Nitesh Rane : सिंधुदुर्गातील आरोग्य सुविधांसाठी आवश्यक मनुष्यबळ व सर्व सुविधा तातडीने उपलब्ध करा - मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

प्रलंबित विकासकामे वेळ न दवडता पूर्ण करण्याचे निर्देश


मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना तसेच जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांना दर्जेदार आणि प्रभावी आरोग्यसेवा उपलब्ध होण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, रुग्णालयांतील पायाभूत सुविधा आणि सर्व आवश्यक सुविधा प्राधान्याने उपलब्ध करून द्याव्यात. जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेशी संबंधित प्रलंबित प्रश्न वेळ न दवडता मार्गी लावून कामे सुरळीतपणे आणि तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले. (Nitesh Rane)


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णालयांमधील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. यावेळी आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. (Nitesh Rane)



जिल्हा शल्य चिकित्सक, सिंधुदुर्ग येथे आवश्यक एस-२३ आणि एस-२० विशेषज्ञांची रिक्त पदे भरणे, तसेच जिल्ह्यातील रुग्णालयांमधील वर्ग-१ ते वर्ग-४ संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. याशिवाय जिल्हा शल्य चिकित्सक, सिंधुदुर्ग यांच्या ७ सप्टेंबर २०२६ रोजीच्या पत्रात नमूद केल्यानुसार जिल्ह्यातील रुग्णालयांसाठी आवश्यक अनुदान, बांधकामे आणि इतर प्रलंबित विषयांचाही आढावा घेण्यात आला.


सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थानिक नागरिकांसोबतच मोठ्या प्रमाणात बाहेरून येणारी लोकसंख्या असते. गणेशोत्सवाच्या काळातही मोठ्या संख्येने नागरिक जिल्ह्यात येतात. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्यविषयक गरजा लक्षात घेऊन रुग्णालयांमध्ये आवश्यक मनुष्यबळ आणि सर्व आरोग्य सुविधा उपलब्ध असणे गरजेचे आहे. त्यामुळे उपलब्ध सुविधांचा आढावा घेऊन आवश्यकतेनुसार प्राधान्यक्रम निश्चित करावा, अशा सूचना मंत्री राणे यांनी दिल्या. (Nitesh Rane)



आरोग्य व्यवस्थेतील प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करून नागरिकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, याची संबंधित विभागांनी दक्षता घ्यावी. रुग्णालयांमध्ये आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देतानाच आरोग्यसेवेबाबत नागरिकांमध्ये समाधानाची भावना निर्माण होईल, यासाठी प्रभावीपणे काम करावे, असेही मंत्री राणे यांनी निर्देशित केले. (Nitesh Rane)

Comments
Add Comment

Maharashtra Government : रेशन कार्डापासून परवान्यांपर्यंत सेवा होणार जलद; अन्न व नागरी पुरवठा विभागात GPR अंतर्गत मोठ्या सुधारणा

मुंबई : नागरिकांना शासकीय सेवा अधिक पारदर्शक, सुलभ, कालबद्ध आणि डिजिटल पद्धतीने मिळाव्यात, यासाठी अन्न, नागरी

Kolhapur News : कळंबा कारागृहात कैद्यांचा उच्छाद; गोंधळ रोखणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर सहा जणांचा हल्ला, दगडफेकीत हाताला दुखापत

कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहात गोंधळ घालणाऱ्या कैद्यांना शांत करण्याचा प्रयत्न करणाऱ्या वरिष्ठ तुरुंग

Devendra Fadnavis : नवोन्मेषाच्या बळावर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘टेक इन एशिया कॉन्फरन्स २०२६’मध्ये महाराष्ट्राच्या स्टार्टअप आणि इनोव्हेशन व्हिजनचे जागतिक व्यासपीठावर

Maharashtra Weather Update : १७ सप्टेंबरला राज्यात हवामानाचा मिश्र अंदाज; काही जिल्ह्यांत पाऊस तर विदर्भात कोरड्या वातावरणाची शक्यता

मुंबई : महाराष्ट्रात १७ सप्टेंबर रोजी हवामानात विभागनिहाय बदल जाणवण्याची शक्यता आहे. राज्यातील १९ जिल्ह्यांत

Simhastha Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकच्या ब्रँडिंगसाठी व्यापक आराखडा तयार करा; ब्रिजेश सिंह यांचे निर्देश

डिजिटल, सोशल मीडिया आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या माध्यमातून नाशिक-त्र्यंबकेश्वरची ओळख जागतिक स्तरावर

Nitesh Rane : गडचिरोलीच्या पर्यटनाला मिळणार नवी दिशा; सेमान्यात उभारणार अत्याधुनिक मत्स्यालय, नितेश राणेंचे निर्देश

मुंबई : गडचिरोली जिल्ह्यातील सेमाना येथे प्रस्तावित मत्स्यालयाची उभारणी अत्याधुनिक, नाविन्यपूर्ण आणि आकर्षक