Namo Express : ‘नमो एक्स्प्रेस’ आणि विशेष बसेसच्या माध्यमातून दीड हजारांहून अधिक भाविक कोकणाकडे रवाना

मुंबई: गणेशोत्सवानिमित्त मुंबईतील चाकरमान्यांना आपल्या गावच्या बाप्पाच्या दर्शनासाठी कोकणात जाता यावे, यासाठी लोढा फाउंडेशनच्या वतीने यंदाही विशेष ‘नमो एक्स्प्रेस’ची व्यवस्था करण्यात आली आहे. शनिवारी सकाळी ११ वाजून ५ मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथील फलाट क्रमांक १८ वरून ही विशेष ट्रेन कोकणाकडे रवाना झाली.(Namo Express)


मुंबई भाजप अध्यक्ष तथा आमदार अमित साटम यांच्या हस्ते या विशेष रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. या ट्रेनमधून १५०० हून अधिक गणेशभक्तांनी सावंतवाडीपर्यंतचा प्रवास केला. सीएसएमटी स्थानकावर चाकरमान्यांनी मोठी गर्दी केली होती आणि हक्काचे आसन मिळाल्यानंतर ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.(Namo Express Konkan)


या उपक्रमाबाबत माहिती देताना मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले की, गणेशोत्सव हा प्रत्येक मराठी माणसाच्या भावविश्वाशी जोडलेला सण आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी गणेशभक्तांसाठी विशेष रेल्वे आणि बससेवेची व्यवस्था करण्यात येते, जेणेकरून मुंबईत नोकरी-व्यवसायानिमित्त राहणाऱ्या चाकरमान्यांना आपल्या कुटुंबीयांसोबत गावी सण साजरा करता येईल.



अतिरिक्त रेल्वे व बससेवेचे आयोजन:




  • शनिवारी रात्रीची ट्रेन: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी भाजपच्या वतीने शनिवारी रात्री ११ वाजता आणखी एका विशेष ट्रेनचे आयोजन करण्यात आले.




  • विशेष बससेवा: शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता ऑगस्ट क्रांती मैदान येथून कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी ५ विशेष बसेस रवाना करण्यात आल्या. दक्षिण मुंबईतील सुमारे २०० चाकरमान्यांनी या बसमधून प्रवास करत गावाकडे प्रस्थान केले.(Namo Express Konkan)




या सर्व विशेष वाहतूक सुविधांमुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास अधिक सुकर झाला असून प्रवाशांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.

Comments
Add Comment

Mumbai Railway Megablock: प्रवाशांसाठी मोठी अपडेट! रविवारी 'या' मार्गावर मेगाब्लॉक, गणेशोत्सवाची शॉपिंग करायला जाण्याआधी वाचा

मुंबई: रविवारी अर्थात उद्या घराबाहेर पडण्याआधी एकदा ही आवश्य बातमी वाचा. मुंबईकरांची लाईफलाईन म्हणून ओळखल्या

Swarved Mahamandir Bhiwandi : भिवंडीतील गणेशोत्सवात साकारणार वाराणसीच्या 'स्वरवेद महामंदिर धाम'ची १२० फूट उंच भव्य प्रतिकृती

मुंबई : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) प्रसिद्ध वाराणसी येथील 'स्वरवेद महामंदिर धाम'ची (Swarved Mahamandir Dham) सुमारे १२० फूट उंच आणि

Mumbai Ganpati 2026 : गणपती उत्सवापूर्वी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी; सुरक्षिततेचा उपाय म्हणून मशीद आणि माटुंगा येथील चार पादचारी पूल बंद होणार

मुंबई:

Nafisa Joseph case : नफिसा जोसेफ आत्महत्या प्रकरण; मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, व्यावसायिक गौतम खंडजुआ खटल्याला सामोरे जाणार

मुंबई: प्र

Ganeshotsav 2026 : गणेश मंडळांसाठी FDAचे नवे नियम; प्रसादासाठीही बिल अन् FSSAI नोंदणी बंधनकारक

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांसाठी अन्न सुरक्षेशी संबंधित नियम अधिक कडक

Ratnakar Mahajan : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रत्नाकर महाजन यांचे निधन; 80 व्या वर्षी पुण्यात घेतला अखेरचा श्वास

पुणे : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे शनिवारी सकाळी निधन झाले. पुण्यातील राहत्या