Mayor's Residence Ganpati : महापौर निवासस्थानी बाप्पाचे भक्तिभावाने आगमन; पालिका शाळेतील विद्यार्थ्याच्या कलेचा विशेष सन्मान



मुंबई : श्री गणेश चतुर्थीच्या पावन पर्वावर मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या शासकीय निवासस्थानी विघ्नहर्त्या गणरायाची अत्यंत मंगलमय वातावरणात प्रतिष्ठापना करण्यात आली. दीड दिवसांच्या या लाडक्या बाप्पाच्या आगमनाने संपूर्ण परिसरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.(Mayor's Residence Ganpati)



पर्यावरणपूरकतेला विशेष प्राधान्य


महापौर निवासस्थानावरील गणेशोत्सवाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे पर्यावरणपूरकतेला दिलेले प्राधान्य आहे. येथे विराजमान झालेली  गणेशाची मूर्ती शाडू मातीची असून, सजावट व आरास देखील विविध फुले आणि पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून साकारण्यात आली आहे.(Mayor's Residence Ganpati)



महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्याच्या कलेचा सन्मान


या सोहळ्याचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे प्रभादेवी महानगरपालिका शाळेतील इयत्ता दुसरीचा विद्यार्थी रितिक पासवान याने स्वतःच्या हाताने बनवलेली छोटी शाडू मातीची गणेशमूर्ती. मागील आठवड्यात रितिकने ही मूर्ती महापौरांना भेट दिली होती. या बालसुलभ कलेचा आणि भावनेचा सन्मान राखत, महापौरांनी रितिकच्या हाताने घडवलेल्या बाप्पाचीही आपल्या निवासस्थानी प्रतिष्ठापना केली. याप्रसंगी रितिक आणि त्याची आई उपस्थित होते. आपल्या हाताने साकारलेला बाप्पा थेट महापौरांच्या घरी पुजला जात असल्याचे पाहून रितिक व त्याच्या मातेचा आनंद गगनात मावत नव्हता.(Mayor's Residence Ganpati)


या प्रसंगी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महापौर रितू तावडे यांनी महाराष्ट्राचा राज्य महोत्सव असलेल्या गणेशोत्सवाच्या नागरिकांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. लाडका बाप्पा मुंबई नगरीवर आपली कृपादृष्टी ठेवो आणि प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, समृद्धी अन् उत्तम आरोग्यमयी जीवन देवो, अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली.(Mayor's Residence Ganpati)




Comments
Add Comment

Nitesh Rane: समुद्री पर्यावरणाचे नुकसान होऊ देणार नाही; 20 होर्डिंग्ज उभारण्याचे वृत्त दिशाभूल करणारे

मुंबई: मुंबईच्या किनारपट्टीवर तब्बल 20 ठिकाणी फ्लोटिंग होर्डिंग्ज उभारण्यात येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले

CMO Devendra Fadnavis: महाराष्ट्राच्या सर्वसमावेशक विकासासाठी टाटा कॅपिटलचे सामाजिक उत्तरदायित्व उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार

मुंबई : महाराष्ट्राच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी शासनासोबत उद्योग क्षेत्राचा सक्रिय सहभाग अत्यंत

WhatsApp Scam: व्हॉट्सॲपवर पैसे कमावण्याचा मेसेज येतोय? सावधान! एका चुकीमुळे बँक खातं होऊ शकतं रिकामं

मुंबई: आजच्या डिजिटल युगात स्मार्टफोन आणि WhatsApp चा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याचाच फायदा घेत सायबर गुन्हेगार

Mumbai Rain : अर्णब चक्रीवादळाचा मुंबईला फटका; विविध भागांत पावसाला सुरुवात

Mumbai Weather: मुंबईत शुक्रवारी (30 ऑक्टोबर) सकाळी अवकाळी पावसाच्या हलक्या सरी आणि धुरकट वातावरणाचा अनुभव आला. दादर,

Bandra Fire : वांद्रे पश्चिमेतील व्हीएन स्फिअर मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी

Mumbai News: मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरातील लिंकिंग रोडवरील व्हीएन स्फिअर मॉलमध्ये शुक्रवारी (30 ऑक्टोबर) सकाळी आग

Dadar Station Hawkers : दादर रेल्वे स्थानकाला पुन्हा एकदा फेरीवाल्यांचा विळखा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील फेरीवाल्यांना क्यु आर कोड आधारीत ओळखपत्र देण्यात आल्यानंतर रेल्वे