Jalgaon Accident News : जळगावमध्ये भीषण अपघात! डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Jalgaon Accident News : मलकापूरहून अजंदे गावाकडे दुचाकीने परतणाऱ्या दोघांवर नायगाव फाट्याजवळ (ता.मुक्ताईनगर) काळाने घाला घातला. सिमेंट काँक्रीट मिक्सर डंपरने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की, मृत प्रल्हाद मधुकर हिवरे यांचे शीर धडापासून वेगळे झाले.



डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू


रावेर तालुक्यातील अजंदे येथील प्रल्हाद हिवरे (वय ४०) आणि ईश्वर नामदेव पवार (वय ३८) हे दोघे दुचाकी क्रमांक एमएच १९ डीडी १८५८ वरून मलकापूरहून अजंदे गावाकडे परतत होते. दरम्यान, नायगाव फाट्याजवळ इंदूर-हैदराबाद ७५३ या मार्गावर काम सुरू असताना बीएनए कंपनीच्या सिमेंट काँक्रीट मिक्सर डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत प्रल्हाद हिवरे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची तीव्रता एवढी होती की, त्यांचे शीर धडापासून वेगळे झाले. तर ईश्वर पवार हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.



फॉरेन्सिक पथकाकडून घटनास्थळाची पाहणी


अपघाताची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळाची पाहणी केली आणि तपासासाठी आवश्यक पुरावे संकलित केले. अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या भीषण अपघातामुळे अजंदे गावावर शोककळा पसरली असून, प्रल्हाद हिवरे यांच्या मृत्यूने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Comments
Add Comment

देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीला बारा वर्षे पूर्ण; राजकारणातील एक तप आणि विकासाचा नवा अध्याय!

मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वानखेडे स्टेडियमवरील ऐतिहासिक शपथविधीला ३१ ऑक्टोबर,

Cm Devendra Fadanvis News: राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय! चारा परराज्यात पाठविण्यास बंदी...

मुंबई: राज्यातील चारा परराज्यात पाठवण्यावर कायदेशीर बंदी घालण्यात आली असून, चाऱ्याचा वापर बायोफ्युएल किंवा

Pankaja Munde : चारा टंचाईवर मात करण्यासाठी 5 टक्के निधीची तरतूद, राज्य सरकारचा कृती आराखडा जाहीर

मुंबई: अल-निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाचे प्रमाण घटल्याने राज्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.

दुष्काळी परिस्थितीत सरकारकडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा, मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत चाऱ्याचे दर निश्चित

मुंबई: दुष्काळजन्य परिस्थितीतील संभाव्य चारा टंचाईवर मात करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने

PM Kisan Samman Nidhi News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसानच्या 24 व्या हप्त्याचे वितरण; महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी 'पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना'चा 24 वा हफ्ता वितरित

Indapur News : इंदापूरमध्ये उड्डाणपुलाच्या कामादरम्यान मातीचा ढिगारा कोसळला; एक कामगार ठार, एक गंभीर

Pune News: पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील बिजवडी येथे उड्डाणपुलाच्या कामादरम्यान मोठी दुर्घटना घडली.