Yavatmal Accident : अंगावर काटा आणणारी घटना ! यात्रेत महिला आकाश पाळण्यात बसली, केस बेरिंगमध्ये अडकले अन् डोक्याची चामडीच...

Yavatmal Accident : यात्रा म्हटली की पाळणे आलेच. अनेकांना या रंगेबेरंगी, मोठमोठ्या पाळण्यात बसण्याचा मोह आवरत नाही पण याच पाळण्यामुळे अनेक दुर्दैवी घटना समोर आल्या आहे. अनेकांना तर जीवाला मुकावे लागले आहे. असे असले तरी अनेक पाळण्यातील सुरक्षेच्या उपाययोजनांकडे बऱ्याचदा दुर्लक्ष करत असल्याचं पहायला मिळतं. यवतमाळ जिल्ह्यातही अशी धक्कादायक घटना समोर आली जी ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल. तर महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथील पुणेश्वर मंदिराच्या पायथ्याशी भरलेल्या तान्हा पोळ्याच्या यात्रेत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आकाश पाळण्यात (Yavatmal News) बसलेल्या एका महिलेचे केस पाळण्याच्या बेरिंगमध्ये अडकल्याने त्यांच्या केसांसह डोक्याची चामडीच उपटून निघालीय. या भीषण अपघातात महिला गंभीर जखमी झाली आहे.(Yavatmal Accident News)



नेमकं काय घडलं ?


यवतमाळच्या महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथील पुणेश्वर मंदिराच्या पायथ्याशी आयोजित करण्यात आलेल्या तांन्हा पोळ्याच्या वेळी ही घटना घडली. आकाश पाळण्यात मोठ्या उत्साहात बसायला गेलेल्या महिलेचे केस थेट पाळण्याच्या बेरिंगमध्ये अडकल्याने केसांसह महिलेच्या डोक्याची चामडीही निघालीय.बाली मारोती टाळीकोटे असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. त्या तान्हा पोळ्याच्या निमित्ताने आयोजित यात्रेत फिरण्यासाठी आल्या होत्या. यात्रेचा आनंद घेण्यासाठी त्या आकाश पाळण्यात बसल्या असता, पाळणा वेगाने फिरत असताना अचानक त्यांचे केस पाळण्याच्या फिरत्या बेरिंगमध्ये अडकले. पाळण्याचा वेग जास्त असल्याने काही क्षणांतच केस जोराने ओढले गेले आणि त्यांच्या डोक्याची चामडी उपटली जाऊन त्यांना अत्यंत गंभीर दुखापत झाली. (Yavatmal Accident News)



महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत


घडलेला प्रकार उपस्थितांच्या लक्षात येताच यात्रेतील नागरिकांनी तात्काळ आरडाओरड करत पाळणा थांबवला. नागरिकांच्या मदतीने जखमी बाली टाळीकोटे यांना पाळण्यातून सुरक्षित बाहेर काढण्यात आले मात्र डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना तातडीने उपचारासाठी पुसद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे यात्रेतील आनंदाच्या वातावरणावर विरजण पडले असून नागरिकांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान आनंद उत्साह साजरा करताना काळजी घेणे किती महत्त्वाचे आहे हे या घटनेतून स्पष्ट होते.

Comments
Add Comment

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पावसाचे पुनरागमन, बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. मात्र आता राज्यातील हवामानात

Madhuri Elephant News : माधुरी हत्तीणीची अखेर घरवापसी; 48 तासांचा प्रवास करून नांदणीत दाखल, कोल्हापूरकरांनी उधळला गुलाल

कोल्हापूर : “आमची माधुरी आम्हाला परत आणून द्या” अशी मागणी करणाऱ्या कोल्हापूरकरांची लाडकी माधुरी हत्तीण अखेर

Disha Salian Case : आदित्य ठाकरे, डिनो मोरिया आणि सूरज पांचोलीला अटक करा!

- दिशा सालियनच्या वडिलांची मागणी; उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ‘सीबीआय’ने नोंदवला जबाब मुंबई : दिशा सालियन

Mumbai Pune Expressway: जादुई नंबरप्लेट लावणं भोवलं, फॉर्च्यूनर ड्रायव्हरला RTO चा दणका

पिंपरी चिंचवड: अलीकडेच सोशल मीडियावर मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर टेक्नॉलॉजी वापरून आरटीओ पोलिसांच्या

Farmer Loan Waiver Scheme 2026 : कर्जमुक्तीसाठी ३ लाख ५५ हजार ६१४ शेतकऱ्यांची दुसरी यादी जाहीर

मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची दुसरी यादी

Sangli News : कृष्णेच्या डोहात ८ फूट लांबीच्या मगरीचा वावर; औदुंबर घाटावर भाविकांची गर्दी

सांगली : औदुंबर येथील कृष्णा नदीच्या डोहात सध्या तब्बल ८ ते १० फूट लांबीची मगर वावरत असल्याचे दिसून येत आहे. दररोज