Maharashtra Cabinet Decisions : मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय; शेतकरी, साखर कारखाने अन् नगरपरिषदांना दिलासा

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. सहकारी साखर कारखान्यांना सॉफ्ट लोन देण्यापासून राज्याच्या प्रमुख धोरणे आणि लोककल्याणकारी योजनांचे मूल्यांकन करण्यासाठी ‘महा-टॅक’ स्थापन करण्यापर्यंत अनेक प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. याशिवाय शेतकऱ्यांना जमीन परत करणे, शासकीय जमीन विनामूल्य देणे आणि मुद्रांक शुल्क माफ करण्यासह प्रशासकीय निर्णयही घेण्यात आले. (Maharashtra Cabinet Decisions)



ऊस उत्पादक शेतकरी, साखर कारखान्यांना दिलासा


२०२५-२६ च्या गाळप हंगामातील थकीत एफआरपी देण्यासाठी आणि आगामी २०२६-२७ च्या गाळप हंगामासाठी सहकारी साखर कारखान्यांना सॉफ्ट लोन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखान्यांना आर्थिक पाठबळ मिळणार आहे. (Maharashtra Cabinet Decisions)



२५ धोरणे, २५ योजनांचे मूल्यांकन


राज्याच्या २५ प्रमुख धोरणे आणि २५ प्रमुख लोककल्याणकारी योजनांचे विश्लेषण व मूल्यांकन करण्यासाठी ‘महाराष्ट्र तांत्रिक सहाय्यता कक्ष (महा-टॅक)’ स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली. IIM मुंबई आणि Centre for Research in Schemes and Policies (CRISP) यांच्या शिफारशीनुसार हे मूल्यांकन केले जाणार आहे. शासनाच्या निर्णय प्रक्रियेत अधिक गुणवत्तापूर्ण सुधारणा करण्यासाठी एक वर्षाच्या महा-टॅक प्रकल्पालाही मंजुरी देण्यात आली. (Maharashtra Cabinet Decisions)



नाशिक साहित्य परिषदेला मुद्रांक शुल्क माफी


महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नाशिक शाखेला अभ्यासिका आणि वाचनालयासाठी देण्यात आलेल्या नाशिक महानगरपालिकेच्या इमारतीच्या भाडेपट्टा कराराच्या नोंदणीवरील मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला.



आर्वी नगरपरिषदेला शासकीय जमीन


वर्धा जिल्ह्यातील आर्वी नगरपरिषदेला व्यापारी संकुल उभारण्यासाठी ६ हजार २४०.३० चौरस मीटर शासकीय जमीन विनामूल्य देण्यास मंजुरी देण्यात आली. (Maharashtra Cabinet Decisions)



हरेगावच्या जमिनी मूळ मालकांना परत


अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील मौजे हरेगाव येथील महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या ताब्यातील जमिनी मूळ मालकांना परत करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी महाराष्ट्र शेत जमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम, १९६१ मध्ये सुधारणा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे संबंधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. (Maharashtra Cabinet Decisions)



नगरपरिषद कायद्यात सुधारणा


महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली.



मुंबई पोलीस हाऊसिंग प्रकल्पासाठी नवीन पदे


मुंबई पोलीस हाऊसिंग टाऊनशिप प्रकल्पाच्या अध्यक्षांच्या कार्यालयासाठी चार नवीन पदे निर्माण करण्यास तसेच त्यासाठी आवश्यक खर्चाच्या तरतुदीस मंजुरी देण्यात आली. (Maharashtra Cabinet Decisions)

Comments
Add Comment

UPI Rules : UPI वापरकर्त्यांसाठी महत्त्वाची बातमी; ₹२,००० पेक्षा जास्त व्यवहारावर शुल्क भरावे लागणार का? जाणून घ्या सरकारचे नियम

मुंबई : भारतात डिजिटल पेमेंटसाठी सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या माध्यमांपैकी एक असलेल्या युनिफाइड पेमेंट्स

Hirakani Kaksha Maharashtra : स्तनदा मातांसाठी एसटीचा मोठा निर्णय! राज्यभरातील एसटी बसस्थानकांवर उभारणार १२५ ‘हिरकणी कक्ष’

मुंबई : महाराष्ट्रातील महिला प्रवाशांसाठी विशेषतः स्तनदा मातांसाठी सुरक्षित, स्वच्छ आणि खासगी सुविधा उपलब्ध

Jalgaon Crime News : ‘दवाखान्यात घेऊन जातो’ म्हणत महिलेला नेले अन्... महिलेचा मृतदेह जंगलात आढळून आल्याने खळबळ

Jalgaon Crime News : जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीतून पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिलेचा मृतदेह पद्मालय जंगलात आढळून

Disha Salian Case: दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरे, डिनो मोरिया, सूरज पांचोलींची नावे, सतीश सालियान यांचा सीबीआयकडे जबाब

मुंबई: दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांची माजी व्यवस्थापक दिशा सालियान यांच्या संशयास्पद मृत्यू

Nashik News : गंगापूर रोडवर मध्यरात्री झाडांची अनधिकृत छाटणी, ‘छोटा हत्ती’ वाहन सीसीटीव्हीत कैद

Nashik Tree Cutting News : नाशिकच्या गंगापूर रोडवरील काका का ढाबा ते बॉबीज हॉटेलदरम्यान मध्यरात्री झाडांची अनधिकृतपणे छाटणी

Ganpati Idol News: दीड दिवसाच्या गणपतीला आज निरोप, ढोल ताशाच्या गजरात साश्रुनयनांनी गणेश मुर्तींचे विसर्जन

मुंबई: "गणपती बाप्पा मोरया, मंगल मुर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या" या जयघोषात साश्रुनयनांनी मुंबई आणि