The One Movie : ४०० वर्षांचं गूढ अन् जंगलातील रहस्य; सिद्धार्थ-तमन्नाच्या ‘द वन’चा ट्रेलर प्रदर्शित

मुंबई : अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि तमन्ना भाटिया यांच्या आगामी ‘द वन: फोर्स ऑफ द फॉरेस्ट’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. भारतीय लोककथा, फँटसी आणि सुपरनॅचरल थ्रिलरचा मिलाफ असलेल्या या चित्रपटामुळे प्रदर्शनापूर्वीच उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन दीपक कुमार मिश्रा यांनी केले असून, सिद्धार्थ आणि तमन्नासोबत सुनील ग्रोवर, मनीष पॉल यांच्यासह अन्य कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. (The One Movie)



वनदेवीच्या मंदिराभोवती फिरणार कथा


चित्रपटाची कथा बिहारमधील पटण्याजवळ असलेल्या प्राचीन वनदेवी मंदिराशी संबंधित लोककथेपासून प्रेरित असल्याचे समोर आले आहे. जवळपास ४०० वर्षे जुन्या मंदिराशी आणि त्याभोवतालच्या जंगलाशी जोडलेल्या रहस्यमय कथांचा आधार चित्रपटाच्या कथानकाला मिळाला आहे. (The One Movie)



ट्रेलरमध्ये जंगल, स्थानिक श्रद्धा, गूढ घटना आणि अलौकिक शक्तींची झलक पाहायला मिळते. सिद्धार्थ मल्होत्राचे पात्र स्थानिकांच्या जंगलाबाबतच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करून या रहस्यमय विश्वात प्रवेश करते. त्यानंतर घडणाऱ्या घटनांमुळे कथा अधिक गूढ आणि थरारक होत जाते. (The One Movie)



तमन्ना साकारणार सिद्धार्थच्या पत्नीची भूमिका


चित्रपटात तमन्ना भाटिया सिद्धार्थच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. कथानकात त्यांच्या नात्यासोबतच जंगलाशी आणि तेथील प्राचीन रहस्यांशी संबंधित घटनांना महत्त्वाचे स्थान असल्याचे ट्रेलरवरून दिसते.


चित्रपटात पुनर्जन्म, प्राचीन श्रद्धा आणि अलौकिक शक्तींशी संबंधित संकेतही पाहायला मिळतात. त्यामुळे हा केवळ हॉररपट न राहता भारतीय लोककथा आणि फँटसीचा वेगळा अनुभव देण्याचा प्रयत्न असल्याचे दिसते. (The One Movie)



चित्रपटात छठ पूजेलाही महत्त्व


‘द वन’मध्ये बिहारच्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग असलेल्या छठ पूजेचा कथानकाशी संबंध जोडण्यात आला आहे. अलीकडे चित्रपटातील ‘छठी मैया’ हे गाणेही प्रदर्शित झाले असून, त्यात तमन्ना पारंपरिक रूपात छठ पूजेच्या विधींमध्ये सहभागी होताना दिसते. निर्मात्यांनी छठ पूजेला केवळ पार्श्वभूमी न ठेवता कथेशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. (The One Movie)



२५ सप्टेंबरला चित्रपटगृहात


बालाजी मोशन पिक्चर्स आणि TVF मोशन पिक्चर्सच्या निर्मितीतील ‘द वन: फोर्स ऑफ द फॉरेस्ट’ हा चित्रपट २५ सप्टेंबर २०२६ रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. भारतीय लोककथा, फँटसी, साहस, रहस्य आणि अलौकिक घटकांचा संगम असलेल्या या चित्रपटाकडून प्रेक्षकांना वेगळ्या प्रकारच्या सिनेमॅटिक अनुभवाची अपेक्षा आहे. (The One Movie)

Comments
Add Comment

Ramayan Advance Booking : 'रामायण'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ! रिलीजच्या आधीच विकली गेली १३ लाखांहून अधिक तिकिटे

मुंबई : रणबीर कपूर, (Ranbir Kapoor) साई पल्लवी (Sai Pallavi) आणि 'रॉकिंग स्टार' यश (Yash) यांची मुख्य भूमिका असलेला बहुप्रतिक्षीत 'रामायण'

लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या अजरामर सुरांना उजाळा; ‘मृदगंध पुरस्कारां’चे 26 नोव्हेंबरला वितरण

काही आवाज काळाच्या पडद्याआड जात नाहीत, तर ते पिढ्यान्‌पिढ्या मनामनांत घुमत राहतात. लोकशाहीर विठ्ठल उमप हे असेच

Tu Mil Jaaye Song: किंग खानच्या वाढदिवशी फॅन्सला जबरदस्त गिफ्ट, 'किंग' चित्रपटातलं 'तू मिल जाए' गाणं रिलीज

मुंबई: बॉलिवूडचा किंग खान आज त्याचा 61 वा वाढदिवस साजरा करीत आहे. शाहरूख खानच्या वाढदिवसाचे निमित्त साधत त्याच्या

Shah Rukh Khan @61 : 'बाझिगर' ते 'जवान'... बॉलिवूडच्या 'किंग खान'चे ९ आयकॉनिक चित्रपट, ज्यांनी बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ!

मुंबई : बॉलिवूडचा 'किंग ऑफ रोमान्स' आणि जगभरातील करोडो चाहत्यांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता शाहरुख खान आज

Anuj Thakur Death: लोकप्रिय अभिनेता अनुज ठाकूरचे वयाच्या ३०व्या वर्षी निधन

Anuj Thakur Death: टीव्ही इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेता अनुज ठाकूर याचे वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी निधन झाले आहे. 'बंधन

रजनीकांत यांचा ‘जेलर 2’ बॉक्स ऑफिसवर सुसाट! 800 कोटींचा टप्पा पार करणारा पहिला तमिळ चित्रपट

वयाच्या 75 व्या वर्षी सुपरस्टार रजनीकांत यांनी अविश्वसनीय कामगिरी केली आहे. या कलाकाराने तमिळ चित्रपटसृष्टीला 800