Mumbai Railway Megablock: प्रवाशांसाठी मोठी अपडेट! रविवारी 'या' मार्गावर मेगाब्लॉक, गणेशोत्सवाची शॉपिंग करायला जाण्याआधी वाचा

मुंबई: रविवारी अर्थात उद्या घराबाहेर पडण्याआधी एकदा ही आवश्य बातमी वाचा. मुंबईकरांची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. ठाणे ते कल्याण या स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर हा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. तर, ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर ठाणे ते वाशी- नेरूळ मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनी सकाळी घराबाहेर निघण्यापूर्वी एकदा मेगाब्लॉकचं वेळापत्रक वाचूनच घराबाहेर पडण्याचा सल्ला रेल्वेकडून देण्यात आला आहे.



गणेशोत्सवानिमित्त मुंबईकर घराबाहेर पडतात. जर तुम्हीही गणेशोत्सवाची शॉपिंग करण्यासाठी घराबाहेर पडणार असाल तर एकदा रेल्वेच्या मेगाब्लॉकचं वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा. मध्य रेल्वे मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत ठाणे ते कल्याण स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. ब्लॉकच्या कालावधीत अप आणि डाऊन मार्गावरील सर्व लोकल १० मिनिटे उशिराने मुंबई लोकल चालवल्या जाणार आहेत. ब्लॉक कालावधीत सकाळी १०.४३ ते दुपारी ३.५३ या वेळेत मुलंड स्थानकावरून सुटणाऱ्या सर्व डाऊन धीम्या आणि सेमी फास्ट लोकल सेवा मुलंड आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील. या लोकल ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा आणि डोंबिवली स्थानकांवर थांबा दिला जाणार आहे.



तर, सकाळी १०.३६ ते दुपारी ३.५१ या वेळेत कल्याण स्थानकावरून सुटणाऱ्या सर्व अप धीम्या आणि सेमी फास्ट लोकल सेवा कल्याण आणि मुलंड स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जाणार आहेत. या लोकलला डोंबिवली, दिवा, मुंब्रा, कळवा आणि ठाणे स्थानकांवर थांबा दिला जाणार आहे. त्यानंतर मुलंड स्थानकावरून अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील. त्यानंतर ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरील ठाणे आणि वाशी/ नेरुळ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ट्रान्स-हार्बर मार्गावर ब्लॉक कालावधीत ठाणे आणि वाशी/ नेरुळ/ पनवेल स्थानकांदरम्यानची अप आणि डाऊन सेवा बंद राहील.

सकाळी १०.३५ ते दुपारी ४.०७ या वेळेत ठाणे येथून वाशी/ नेरुळ/ पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन ट्रान्स- हार्बर सेवा रद्द राहणार आहेत. सकाळी १०.२५ ते दुपारी ४.०९ वेळेत पनवेल/ नेरुळ/ वाशी येथून ठाण्याकडे येणाऱ्या अप ट्रान्स- हार्बर सेवा रद्द राहतील. बेलापूर-उरण मार्गावरील लोकल रविवारच्या वेळापत्रकानुसार चालवल्या जाणार आहे. गणेशोत्सवामुळे रविवारी १३ सप्टेंबर २०२६ रोजी

">पश्चिम रेल्वे
मार्गावर उपनगरीय विभागात कोणताही मेगा ब्लॉक घेण्यात येणार नाही.
Comments
Add Comment

Namo Express : ‘नमो एक्स्प्रेस’ आणि विशेष बसेसच्या माध्यमातून दीड हजारांहून अधिक भाविक कोकणाकडे रवाना

मुंबई: गणेशोत्सवानिमित्त मुंबईतील चाकरमान्यांना आपल्या गावच्या बाप्पाच्या दर्शनासाठी कोकणात जाता यावे,

Swarved Mahamandir Bhiwandi : भिवंडीतील गणेशोत्सवात साकारणार वाराणसीच्या 'स्वरवेद महामंदिर धाम'ची १२० फूट उंच भव्य प्रतिकृती

मुंबई : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) प्रसिद्ध वाराणसी येथील 'स्वरवेद महामंदिर धाम'ची (Swarved Mahamandir Dham) सुमारे १२० फूट उंच आणि

Mumbai Ganpati 2026 : गणपती उत्सवापूर्वी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी; सुरक्षिततेचा उपाय म्हणून मशीद आणि माटुंगा येथील चार पादचारी पूल बंद होणार

मुंबई:

Nafisa Joseph case : नफिसा जोसेफ आत्महत्या प्रकरण; मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, व्यावसायिक गौतम खंडजुआ खटल्याला सामोरे जाणार

मुंबई: प्र

Ganeshotsav 2026 : गणेश मंडळांसाठी FDAचे नवे नियम; प्रसादासाठीही बिल अन् FSSAI नोंदणी बंधनकारक

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांसाठी अन्न सुरक्षेशी संबंधित नियम अधिक कडक

Ratnakar Mahajan : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रत्नाकर महाजन यांचे निधन; 80 व्या वर्षी पुण्यात घेतला अखेरचा श्वास

पुणे : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे शनिवारी सकाळी निधन झाले. पुण्यातील राहत्या