प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री ४१ व्या वर्षी होणार दुसऱ्यांदा आई, बेबी बंप शेअर करत दिली 'गुड न्यूज'

मुंबई: पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान दुसऱ्यांदा आई होणार आहे. तिने सोशल मीडियावरुन चाहत्यांना 'गुड न्यूज' दिली आहे. वयाच्या ४१ व्या वर्षी माहिरा खान आई होणार आहे. तिने काही तासांपूर्वीच इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केलेली आहे. तिने शेअर केलेल्या पोस्टवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. बॉलिवूडच्या किंग खान अर्थात शाहरूख खानसोबत तिने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. शाहरूख आणि माहिराने 'रईस' चित्रपटामध्ये एकत्रित काम केलं होतं. तिचा भारतामध्ये फार मोठ्या प्रमाणावर चाहतावर्ग आहे.



माहिराने काही तासांपूर्वी इन्स्टाग्रामवर बेबी बंप असलेला फोटो शेअर केला. शेअर केलेल्या फोटोमध्ये अभिनेत्रीने व्हाईट कलरचा गाऊन वेअर केलेला दिसत आहे. इन्स्टाग्रामवर चाहत्यांना 'गुड न्यूज' देताना “आपण काही प्लॅन बनवतो आणि अल्लाहचे काही प्लॅन असतात.” असं कॅप्शन दिला आहे. अभिनेत्रीच्या ह्या फोटोंवर चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. अभिनेत्रीने २०२३ साली उद्योजक सलीम करीमसोबत दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली होती. लग्नाच्या काही वर्षांनंतर ते पहिल्यांदाच आई- बाबा होणार आहेत.

 



माहिराने पहिले लग्न २००७ साली अली असकारी यांच्याबरोबर केले होते. त्यांना अजलान नावाचा एक मुलगा सुद्धा आहे. पण २०१५ मध्ये, दोघांनीही एकमेकांपासून घटस्फोट घेत वेगळा होण्याचा निर्णय घेतला. माहिरा खान पाकिस्तान सोबतच भारतातही लोकप्रिय आहे. तिचा दोन्हीही देशामध्ये मोठ्या प्रमाणावर चाहतावर्ग आहे. तिने २०११ मध्ये 'बोल' या चित्रपटातून आपल्या फिल्मी करियरची सुरुवात केली. २०१७ साली माहिराने शाहरुख खानसोबत 'रईस' चित्रपटामध्ये काम केलं होतं. तिने 'ॲक्टर इन लॉ', '7 दिन मोहब्बत इन', 'बिन रोये', 'मंटो', 'सुपरस्टार', 'द लीजेंड ऑफ मौला जट', 'निलोफर', 'लव्ह गुरू' आणि 'आग लगे बस्ती में' यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केले आहे. ती आता 'मिर्झा जट' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Comments
Add Comment

Bandkhor Movie : ‘बंडखोर’ चित्रपटाची टीम पोहोचली महिला रिक्षाचालकांच्या भेटीला

मुंबई : घराची जबाबदारी पेलत रिक्षाचं स्टेअरिंग हाती घेऊन स्वावलंबी झालेल्या महिला रिक्षाचालकांच्या संघर्षाला

Trisha Vijay Viral Video : लंडनमध्ये विजय-त्रिशा पुन्हा एकत्र दिसले! सिल्व्हरस्टोन रेसिंगमधील व्हिडीओ व्हायरल

अभिनेत्री त्रिशा कृष्णन आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय थलपती पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.

Amitabh Bachchan News: बिग बी बच्चन यांची अजूनही 'ती' एक इच्छा अपूर्णच; म्हणाले, “…याच गोष्टीचं वाईट वाटतं.”

मुंबई: 'कौन बनेगा करोडपती'च्या १८ व्या सीझनला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या शोच्या होस्टिंगची

Hanuman Ansh Oscar: 'हनुमान अंश'ची थोडक्यात ऑस्करवारी मुकली, निर्मात्यांनी सर्व काही सांगितलं

मुंबई: विशाल चतुर्वेदी दिग्दर्शित 'हनुमान अंश' चित्रपटाची सध्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुफान चर्चा सुरू आहे.

Bollywood News : करीना कपूरचा ‘दायरा’ की कुणाल खेमूचा ‘व्हाइब’? दोन्ही सिनेमांना ‘A’ सर्टिफिकेट; १८ सप्टेंबरला कोण मारणार बाजी?

मुंबई : करीना कपूर खान आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्या प्रमुख भूमिका असलेला मेघना गुलजार दिग्दर्शित ‘दायरा’ आणि

CINTAA Controversy : कलाकारांमध्येच पेटला वाद! पूनम-पद्मिनी-कुनिकाचा CINTAA कार्यालयातील व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?

मुंबई : मुंबईतील सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनच्या (CINTAA) कार्यालयात कलाकारांमध्ये जोरदार वाद झाल्याची घटना