशुधनाची जबाबदारी

Nashik : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांच्या सोयीसाठी दर्शनपथ उभारण्याचे काम

Cine Kind Awards 2026 : सिनेविश्वातील सामाजिक संवेदनशीलतेचा गौरव; वामिका-जॉन-रवीना यांना ‘सिने काइंड अवॉर्ड्स’ने सन्मानित

मुंबई : चित्रपटांच्या माध्यमातून सामाजिक कार्ये आणि संवेदनशीलता यांना प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्तींचा गौरव

Ambernath beef truck : अंबरनाथमध्ये १६.८ टन संशयित गोमांसाचा ट्रक जप्त? पोलिसांच्या कारवाईने खळबळ

ठाणे : अंबरनाथ परिसरात मोठ्या प्रमाणात संशयित गोमांसाची वाहतूक होत असल्याचा प्रकार समोर आल्याची माहिती आहे. एका