Navi Mumbai International Airport : नवी मुंबई विमानतळावर नवा विक्रम, ९० टन आयात माल घेऊन Boeing 777F दाखल

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने (NMIA) आंतरराष्ट्रीय कार्गो सेवेत महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. १५ सप्टेंबर २०२६ रोजी अझरबैजानमधील बाकू येथून सिल्क वे वेस्ट एअरलाइन्सचे पहिले मालवाहू विमान नवी मुंबई विमानतळावर दाखल झाले. या विमानाचे जलतोफांच्या सलामीने स्वागत करण्यात आले. (Navi Mumbai International Airport)


सिल्क वे वेस्ट एअरलाइन्सचे बोईंग ७७७F हे विमान जवळपास ९० टन आयात माल घेऊन NMIA वर पोहोचले. या आगमनामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअरलाइनच्या नियमित मालवाहू विमानसेवेची सुरुवात झाली आहे.



भारत-बाकू कार्गो कनेक्टिव्हिटीला चालना


या नव्या सेवेमुळे नवी मुंबई आणि बाकू यांच्यातील मालवाहतूक कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होण्याची अपेक्षा आहे. त्याचबरोबर भारत, CIS देश, युरोप, पश्चिम आशिया आणि इतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठांदरम्यान मालवाहतुकीला चालना मिळण्यास मदत होणार आहे. (Navi Mumbai International Airport)



NMIA ठरणार पश्चिम भारताचे महत्त्वाचे कार्गो गेटवे?


बोईंग ७७७F हे जगातील मोठ्या ट्विन-इंजिन मालवाहू विमानांपैकी एक आहे. अशा मोठ्या क्षमतेच्या कार्गो विमानाचे आगमन हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहे. (Navi Mumbai International Airport)


या नव्या कार्गो सेवेमुळे पश्चिम भारतासाठी उदयोन्मुख आंतरराष्ट्रीय मालवाहतूक केंद्र म्हणून NMIAची भूमिका आणखी मजबूत होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीला बारा वर्षे पूर्ण; राजकारणातील एक तप आणि विकासाचा नवा अध्याय!

मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वानखेडे स्टेडियमवरील ऐतिहासिक शपथविधीला ३१ ऑक्टोबर,

Cm Devendra Fadanvis News: राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय! चारा परराज्यात पाठविण्यास बंदी...

मुंबई: राज्यातील चारा परराज्यात पाठवण्यावर कायदेशीर बंदी घालण्यात आली असून, चाऱ्याचा वापर बायोफ्युएल किंवा

Pankaja Munde : चारा टंचाईवर मात करण्यासाठी 5 टक्के निधीची तरतूद, राज्य सरकारचा कृती आराखडा जाहीर

मुंबई: अल-निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाचे प्रमाण घटल्याने राज्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.

दुष्काळी परिस्थितीत सरकारकडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा, मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत चाऱ्याचे दर निश्चित

मुंबई: दुष्काळजन्य परिस्थितीतील संभाव्य चारा टंचाईवर मात करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने

PM Kisan Samman Nidhi News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसानच्या 24 व्या हप्त्याचे वितरण; महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी 'पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना'चा 24 वा हफ्ता वितरित

Indapur News : इंदापूरमध्ये उड्डाणपुलाच्या कामादरम्यान मातीचा ढिगारा कोसळला; एक कामगार ठार, एक गंभीर

Pune News: पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील बिजवडी येथे उड्डाणपुलाच्या कामादरम्यान मोठी दुर्घटना घडली.