Greenfield Shipbuilding Cluster : दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षऱ्या; माझगाव डॉकची सुमारे २७ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक


मुंबई : रायगड जिल्ह्यातील दिघी येथे प्रस्तावित ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूहामध्ये प्रमुख जहाजबांधणी केंद्र म्हणून सहभागी होण्यासाठी नॅशनल शिपबिल्डिंग अँड हेवी इंडस्ट्रीज पार्क महाराष्ट्र लिमिटेड (एनशिपएमएल) आणि माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल) यांच्यात मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. या करारामुळे राज्यात ९० हजार रोजगार निर्मिती होणार आहे. (Greenfield Shipbuilding Cluster)


याप्रसंगी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे, बंदरे व परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, बिझनेस डेव्हलपमेंटचे सरव्यवस्थापक संजयकुमार सिंह, मुख्यमंत्री महोदयांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी उपस्थित होते. एमडीएलतर्फे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कॅप्टन जगमोहन तर एनशिपएमएलतर्फे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप पी. यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या.



महाराष्ट्रात ग्रीनफिल्ड जहाजबांधणी समूह विकसित करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळ आणि मुंबई बंदर प्राधिकरण यांनी संयुक्तपणे नॅशनल शिपबिल्डिंग अँड हेवी इंडस्ट्रीज पार्क महाराष्ट्र लिमिटेड (एनशिपएमएल) या विशेष उद्देश कंपनीची स्थापना केली आहे. केंद्र शासनाच्या ग्रीनफिल्ड जहाजबांधणी समूह विकास आराखड्यांतर्गत हा प्रकल्प पुढे नेण्यात येत असून, तो ‘मेरीटाईम अमृत काल व्हिजन २०४७’च्या उद्दिष्टांना पूरक ठरणार आहे. (Greenfield Shipbuilding Cluster)


या सामंजस्य करारानुसार एमडीएलने दिघी येथे प्रतिवर्ष किमान २ दशलक्ष सकल टनभार (ग्रॉस टनेज) जहाजबांधणी क्षमतेचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. यासाठी सुमारे २७ हजार कोटी रुपयांची प्रस्तावित गुंतवणूक अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे मोठ्या व्यावसायिक जहाजांची निर्मिती करणे शक्य होणार असून, देशाच्या सागरी औद्योगिक क्षमतेला बळकटी मिळणार आहे. (Greenfield Shipbuilding Cluster)



दिघी येथील या प्रकल्पामुळे आधुनिक जहाजबांधणी पायाभूत सुविधा तसेच त्यास पूरक औद्योगिक व पुरवठा साखळी परिसंस्था विकसित होणार आहे. देशांतर्गत जहाजबांधणी क्षमता वाढ, तंत्रज्ञान व गुंतवणूक आकर्षित करणे, कुशल रोजगारनिर्मिती आणि जागतिक सागरी क्षेत्रातील भारताची स्पर्धात्मकता वाढविण्यास या प्रकल्पामुळे चालना मिळणार आहे. (Greenfield Shipbuilding Cluster)


एमडीएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कॅप्टन जगमोहन यांनी या उपक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र शासनाने दिलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. जटिल जहाजबांधणी, अभियांत्रिकी, प्रकल्प व्यवस्थापन आणि सक्षम देशांतर्गत पुरवठादार व्यवस्था विकसित करण्याचा अनुभव एमडीएलकडे आहे. सर्व संबंधित घटकांच्या सहकार्याने दिघी येथे आधुनिक आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक जहाजबांधणी सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी आश्वस्त केले. (Greenfield Shipbuilding Cluster)



Comments
Add Comment

Hirakani Kaksha Maharashtra : स्तनदा मातांसाठी एसटीचा मोठा निर्णय! राज्यभरातील एसटी बसस्थानकांवर उभारणार १२५ ‘हिरकणी कक्ष’

मुंबई : महाराष्ट्रातील महिला प्रवाशांसाठी विशेषतः स्तनदा मातांसाठी सुरक्षित, स्वच्छ आणि खासगी सुविधा उपलब्ध

Jalgaon Crime News : ‘दवाखान्यात घेऊन जातो’ म्हणत महिलेला नेले अन्... महिलेचा मृतदेह जंगलात आढळून आल्याने खळबळ

Jalgaon Crime News : जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीतून पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिलेचा मृतदेह पद्मालय जंगलात आढळून

Disha Salian Case: दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरे, डिनो मोरिया, सूरज पांचोलींची नावे, सतीश सालियान यांचा सीबीआयकडे जबाब

मुंबई: दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांची माजी व्यवस्थापक दिशा सालियान यांच्या संशयास्पद मृत्यू

Nashik News : गंगापूर रोडवर मध्यरात्री झाडांची अनधिकृत छाटणी, ‘छोटा हत्ती’ वाहन सीसीटीव्हीत कैद

Nashik Tree Cutting News : नाशिकच्या गंगापूर रोडवरील काका का ढाबा ते बॉबीज हॉटेलदरम्यान मध्यरात्री झाडांची अनधिकृतपणे छाटणी

Maharashtra Cabinet Decisions : मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय; शेतकरी, साखर कारखाने अन् नगरपरिषदांना दिलासा

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. सहकारी साखर कारखान्यांना सॉफ्ट लोन

Ganpati Idol News: दीड दिवसाच्या गणपतीला आज निरोप, ढोल ताशाच्या गजरात साश्रुनयनांनी गणेश मुर्तींचे विसर्जन

मुंबई: "गणपती बाप्पा मोरया, मंगल मुर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या" या जयघोषात साश्रुनयनांनी मुंबई आणि