Ganpati miravnuk accident : छत्रपती संभाजीनगरमधील भीषण अपघात; गणपती मिरवणुकीत कंटेनर घुसल्याने दोन गणेशभक्त ठार, १२ जण जखमी

छत्रपती संभाजीनगर: गणपती बाप्पाच्या आगमनाच्या उत्साहात आणि आनंदा वातावरणात सुरू असलेल्या मिरवणुकीत एका भरधाव कंटेनरने शिरकाव केल्याने भीषण दुर्घटना घडली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या चितेपिंपळगाव-कर्माड मार्गावरील पिंप्रीराजा गावाजवळ ही दुर्दैवी घटना घडली. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले असून, एका ७ वर्षांच्या चिमुकल्यासह १२ जण गंभीर जखमी झाले आहेत.(Ganpati miravnuk accident)



नेमकी घटना कशी घडली?


पिंप्रीराजा गावाजवळ गणेशमूर्ती स्थापनेची मिरवणूक अत्यंत उत्साहात सुरू होती. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने आसमंत दुमदुमून गेला होता. मात्र, यादरम्यान अचानक एका भरधाव कंटेनरवरील चालकाचे नियंत्रण सुटले. घटनास्थळापासून १०० मीटर अंतरावरूनच हा कंटेनर तीन गतिरोधक ओलांडून आणि झेंड्याचा चबुतरा तोडत थेट मिरवणुकीत शिरला. वाटेत एका दुचाकीला फरफटत नेत हा कंटेनर थेट गणेशभक्तांवर चालला गेला. या अचानक घडलेल्या भीषण अपघातामुळे आनंदाचे वातावरण क्षणात आक्रोशात आणि किंकाळ्यांमध्ये बदलले.(Ganpati miravnuk accident)



मृत आणि जखमींची माहिती


या अपघातात प्राण गमावलेल्या गणेशभक्तांची नावे खालीलप्रमाणे आहेत:





  • विठ्ठल रामभाऊ जाधव (वय ४९, रा. पिंप्रीराजा)




  • रमेश लहूजी बनसोडे (वय ४५, रा. पिंप्रीराजा) - हे स्वतः एक ट्रकचालक असून गणेशोत्सवासाठी गावी आले होते.




जखमींवर उपचार: अपघातात जखमी झालेल्या एकूण १२ जणांवर सध्या जिल्हा रुग्णालय आणि घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी एका ७ वर्षांच्या लहान मुलासह दोघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे समजते.(Ganpati miravnuk accident)



संताप आणि हळहळ


या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच शोककळा पसरली आहे. घटनेनंतर संतप्त जमावाने भरधाव कंटेनरचा चालक किशोर घुले याला बेदम मारहाण केली. ऐन सणासुदीच्या काळात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून, निष्पाप नागरिकांच्या मृत्यूने हळवे वातावरण निर्माण झाले आहे.(Ganpati miravnuk accident)

Comments
Add Comment

PM Kisan Samman Nidhi News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसानच्या 24 व्या हप्त्याचे वितरण; महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी 'पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना'चा 24 वा हफ्ता वितरित

Indapur News : इंदापूरमध्ये उड्डाणपुलाच्या कामादरम्यान मातीचा ढिगारा कोसळला; एक कामगार ठार, एक गंभीर

Pune News: पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील बिजवडी येथे उड्डाणपुलाच्या कामादरम्यान मोठी दुर्घटना घडली.

Maharashtra Weather : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता; हवामान विभागाचा इशारा

Weather News: ऑक्टोबर महिना संपत आला असतानाच राज्यातील हवामानात पुन्हा बदल होताना दिसत आहे. काही भागांत ढगाळ वातावरण आणि

Devendra Fadnavis : मुंबईत व्यंगचित्रकारांच्या कलेचे स्वतंत्र दालन उभारणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

Mumbai News: महाराष्ट्रातील व्यंगचित्रकलेचा समृद्ध वारसा जपण्यासाठी मुंबईत व्यंगचित्रकारांच्या कलाकृतींचे

Central Railway: मध्य रेल्वेचा ऐतिहासिक टप्पा; अहिल्यानगर-येवला विभागात 'कवच 4.0' ची सुरक्षा तपासणी यशस्वी!

मुंबई: मध्य रेल्वेने रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणखी एक मोठी मजल मारली आहे. दिनांक 24 आणि 25 ऑक्टोबर

अहिल्यानगरमध्ये ग्रीन वेस्ट डम्पिंग यार्डला भीषण आग! परिसरात धुराचे साम्राज्य; उपमहापौरांचे कडक निर्देश

अहिल्यानगर (प्रतिनिधी) : शहरातील वारूळाचा मारुती परिसरातील कल्याण रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या