Hirakani Kaksha Maharashtra : स्तनदा मातांसाठी एसटीचा मोठा निर्णय! राज्यभरातील एसटी बसस्थानकांवर उभारणार १२५ ‘हिरकणी कक्ष’

मुंबई : महाराष्ट्रातील महिला प्रवाशांसाठी विशेषतः स्तनदा मातांसाठी सुरक्षित, स्वच्छ आणि खासगी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. राज्यातील एसटी बसस्थानकांवर तीन वर्षांत तब्बल १२५ ‘हिरकणी कक्ष’ (Lactation Pods) उभारण्यात येणार आहेत. यासाठी एसटी महामंडळ आणि टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा करार झाला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक उपस्थित होते. (Hirakani Kaksha Maharashtra)



स्तनदा मातांसाठी सुरक्षित आणि खासगी जागा


प्रवासादरम्यान स्तनदा मातांना बाळाची निगा राखण्यासाठी योग्य आणि सुरक्षित जागा मिळावी, हा ‘हिरकणी कक्ष’ उभारण्यामागील प्रमुख उद्देश आहे. या कक्षांमध्ये मातांना स्तनपान तसेच बाळाची देखभाल करण्यासाठी आवश्यक खासगी आणि स्वच्छ जागा उपलब्ध होणार आहे.  (Hirakani Kaksha Maharashtra)



टोयोटा किर्लोस्करच्या CSR निधीतून प्रकल्प


या उपक्रमासाठी टोयोटा किर्लोस्कर मोटर आपल्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) निधीतून सहकार्य करणार आहे. सामंजस्य करारानुसार एसटी बसस्थानकांवर अंदाजे ३ मीटर × ३ मीटर आकाराचे प्री-फॅब्रिकेटेड कक्ष उभारण्यात येतील.  (Hirakani Kaksha Maharashtra)


या कक्षांमध्ये आवश्यक फर्निचर, फिक्स्चर, अंतर्गत वायरिंग, विद्युतीकरण आणि इलेक्ट्रॉनिक साहित्य यांचा समावेश असेल.



तीन वर्षांत १२५ कक्ष उभारणार


या प्रकल्पाचे काम तीन आर्थिक वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.


२०२६-२७ : ५० कक्ष
२०२७-२८ : ५० कक्ष
२०२८-२९ : २५ कक्ष


CSR धोरण, उपलब्ध जागा आणि स्थानिक गरजा लक्षात घेऊन या संख्येत आवश्यकतेनुसार बदल करण्याची तरतूदही सामंजस्य करारात करण्यात आली आहे.  (Hirakani Kaksha Maharashtra)



एसटीकडून जागा आणि आवश्यक सुविधा


प्रकल्पासाठी एसटी महामंडळाकडून अंदाजे ५ मीटर × ५ मीटर जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच वीज, पाणी, स्थापनेसाठी आवश्यक सहकार्य आणि शासकीय परवानग्या मिळवून देण्याची जबाबदारी एसटीची असेल.


प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कक्ष आणि त्यातील सुविधा एसटीकडे हस्तांतरित करण्यात येतील. त्यानंतर कक्षांचे संचालन, सुरक्षा, दुरुस्ती, देखभाल आणि देखरेख करण्याची जबाबदारी एसटी महामंडळाची राहणार आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पासाठी एसटी महामंडळाकडून कोणतेही आर्थिक योगदान दिले जाणार नाही. हा उपक्रम टोयोटा किर्लोस्करच्या CSR निधीतून राबविला जाणार आहे.  (Hirakani Kaksha Maharashtra)



महिला प्रवाशांसाठी संवेदनशील पाऊल


एसटी ही महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनाशी जोडलेली लोकवाहिनी आहे. ग्रामीण भागापासून शहरांपर्यंत दररोज लाखो प्रवाशांना सेवा देणाऱ्या एसटीच्या बसस्थानकांवर स्तनदा मातांसाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध झाल्याने महिला प्रवाशांच्या प्रवासाचा अनुभव अधिक सुरक्षित आणि सुलभ होण्यास मदत होणार आहे. (Hirakani Kaksha Maharashtra)


‘हिरकणी कक्ष’ हा केवळ सुविधा प्रकल्प नसून मातृत्वाचा सन्मान, महिलांच्या गरजांची जाणीव आणि प्रवासी-केंद्रित एसटी व्यवस्थेच्या दिशेने टाकलेले संवेदनशील पाऊल आहे, असे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितले. (Hirakani Kaksha Maharashtra)

Comments
Add Comment

Belgaum News: बेळगावमध्ये काळाचा घाला ! भीषण आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू

Belgaon : देशभरात गणरायाच्या आगमनाचा उत्साह सुरू असतानाच बेळगावमधून हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. गणेश

Dagdusheth Ganpati Atharvashirsha Pathan 2026 : पुण्यात स्त्रीशक्तीचा अभूतपूर्व जागर; दगडूशेठ गणपती प्रांगणात ३५ हजार महिलांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण!

पुणे : गणेशोत्सवाच्या मंगलमयी वातावरणात पुण्यात ऋषीपंचमीनिमित्त भक्ती आणि स्त्रीशक्तीचा एक अनोखा संगम पाहायला

Jalgaon Accident News : जळगावमध्ये भीषण अपघात! डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Jalgaon Accident News : मलकापूरहून अजंदे गावाकडे दुचाकीने परतणाऱ्या दोघांवर नायगाव फाट्याजवळ (ता.मुक्ताईनगर) काळाने घाला

Nashik : नाशिकमध्ये मोदकांच्या २५ व्हरायटी, गोल्डन मोदकांनी वेधले लक्ष; किलोचा दर तब्बल २७ हजार रुपये

Nashik : गणेशोत्सवानिमित्त लाडक्या बाप्पाचे भक्तिमय वातावरणात आगमन झाले असून, गणरायाच्या नैवेद्यासाठी मोदक आणि

Ganpati miravnuk accident : छत्रपती संभाजीनगरमधील भीषण अपघात; गणपती मिरवणुकीत कंटेनर घुसल्याने दोन गणेशभक्त ठार, १२ जण जखमी

छत्रपती संभाजीनगर: गणपती बाप्पाच्या आगमनाच्या उत्साहात आणि आनंदा वातावरणात सुरू असलेल्या मिरवणुकीत एका भरधाव

Rain Update : विजांचा कडकडाटासह मुसळधार पाऊस ! हवामान खात्याचा 'या' जिल्ह्यांना इशारा

Rain Update : राज्यभरात आज गणेशोत्सवाचा मोठा उत्साह बघायला मिळत असताना पावसानं पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता आहे.