- आमदार निलेश राणे यांचे आवाहन; कायदा-सुव्यवस्थेसाठी सरकारची तयारी, आंदोलकांनीही सहकार्य करावे
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईत आंदोलनासाठी येत असताना गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन होऊ नये, अशी अपेक्षा शिवसेना आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केली. आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे; मात्र मुंबईत आल्यानंतर सर्व नियमांचे पालन करावे आणि भाषेचे भान ठेवावे, असे आवाहनही त्यांनी केले. आंदोलन हे आंदोलनाच्या स्वरूपातच झाले पाहिजे, असे न्यायालयानेही म्हटले असल्याचे राणे यांनी सांगितले. (Nilesh Rane)
आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून गणेशभक्तांकरीता ‘शिवसेना एक्स्प्रेस’ शनिवारी कुडाळसाठी रवाना झाली. या गाडीला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राणे म्हणाले, जरांगे पाटील हे अनेकांचे नेते आहेत, त्याचप्रमाणे इतर नेतेही कोणासाठी तरी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे कोणत्याही नेत्याबद्दल वाईट भाषा वापरल्यास ती त्यांच्या समर्थकांप्रमाणेच आपल्यालाही सहन होणार नाही. त्यामुळे जरांगे यांनी आपली भाषा नीट ठेवावी, एवढीच आपली विनंती असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले. (Nilesh Rane)
इंदोर : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) इंदोर (Indoor News) येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका नामांकित हॉटेलमधील रूम नंबर १०१ मध्ये एका ब्युटीशियन ...
जरांगे पाटील यांच्या यापूर्वीच्या मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर यावेळीही कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना, सरकारने न्यायालयात आपली भूमिका स्पष्ट केली असल्याचे राणे यांनी सांगितले. मुंबईकरांची गैरसोय होऊ नये यासाठी सरकार सर्व तयारीने सज्ज असल्याचे महाधिवक्त्यांनी न्यायालयात सांगितले आहे. सरकारकडून कायदा-सुव्यवस्था आणि अन्य व्यवस्था नीट ठेवली जाईल; मात्र आंदोलकांकडूनही तेवढेच सहकार्य मिळणे आवश्यक आहे. दोन्ही बाजूंकडून सहकार्य झाले तर आंदोलनही त्यांना यशस्वीपणे करता येईल, असे राणे यांनी सांगितले. (Nilesh Rane)
- १३ आणि १४ सप्टेंबरला विविध कार्यक्रम; एशियाटिक सोसायटी, हिंदी राजभाषा संमेलनाला उपस्थित राहणार मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह १३ आणि १४ ...
दरम्यान, बहुचर्चित दिशा सालियन मृत्यू प्रकरणात तिच्या वडिलांचा सीबीआयने जबाब नोंदवून त्यात आदित्य ठाकरे आणि डिनो मोरिया यांची नावे घेतल्याच्या प्रश्नावर राणे यांनी भाष्य केले. ते म्हणाले, या प्रकरणात कोण आरोपी आहे किंवा कोणाचे नाव घ्यायचे, यावर आपण भाष्य करणार नसून हा विषय न्यायप्रविष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. सीबीआयने २०२० मधील मालवणी पोलिस ठाण्यातील नोंदी आणि पुरावे मागविल्याची माहिती आपल्याला असल्याचेही त्यांनी नमूद केले. संबंधित प्रक्रिया पूर्ण होऊ द्यावी आणि प्रकरण न्यायालयासमोर आल्यानंतरच कोण काय आहे, हे स्पष्ट होईल. त्यामुळे आपण स्वतःहून कोणावर आरोप करणे योग्य ठरणार नाही, असे राणे यांनी स्पष्ट केले. (Nilesh Rane)
उबाठा गट कोकणवासीयांना अगरबत्तीही देणार नाही
- ठाकरेंकडून सोडण्यात आलेल्या बसच्या उद्घाटनावेळी राज्यगीताचा अपमान झाल्याच्या प्रश्नावर निलेश राणे यांनी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यावर टीका केली. दोघेही अजून राजकारण समजून घेण्याच्या वयात असल्याचे सांगत, ‘ठाकरे’ आडनाव असल्यामुळे काहीही करता येते आणि कोणाचाही अपमान करता येतो, असा समज असल्याची टीका त्यांनी केली. आपले वय आणि समोरच्या नेत्यांचे वय याचे भान ठेवणे आवश्यक आहे. पराभव झाल्यानंतरही ते जमिनीवर आलेले नाहीत, अशी टीकाही राणे यांनी केली. - गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी शिवसेनेकडून मोफत रेल्वे आणि बसेसची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. त्याचवेळी दुसऱ्या शिवसेनेकडून (उबाठा गट) अशी कोणतीही सुविधा पुरवली जात नाही, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, ‘‘ते अगरबत्ती पण देणार नाहीत. तिथे फक्त इनकमिंग आहे, आउटगोइंग नाही,’’ असा टोला त्यांनी लगावला. - चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये यासाठी यंदा सरकारने ३५०हून अधिक अतिरिक्त गाड्या सोडल्या असल्याचे राणे यांनी सांगितले. शिवसेनेतर्फे जवळपास एक लाख कोकणवासी बस आणि रेल्वेने प्रवास करणार असल्याचा दावाही त्यांनी केला. तिकिटांच्या काळाबाजाराबाबत यापूर्वीच तक्रार करण्यात आली असून, या प्रकरणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक योग्य तो निर्णय घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.





