मुंबई : Apple ने भारतातील पात्र iPhone वापरकर्त्यांसाठी iOS 27 अपडेट जारी करण्यास सुरुवात केली आहे. या नव्या अपडेटमध्ये कंपनीच्या बहुप्रतीक्षित Siri AI, Apple Intelligence मधील नवीन फीचर्स, कार्यक्षमतेतील सुधारणा आणि इंटरफेसमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे iPhone वापरकर्त्यांना अधिक स्मार्ट आणि वैयक्तिक (personalized) अनुभव मिळणार आहे. (Apple iOS 27)
Siri AI मध्ये मोठा बदल
iOS 27 मधील सर्वात महत्त्वाचे आकर्षण म्हणजे Siri AI. Apple Intelligence वर आधारित नवीन Siri आता अधिक नैसर्गिक आणि सलग संभाषण करू शकते. वापरकर्त्याने आधी विचारलेल्या प्रश्नांचा संदर्भ लक्षात ठेवून पुढील प्रश्नांची उत्तरे देणे, स्क्रीनवर दिसणारी माहिती समजून घेणे आणि Mail, Messages तसेच Photos मधील वैयक्तिक संदर्भ वापरणे यासारख्या सुविधा यात देण्यात आल्या आहेत. (Apple iOS 27)
नवीन Siri ला स्वतंत्र अॅपचे स्वरूपही देण्यात आले आहे. भविष्यात थर्ड-पार्टी अॅप्ससोबत अधिक सहजपणे काम करता यावे, यासाठी ही सुविधा तयार करण्यात आली आहे.
‘आम्हाला आशा आहे, तुम्ही इथे अभिनय करत नाही’! राजपाल यादवच्या केसवर CJI सूर्यकांतांची मिश्कील टिप्पणी मुंबई : बॉलिवूड अभिनेता आणि कॉमेडियन राजपाल ...
AI फीचर्ससह फोटो एडिटिंगमध्येही सुधारणा
iOS 27 मध्ये AI आधारित नवीन फोटो एडिटिंग टूल्स देण्यात आली आहेत. यामध्ये Spatial Reframing आणि सुधारित Clean Up टूलचा समावेश आहे. याशिवाय कॅमेरा व्ह्यूफाइंडरमधून Siri-सक्षम Visual Search करता येणार आहे. (Apple iOS 27)
बाल-सुरक्षेसाठीही Apple ने नवीन नियंत्रणे दिली असून, पालकांना मुलांकडून iPhone चा वापर अधिक प्रभावीपणे व्यवस्थापित करता येणार आहे. (Apple iOS 27)
भारतीय वापरकर्त्यांना मिळणार अनेक AI फीचर्स
Writing Tools, Genmoji, Image Playground, Mail आणि Messages मधील सारांश, Voicemail Summary, Siri चे Product Knowledge, Type to Siri आणि Dictation यांसारखी अनेक AI फीचर्स भारतीय वापरकर्त्यांसाठीही उपलब्ध असतील. (Apple iOS 27)
मात्र, Siri AI सुरुवातीला केवळ इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे. इतर भाषांसाठी पुढील काळात समर्थन दिले जाणार असल्याचे Apple ने सांगितले आहे. (Apple iOS 27)
मुंबई : ॲपलने अखेर आपला बहुप्रतीक्षित पहिला फोल्डेबल आयफोन ‘iPhone Duo’ ९ सप्टेंबर २०२६ रोजी सादर केला. $१,९९९ पासून सुरू होणाऱ्या या प्रीमियम फोनने त्याच्या ...
कोणत्या iPhone वर मिळणार iOS 27?
iOS 27 हे iPhone 11 आणि त्यानंतरच्या मॉडेल्ससह दुसऱ्या पिढीच्या iPhone SE वर उपलब्ध आहे. मात्र, संपूर्ण Siri AI आणि Apple Intelligence फीचर्ससाठी अधिक शक्तिशाली हार्डवेअरची आवश्यकता आहे. (Apple iOS 27)
पूर्ण AI फीचर्ससाठी पात्र मॉडेल्स :
iPhone 15 Pro iPhone 15 Pro Max iPhone 16 आणि त्यानंतरची मॉडेल्स
iPhone 11 ते iPhone 14 आणि स्टँडर्ड iPhone 15 वर 'iOS 27' इन्स्टॉल करता येईल; मात्र त्यांना संपूर्ण 'Siri AI' अनुभव मिळणार नाही.
महिला बचत गटांना अन्न सुरक्षा प्रशिक्षण मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या नियोजन विभागांतर्गत महिला व बालकल्याण विभागाच्या ...
परफॉर्मन्समध्येही मोठी सुधारणा
Apple च्या माहितीनुसार, iOS 27 मुळे अॅप्स ३० टक्क्यांपर्यंत वेगाने सुरू होऊ शकतात. Photos मधील कंटेंट ७० टक्क्यांपर्यंत वेगाने लोड होऊ शकतो, तर AirDrop ट्रान्सफर ८० टक्क्यांपर्यंत वेगाने होऊ शकतात. (Apple iOS 27)
याशिवाय Liquid Glass इंटरफेसमध्ये सुधारणा करण्यात आली असून Safari, Camera, Photos, Maps आणि Find My या अॅप्समध्येही बदल करण्यात आले आहेत.
iPhone मध्ये iOS 27 अपडेट कसे कराल?
iOS 27 अपडेट करण्यासाठी Settings > General > Software Update येथे जा. अपडेट उपलब्ध झाल्यानंतर Update वर टॅप करून स्क्रीनवरील सूचनांचे पालन करा. अपडेट करण्यापूर्वी महत्त्वाच्या डेटाचा बॅकअप घेणे आणि फोन स्थिर Wi-Fi नेटवर्कला जोडणे योग्य ठरेल. (Apple iOS 27)
Apple ने १४ सप्टेंबरपासून जागतिक स्तरावर अपडेट रोलआउट करण्यास सुरुवात केली आहे. भारतात ते कंपनीच्या नेहमीच्या वेळेनुसार रात्री साडेदहाच्या सुमारास उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. सुरुवातीला मोठ्या प्रमाणावर डाउनलोड होत असल्याने अपडेट दिसण्यासाठी किंवा डाउनलोड होण्यासाठी काही वेळ लागू शकतो. (Apple iOS 27)




