Kasarvadavali Flyover: ऐन गणेशोत्सवात ठाणेकरांची वाहतूक कोंडी वाढली, कासारवडवली ओव्हर ब्रिज बंद

ठाणे: ठाणेकरांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. ऐन गणेशोत्सवाच्या दिवसांमध्ये ठाणेकरांना आणखीन वाहतूक कोंडीची समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. अनिश्चित काळासाठी कासारवडवली ओव्हर ब्रिज ठेवण्यात येणार आहे. MMRDA कडून ब्रिजच्या तपासणीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे आज रात्रीपासून अनिश्चित काळापर्यंत ठाणेकरांना पर्यायी मार्गाने वाहतूक करावी लागणार आहे. कासरवडवली वाहतूक उपविभागाच्या हद्दीमध्ये हे महत्त्वाचे काम हाती घेण्यात येणार आहे.



कासारवडवली वाहतूक उपविभागाच्या हददीत, MMRDA कडून कासारवडवली ओव्हर ब्रिजचे तपासणीचे (INSPECTION) काम करण्यात येणार आहे. कासारवडवली ओव्हर ब्रिज हा सर्व प्रकारच्या वाहनांकरिता दिनांक १५/०९/२०२६ पासून अर्थात आजपासून मध्यरात्री १२ वाजल्यापासून ओव्हर ब्रिजचे तपासणीचे काम पूर्ण होईपर्यंत पूर्णपणे बंद करून सर्व प्रकारची वाहतूक ही स्लिप रोड मार्गे वळविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरामध्ये वाहतूक कोंडी होऊ नये आणि प्रवाशांना त्रास होऊ नये, यासाठी वाहतूकदारांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे.

 



ठाण्याकडून घोडबंदर गुजरात रोडच्या दिशेने जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना कासारवडवली ओव्हर ब्रिजचे सुरवातीलाच 'प्रवेश बंदी' करण्यात आली आहे. त्यामुळे जड- अवजड वाहनांना आज मध्यरात्रीपासून, ठाणे दिशेकडून घोडबंदर गुजरात रोडच्या दिशेने जाण्यासाठी कासारवडवली ओव्हर ब्रिज लगतच्या स्लिप रोड मार्गे पुढे इच्छित स्थळी जाण्याचा पर्याय देण्यात आला आहे. शिवाय, हलक्या वाहनांकरिताही पर्यायी मार्ग देण्यात आला आहे. ठाणे दिशेकडून घोडबंदर गुजरात रोडच्या दिशेने जाणारे छोटी वाहने (कार, ऑटो रिक्षा, टु व्हिलर, पोलीस व्हॅन, फायर ब्रिगेडची गाडी, रूग्णवाहिका, गणेश मुर्ती विर्सजनातील वाहने आणि इतर अत्यावश्यक वाहने) ह्यांना विजय गार्डनजवळील डी मार्ट आणि कासारवडवली पोलीस स्टेशनच्या पुढे उजवीकडे वळण घेऊन सरळ ग्रॅन्ड स्क्वेअर चौक, विहंग व्हॅली चौक, टायटन हॉस्पिटल येथून डावे वळण घेऊन ठाणे घोडबंदर मुख्य वाहिनीवरून पुढे इच्छित स्थळी जाऊ शकणार आहेत.



ठाणे आरटीओकडून दुसरा पर्यायी मार्गाचाही वाहतूकदारांना वापर करण्याचा सल्ला दिला आहे. ठाणे दिशेकडून घोडबंदर गुजरात रोडच्या दिशेने जाणाऱ्या छोटी वाहने (कार, ऑटो रिक्षा, टु व्हिलर, पोलीस व्हॅन, फायर ब्रिगेडची गाडी, रूग्णवाहिका, गणेश मुर्ती विर्सजनातील वाहने आणि इतर अत्यावश्यक वाहने) ही आनंद नगर सिग्नल वरून डावे वळण घेऊन ग्रॅन्ड स्क्वेअर चौक, विहंग व्हॅली चौक, टायटन हॉस्पीटल येथून डावे वळण घेवून ठाणे घोडबंदर मुख्य वाहिनीवरून पुढे इच्छित स्थळी जाऊ शकणार आहेत. ब्रिजच्या तपासणीचं काम, १५/०९/२०२६ पासून (आजपासून) रात्री १२ वाजल्यापासून ओव्हर ब्रिजचे तपासणीचे काम अनिश्चित काळासाठी सुरू राहण्याची शक्यता आहे.
Comments
Add Comment

लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ! भाजप महायुतीच्या वतीने उत्तर मुंबईत भव्य पदयात्रेचे आयोजन

मुंबई (विशेष प्रतिनिधी): लोकशाही मूल्यांचे रक्षण, लोकशाही व्यवस्थेचे बळकटीकरण आणि अराजकतेविरोधात जनजागृती

मुंबईच्या श्रीगणेशोत्सवाची पर्यावरणपूरक उत्सवाकडे यशस्वी वाटचाल; मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचे गौरवोद्गार

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महानगरपालिकेने मुंबईकरांना पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सव साजरा करण्यासोबतच सहा

आयपीएल 2027 स्पर्धेत पुन्हा एकदा रोहित पर्व! मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावर परतण्याची तयारी, झालं असं..

आयपीएल स्पर्धेत पाच वेळा जेतेपदावर नाव कोरणाऱ्या मुंबई इंडियन्सची कामगिरी गेल्या काही वर्षात निराशाजनक राहिली

Pankaja Munde : चारा टंचाईवर मात करण्यासाठी 5 टक्के निधीची तरतूद, राज्य सरकारचा कृती आराखडा जाहीर

मुंबई: अल-निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाचे प्रमाण घटल्याने राज्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा; तपोवनात धर्मध्वज आणि भव्य ग्रामपरिक्रमेने धार्मिक पर्वाचा मंगलमय शुभारंभ

[caption id="attachment_1070611" align="aligncenter" width="800"] भक्तीचा गजर, संत-महंतांचा पावन सहवास, धर्मध्वजाची दिव्य पताका आणि लाखो भाविकांच्या

Bandra News: वांद्रे रेल्वे स्थानकाची जागा अखेर मोकळी; गरीब नगरमधील 94 बांधकामांवर रेल्वेची कारवाई

मुंबई : वांद्रे पूर्व येथील गरीब नगर परिसरात पश्चिम रेल्वेने शुक्रवारी 94 उर्वरित बांधकामे पाडली. मुंबई महानगर