Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंच्या आंदोलनाला आझाद मैदान पोलिसांनी परवानगी नाकारली

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी १९ सप्टेंबरपासून आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्याची घोषणा केली असतानाच त्यांच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. दक्षिण मुंबईतील शाळा, रुग्णालये, व्यवसाय, न्यायपालिका आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचे कारण आझाद मैदान पोलिसांनी दिले आहे. गेल्या आंदोलनावेळी घालण्यात आलेल्या अटींचे उल्लंघन करून अपेक्षेपेक्षा अधिक आंदोलक जमल्याचाही दाखला पोलिसांनी दिला आहे. (Manoj Jarange Patil)


मनोज जरांगे पाटील हे २९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषणाला बसले आहेत. आंदोलन मागे घेण्यासाठी सरकारकडून मंत्री उदय सामंत, राधाकृष्ण विखे-पाटील तसेच आमदार प्रसाद लाड यांनी चर्चा आणि शिष्टाई करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मागण्यांबाबत समाधान न झाल्याने जरांगे यांनी आंदोलन सुरूच ठेवले. त्यानंतर आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत आंदोलन करण्याचा निर्णय त्यांनी घेतला असून १५ सप्टेंबरला अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने निघण्याची घोषणा केली आहे. १९ सप्टेंबरपासून आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्याचा त्यांचा नियोजित कार्यक्रम आहे. (Manoj Jarange Patil)



या आंदोलनासाठी परवानगी मिळावी यासाठी जरांगे यांच्या वतीने मराठा आंदोलकांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे पत्राद्वारे मागणी केली होती. आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्यात येईल तसेच पोलिसांनी घातलेल्या सर्व अटी-शर्तींचे पालन केले जाईल, असे हमीपत्रही देण्यात आले होते. मात्र, आझाद मैदान पोलीस ठाण्याने ही मागणी फेटाळली आहे.


आझाद मैदान पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू बिडकर यांनी संबंधित पत्रात दक्षिण मुंबईतील सामान्य व्यवहारांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. शाळा, रुग्णालये, व्यवसाय, न्यायपालिका, सार्वजनिक वाहतूक आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बाधित होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आझाद मैदान येथे आमरण उपोषण आणि आंदोलन करण्यास मागितलेली परवानगी नाकारण्यात येत असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. (Manoj Jarange Patil)



गेल्या वेळी जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन केले होते, त्यावेळी निर्माण झालेल्या परिस्थितीचाही पोलिसांनी दाखला दिला आहे. सीएसएमटी परिसर तसेच महानगरपालिका मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवावा लागला होता. मोठ्या संख्येने मराठा आंदोलक रस्त्यावर उतरल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता, असे पोलिसांनी नमूद केले आहे. (Manoj Jarange Patil)


गेल्या आंदोलनावेळी पोलिसांनी काही अटी-शर्तींसह आझाद मैदानावर आंदोलनाला परवानगी दिली होती. त्यावेळी आझाद मैदानावर पाच हजार आंदोलक जमण्याची मर्यादा घालण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात या संख्येपेक्षा अधिक आंदोलक जमल्याचा पोलिसांचा दावा आहे. याच पार्श्वभूमीवर यावेळी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आल्याचे समोर आले आहे. (Manoj Jarange Patil)

Comments
Add Comment

Central Railway : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत! कल्याणमध्ये ओव्हरहेड वायर बिघाडामुळे प्रवाशांचा खोळंबा

मुंबई : मध्य रेल्वेच्या मार्गावरील लोकल सेवा तांत्रिक बिघाडामुळे विस्कळीत झाली आहे. कल्याण रेल्वे स्थानकाजवळ

Amit Shah : भाषा-संस्कृती जपणारे राष्ट्र कधीही गुलाम होत नाही!

- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह; ‘डी-कोलोनायझेशन’ म्हणजे इतिहास पुसणे नव्हे, भारतीय दृष्टिकोनातून तो पुन्हा

ST Bus News: 'एसटी'कडून ५ हजार बसेसची निविदा प्रक्रिया पूर्ण, ग्रामीण महाराष्ट्राच्या लोकवाहिनीला मिळणार नवी ताकद

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात ५ हजार नव्या ‘लालपरी’ दाखल होण्याचा मार्ग

Bhiwandi Crime : वर्षभर अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी भिवंडीतील मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हला अटक

ठाणे : अल्पवयीन विद्यार्थिनीवर दीर्घकाळ लैंगिक अत्याचार केल्याच्या गंभीर आरोपावरून नरपोली पोलिसांनी २६ वर्षीय

Amitabh Bachchan News: बिग बी बच्चन यांची अजूनही 'ती' एक इच्छा अपूर्णच; म्हणाले, “…याच गोष्टीचं वाईट वाटतं.”

मुंबई: 'कौन बनेगा करोडपती'च्या १८ व्या सीझनला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या शोच्या होस्टिंगची

Strait of Hormuz : इराण आणि ओमानमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीच्या नव्या मार्गांवर सहमती; मध्यपूर्वेतील तणावात महत्त्वाची घडामोड

तेहरान: