अभिनेत्री त्रिशा कृष्णन आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय थलपती पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. दोघांचे काही नवे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यातून त्यांची लंडनमधील उपस्थिती चर्चेत आली आहे. विशेष म्हणजे, दोघेही एकाच वेळी लंडनमध्ये असून एकाच ठिकाणी दिसून आले आहेत. मात्र, यावेळी त्यांच्या भेटीपेक्षा व्हायरल झालेल्या व्हिडीओतील एका वेगळ्याच गोष्टीने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. (Trisha Vijay Viral Video)
तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय थलपती हे लंडनमधील सिल्व्हरस्टोन रेसिंगमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. याच ठिकाणी अभिनेत्री त्रिशा कृष्णनही दिसून आली. ती एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी लंडनमध्ये असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, सिल्व्हरस्टोन रेसिंगदरम्यान विजय आणि त्रिशा एकाच ठिकाणी दिसल्याने त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (Trisha Vijay Viral Video)
मुंबई : मध्य रेल्वेच्या मार्गावरील लोकल सेवा तांत्रिक बिघाडामुळे विस्कळीत झाली आहे. कल्याण रेल्वे स्थानकाजवळ ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्याने लोकल ...
व्हायरल व्हिडीओमध्ये विजय रेस पाहण्यासाठी उभे असल्याचे दिसते. त्याचवेळी त्रिशा त्यांच्या जवळ येऊन खाली वाकून काहीतरी पाहताना दिसते. त्रिशा जवळ येताच विजय मागे सरकताना आणि तिच्यापासून अंतर ठेवताना दिसतात. या काही सेकंदांच्या व्हिडीओने सोशल मीडियावर पुन्हा चर्चेला उधाण आलं आहे.(Trisha Vijay Viral Video)
विजय यांच्या पत्नी संगीता यांनी घटस्फोटाचा अर्ज मागे घेतल्यानंतर विजय आणि त्रिशा दुसऱ्यांदा एकाच ठिकाणी दिसले आहेत. याआधी १५ ऑगस्ट रोजी विजय यांच्या उपस्थितीत झालेल्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला त्रिशाने त्यांच्या कुटुंबीयांसह हजेरी लावली होती. आता लंडनमधील या व्हिडीओमुळे दोघांच्या उपस्थितीची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.(Trisha Vijay Viral Video)
- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह; ‘डी-कोलोनायझेशन’ म्हणजे इतिहास पुसणे नव्हे, भारतीय दृष्टिकोनातून तो पुन्हा मांडणे मुंबई : “आपली भाषा, संस्कृती, स्मृती, ...
दरम्यान, लंडनमधून विजय यांचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये ते मोटरस्पोर्टशी संबंधित अभिनेते अजित कुमार यांची भेट घेताना दिसत आहेत. अभिनयासोबतच अजित कुमार मोटरस्पोर्टमध्येही सक्रिय असून, ते या रेसमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. अजित कुमार यांना पाहताच विजय त्यांच्याकडे धावत गेले आणि दोघांनीही एकमेकांची गळाभेट घेतली. या भेटीचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. (Trisha Vijay Viral Video)