ठाणे : अल्पवयीन विद्यार्थिनीवर दीर्घकाळ लैंगिक अत्याचार केल्याच्या गंभीर आरोपावरून नरपोली पोलिसांनी २६ वर्षीय मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हला अटक केली आहे. काशेळी परिसरात राहणाऱ्या अमित रामदावन प्रजापती याच्यावर वर्षभराहून अधिक काळ पीडितेचे लैंगिक शोषण केल्याचा तसेच तिच्या कुटुंबीयांना धमकावल्याचा आरोप आहे. (Bhiwandi Crime)
पोलिसांकडे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, आरोपीने संबंधित अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याचे सांगण्यात आले आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतरही कुटुंबीयांनी याबाबत कोणतीही कारवाई करू नये, यासाठी त्यांच्यावर दबाव आणल्याचा आरोप आहे. इतकेच नव्हे, तर प्रकरण मिटवण्यासाठी आरोपीने कुटुंबीयांना तब्बल ६ लाख रुपये देण्याची ऑफर दिल्याचाही दावा करण्यात आला आहे. (Bhiwandi Crime)
मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने प्रवाशांसाठी आणखी चार अनारक्षित विशेष फेऱ्या जाहीर ...
या प्रकारामुळे घाबरलेल्या कुटुंबीयांनी सामाजिक कार्यकर्ते डॉ. बिनू वर्गीस यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या निदर्शनास संपूर्ण घटना आणून दिली. त्यानंतर नरपोली पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतले. (Bhiwandi Crime)
या प्रकरणात भारतीय न्याय संहितेतील बलात्कार आणि गुन्हेगारी धमकीशी संबंधित कलमांसह पॉक्सो कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून आता या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, आरोपीला न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. (Bhiwandi Crime)
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी १९ सप्टेंबरपासून आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्याची घोषणा केली असतानाच त्यांच्या ...
दरम्यान, अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचे प्रकरण दडपण्यासाठी पीडित कुटुंबावर दबाव आणणे, धमकावणे किंवा पैशांचे आमिष दाखवणे याबाबतही पोलिसांकडून स्वतंत्रपणे तपास केला जात आहे. या प्रकरणातील सर्व बाबींची पडताळणी करून पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. (Bhiwandi Crime)