WTC Points Table : इंग्लंडचा पाकिस्तानवर ३-० ने विजय; इंग्लंड सहाव्या स्थानावर कायम, तर पाकिस्तान नवव्या स्थानावर तळाशी

नवी दिल्ली: इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत पाकिस्तानला आणखी एका दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. बर्मिंगहॅम येथे खेळवल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा आठ गडी राखून पराभव केला. या विजयासह इंग्लंडने मालिका ३-० ने आपल्या नावावर केली असून पाकिस्तानच्या अडचणीत मोठी भर पडली आहे. या मालिकेनंतर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (WTC) गुणतालिकेत मोठे फेरबदल पाहायला मिळाले आहेत.( WTC Points Table)



इंग्लंड आणि पाकिस्तानची स्थिती


पाकिस्तानविरुद्धच्या या दणदणीत विजयानंतर इंग्लंडच्या संघाने गुणतालिकेत आपली स्थिती मजबूत केली आहे. इंग्लंडचा संघ १६ सामन्यांतून ७ विजय, ८ पराभव आणि १ बरोबरीसह ७४ गुण आणि ३८.५४ टक्केवारीसह (PCT) सहाव्या स्थानावर कायम आहे. दुसरीकडे, पाकिस्तानची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली असून, ते ९ सामन्यांतून केवळ २ विजय आणि ७ पराभवांसह १६ गुण आणि १४.८१ टक्केवारीसह गुणतालिकेत नवव्या स्थानावर म्हणजेच तळाशी आहेत.( WTC Points Table)



जागतिक कसोटी चॅम्पियनशिपची (WTC) सद्यस्थिती:




  • ऑस्ट्रेलिया: ८०% विजय टक्केवारीसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.




  • दक्षिण आफ्रिका: ७५% विजय टक्केवारीसह संघ दुसऱ्या स्थानावर आहे.




  • न्यूझीलंड: ७२.२२% विजय टक्केवारीसह तिसऱ्या स्थानावर विराजमान आहे.




  • बांगलादेश: ५५.५६% विजय टक्केवारीसह चौथ्या स्थानावर आहे.




  • भारत: ५१.५२% विजय टक्केवारीसह पाचव्या स्थानावर कायम आहे.




  • इंग्लंड: ३८.५४% विजय टक्केवारीसह सहाव्या स्थानावर आहे.




  • श्रीलंका: ३३.३३% विजय टक्केवारीसह सातव्या स्थानावर आहे.




  • पाकिस्तान: १४.८१% विजय टक्केवारीसह नवव्या (तळाच्या) स्थानावर फेकला गेला आहे.



Comments
Add Comment

World Record: T20 मध्ये नवा इतिहास, दिग्गज गोलंदाजही मागे; राशिद खानचा क्रिकेट विश्वात नवा विक्रम

[caption id="attachment_1070550" align="aligncenter" width="800"] अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू रशीद खानने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक नवा

न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या टी20 सामन्यात श्रेयस अय्यरच्या नावावर अनोखा विक्रम, असं यापूर्वी कधीच घडलं नाही

[caption id="attachment_1070541" align="aligncenter" width="800"] न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेत श्रेयस अय्यरचं नशिब जोरदार असल्याचं दिसत आहे. खरं तर

गौतम गंभीरसाठी IPL च्या 4 संघांमध्ये मोठी चुरस; एका फ्रँचायझीसोबत चर्चा देखील सुरू!

Gautam Gambhir: टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचा भारतासोबतचा करार 2027 च्या वनडे वर्ल्ड कपपर्यंत आहे, परंतु

IND vs NZ 4th T20: न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात अर्शदीप सिंगचं दीड शतक, मिचेल सँटनरला केलं शिकार

[caption id="attachment_1070515" align="aligncenter" width="800"] भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी20 मालिका सुरू असून धडाधड विक्रम रचले गेले आहे. आतापर्यंत

Hong Kong Sixes: शशांक सिंगची फटकेबाजी; मात्र भारताला पाकिस्तानविरुद्ध विजयाने हुलकावणी

हॉंगकॉंग : हॉंगकॉंग इंटरनॅशनल सिक्सेस स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील 'क' गटातील सामना चांगलाच रंगला.

IND vs NZ: प्रसिद्ध कृष्णाची वनडे संघातून थेट भारत 'A' मध्ये रवानगी; जाणून घ्या मोहम्मद सिराजबाबत काय ठरलं?

[caption id="attachment_1070498" align="aligncenter" width="800"] भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर असून वनडे मालिकेपूर्वी भारतीय संघाच्या निवड समितीने एक