Nashik : पाकिस्तानचा छुपा डाव उधळला ! नाशिकमध्ये ३६२ मेट्रिक टनांहून अधिक खारीक जप्त

Nashik : पाकिस्तानमधून भारतात छुप्या मार्गाने माल पाठवण्याचा प्रयत्न महसूल गुप्तचर संचालनालय अर्थात डीआरआयने उधळून लावला आहे. ‘ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट’अंतर्गत नाशिकमध्ये तब्बल ३६२ मेट्रिक टनांहून अधिक पाकिस्तानी खारीक जप्त करण्यात आली आहे. पाकिस्तानी मालाच्या आयातीवर केंद्र सरकारने बंदी घातली असताना छुप्या मार्गाने भारतात माल पाठविण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न महसूल गुप्तचर संचालनालयाने (Directorate of Revenue Intelligence) उधळला आहे.(Nashik News)



कंटेनर फ्रेट स्टेशनवर १३ कंटेनर अडवले


अर्थ मंत्रालयाने सोमवारी, १४ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केलेल्या पत्रकातून या कारवाईची माहिती दिली. विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी नाशिकमधील अंबड येथील कंटेनर फ्रेट स्टेशनवर मुंबईतील एका कंपनीने आयात केलेले खारीकचे १३ कंटेनर अडवले. हा माल संयुक्त अरब अमिरातीमधील अर्थात यूएईच्या जेबेल अली बंदरातून भारतात आणण्यात आला होता. मात्र, आयात कागदपत्रांमध्ये या मालाचा मूळ उत्पादक देश यूएई असल्याचे नमूद करण्यात आले होते. या मालाची किंमत कोट्यवधी रुपये असल्याचे सांगण्यात येत असून, संबंधित मुंबईस्थित आयातदार कंपनीची चौकशी सुरू करण्यात आली आहे. (Nashik News)



पाकिस्तानी माल लपवण्यासाठी...


डीआरआयच्या तपासात या मालाचा मूळ देश पाकिस्तान असल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानी माल असल्याचे लपवण्यासाठी विशेष वाहतूक व्यवस्था आखण्यात आल्याचा संशय आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही खारीक पाकिस्तानच्या कराची बंदरातून एका जहाजाद्वारे वेगळ्या कंटेनर संचामध्ये यूएईच्या जेबेल अली बंदरात पाठवण्यात आली होती. जेबेल अली बंदरावर माल पोहोचल्यानंतर तो एका जहाजातून दुसऱ्या जहाजात हलवण्यात आला. त्यानंतर ही खारीक आणखी वेगवेगळ्या कंटेनरमध्ये भरण्यात आली. पुढे पाकिस्तानी नागरिकांकडून चालवल्या जाणाऱ्या कंपन्यांच्या माध्यमातून हा माल भारताकडे पाठवण्यासाठी दुसऱ्या जहाजावर चढवण्यात आला. (Nashik News)



मुंबईतील आयातदार कंपनीची चौकशी


पाकिस्तानमधून येणाऱ्या मालाच्या आयातीवर केंद्र सरकारने बंदी घातलेली असताना, मालाचा मूळ देश लपवून तो यूएईमधून आयात केल्याचे दाखवण्यात आल्याचा संशय आहे. या प्रकरणी डीआरआयकडून संबंधित आयातदार कंपनीच्या व्यवहारांची आणि कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. ‘ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट’अंतर्गत झालेल्या या कारवाईमुळे पाकिस्तानी मालाची ओळख लपवून तो भारतात आणण्याचा प्रयत्न उघडकीस आला आहे. पुढील तपासात या प्रकरणातील आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे

Comments
Add Comment

Disha Salian Case: दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरे, डिनो मोरिया, सूरज पांचोलींची नावे, सतीश सालियान यांचा सीबीआयकडे जबाब

मुंबई: दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांची माजी व्यवस्थापक दिशा सालियान यांच्या संशयास्पद मृत्यू

Nashik News : गंगापूर रोडवर मध्यरात्री झाडांची अनधिकृत छाटणी, ‘छोटा हत्ती’ वाहन सीसीटीव्हीत कैद

Nashik Tree Cutting News : नाशिकच्या गंगापूर रोडवरील काका का ढाबा ते बॉबीज हॉटेलदरम्यान मध्यरात्री झाडांची अनधिकृतपणे छाटणी

Maharashtra Cabinet Decisions : मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय; शेतकरी, साखर कारखाने अन् नगरपरिषदांना दिलासा

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. सहकारी साखर कारखान्यांना सॉफ्ट लोन

Ganpati Idol News: दीड दिवसाच्या गणपतीला आज निरोप, ढोल ताशाच्या गजरात साश्रुनयनांनी गणेश मुर्तींचे विसर्जन

मुंबई: "गणपती बाप्पा मोरया, मंगल मुर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या" या जयघोषात साश्रुनयनांनी मुंबई आणि

Bigg Boss 20 : दुसऱ्या आठवड्यात तीन स्पर्धक नॉमिनेट ? कोणाच्या डोक्यावर एलिमिनेशनची टांगती तलवार ?

Bigg Boss 20 : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो बिग बॉस सिझन 20 मध्ये पहिल्याच आठवड्यापासून ड्रामा, वाद आणि

Chandrashekhar Bawankule : तरुणांचा राजकीय वापर काँग्रेसला महागात पडला!

- राजस्थानच्या जनतेने दिली चपराक ; राजस्थान महापालिका निवडणूक प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे यांचे मत मुंबई :