Monday, September 14, 2026

Ganeshotsav 2026 : गणेश विसर्जनासाठी मुंबईकरांनो सावधान! भरती-ओहोटीच्या वेळा तपासूनच समुद्रात उतरावे

Ganeshotsav 2026 : गणेश विसर्जनासाठी मुंबईकरांनो सावधान! भरती-ओहोटीच्या वेळा तपासूनच समुद्रात उतरावे
मुंबई :णरायाच्या आगमनाने मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवाला आजपासून सुरुवात होत आहे. यंदा गणेश चतुर्थी १४ सप्टेंबरला असून अनंत चतुर्दशी २५ सप्टेंबरला आहे. मुंबईत मोठ्या संख्येने गणेशमूर्तींचे समुद्रात विसर्जन केले जाते. त्यामुळे विसर्जनाच्या दिवशी समुद्राची भरती-ओहोटी आणि हवामानाची स्थिती लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. समुद्राला भरती असताना लाटांची उंची मोठ्या प्रमाणात वाढू शकते. त्यामुळे गणेशभक्तांनी समुद्रकिनारी उतरताना प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. विशेषतः मोठ्या मूर्तींच्या विसर्जनावेळी लाटांचा जोर, पाण्याची पातळी आणि समुद्राची स्थिती लक्षात घेणे गरजेचे आहे.(Ganeshotsav 2026)

दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन

दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन १५ सप्टेंबरला होणार आहे. मुंबईच्या टाइड डेटानुसार या दिवशी दुपारी सुमारे २.०५ ते २.१५ वाजण्याच्या दरम्यान भरती असून लाटांची उंची सुमारे ४ मीटरपर्यंत राहू शकते. त्यानंतर रात्री सुमारे ८.०६ वाजता ओहोटी येईल. त्यामुळे विसर्जनासाठी समुद्रात उतरण्यापूर्वी स्थानिक प्रशासनाच्या सूचनांकडे लक्ष देणे आवश्यक आहे.(Ganeshotsav 2026)

पाच दिवसांचा गणपती

१८ सप्टेंबरला पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन होईल. या दिवशी दुपारी सुमारे ३.३० वाजता भरती असून लाटांची उंची सुमारे ३.२ मीटर राहण्याचा अंदाज आहे. रात्री सुमारे १० वाजता ओहोटी येईल.(Ganeshotsav 2026)

गौरी-गणपती आणि सातवा दिवस

१९ सप्टेंबरला गौरी-गणपती विसर्जन होणार आहे. तर सातव्या दिवसाचे विसर्जन २० सप्टेंबरला होईल. २० सप्टेंबरला सकाळी सुमारे ७ वाजता भरती असून लाटांची उंची ३ मीटरपेक्षा अधिक राहू शकते. संध्याकाळी पुन्हा भरती येण्याची शक्यता आहे.(Ganeshotsav 2026)

अनंत चतुर्दशीला मोठी भरती

यंदाची अनंत चतुर्दशी २५ सप्टेंबरला आहे. या दिवशी सकाळी ११.०७ वाजता सुमारे ४.११ मीटरची भरती, तर संध्याकाळी ५.१६ वाजता ओहोटी आणि रात्री ११.२६ वाजता पुन्हा सुमारे ४.०१ मीटरची भरती अपेक्षित आहे. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीदरम्यान समुद्रकिनारी विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे. दरम्यान, गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत मोठी गर्दी होणार असल्याने प्रशासनाकडून विविध ठिकाणी सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेची तयारी करण्यात आली आहे. समुद्रात विसर्जन करताना नागरिकांनी जीविताच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.(Ganeshotsav 2026)
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >