Saturday, September 12, 2026

Nitesh Rane Modi Express : मंत्री नितेश राणेंच्या माध्यमातून दुसरी 'मोदी एक्सप्रेस' उद्या रवाना होणार

Nitesh Rane Modi Express : मंत्री नितेश राणेंच्या माध्यमातून दुसरी 'मोदी एक्सप्रेस' उद्या रवाना होणार

मुंबई :णेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी अत्यंत लोकप्रिय ठरलेली दुसरी 'मोदी एक्सप्रेस' रविवारी रवाना होणार आहे. सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यंदाही 'मोदी एक्सप्रेस' ही विशेष रेल्वे सोडण्यात येत आहे. मागील चौदा वर्षांपासून अविरत सुरू असलेल्या या उपक्रमामुळे मुंबईत राहणाऱ्या चाकरमान्यांचा गावी जाण्याचा प्रवास अधिक सुकर होणार असून, सकाळी १०.३० वाजता दादर रेल्वे स्थानकातून ही गाडी कोकणाकडे मार्गस्थ होईल.(Nitesh Rane Modi Express)

याआधी ११ सप्टेंबर रोजी ‘मोदी एक्सप्रेस’ची पहिली विशेष रेल्वे दादर स्थानकातून कोकणच्या दिशेने रवाना झाली होती. मंत्री नितेश राणे यांनी या गाडीला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी प्रवाशांनी ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष करत गाडीला निरोप दिला. आता दुसरी गाडी १३ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता दादरच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १४ वरून सुटणार आहे. मुंबईहून निघाल्यानंतर ही ट्रेन रत्नागिरी, वैभववाडी, कणकवली असा प्रवास करत सावंतवाडी या तिच्या अंतिम मुक्कामावर पोहोचेल. प्रवाशांसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही मोफत खाण्यापिण्याची तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवासादरम्यान भजनी मंडळे आणि भजनाच्या माध्यमातून गणेशोत्सवाचा उत्साहही अनुभवता येणार आहे.(Nitesh Rane Modi Express)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >