Meta One Subscription : मेटाने आपल्या वापरकर्त्यांसाठी ‘Meta One’ नावाची नवीन सबस्क्रिप्शन सेवा आणली आहे. या माध्यमातून फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप आणि Meta AI शी संबंधित सशुल्क फीचर्स एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या सर्व ॲप्सचा मूलभूत वापर आणि Meta AI ची सेवा पूर्वीप्रमाणेच मोफत राहणार आहे. मात्र, अधिक फीचर्स, वाढीव वापर मर्यादा आणि प्रगत AI सुविधांची गरज असलेल्या युजर्ससाठी सशुल्क पर्याय उपलब्ध असतील. (Meta One Subscription)
'मेटा वन'मध्ये नेमकं काय मिळणार?
मेटा वन अंतर्गत युजर्सना त्यांच्या गरजेनुसार स्वतंत्र ॲपची सबस्क्रिप्शन घेता येणार आहे. त्याशिवाय फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप आणि Meta AI मधील विविध सुविधा एकत्र देणारे बंडल प्लॅन्सही उपलब्ध आहेत.
क्रिएटर्स आणि व्यवसायांसाठी मेटाने स्वतंत्र सबस्क्रिप्शन प्लॅन्स तयार केले आहेत. या योजनांमध्ये Meta Business आणि AI टूल्सचा अधिक व्यापक वापर, अतिरिक्त मॅनेजमेंट फीचर्स आणि वाढीव ॲक्सेस देण्यात येतो. (Meta One Subscription)
मुंबई : Apple ने भारतातील पात्र iPhone वापरकर्त्यांसाठी iOS 27 अपडेट जारी करण्यास सुरुवात केली आहे. या नव्या अपडेटमध्ये कंपनीच्या बहुप्रतीक्षित Siri AI, Apple Intelligence मधील ...
इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप आणि फेसबुक प्लसची किंमत
इन्स्टाग्राम प्लसची मासिक किंमत ९९ रुपये आहे. यामध्ये मित्रांशी कनेक्ट राहण्यासाठीच्या सुविधांसोबतच ॲपमध्ये अधिक कस्टमायझेशनचे पर्याय दिले जातात.
व्हॉट्सॲप प्लससाठी दरमहा ७९ रुपये मोजावे लागतील. या प्लॅनमध्ये अतिरिक्त थीम्स, आयकॉन्स, स्पेशल इफेक्ट स्टिकर्स आणि अधिक चॅट्स पिन करण्यासारख्या सुविधा मिळतात.
तर फेसबुक प्लसची किंमतही ९९ रुपये प्रति महिना आहे. यात कस्टम ॲप आयकॉन्स आणि ‘Super Hearts’ सारखी अतिरिक्त फीचर्स उपलब्ध आहेत.(Meta One Subscription)
मेटा वन कोअर आणि प्रीमियम बंडल कितीला?
ज्या युजर्सना Meta AI च्या अधिक सुविधा वापरायच्या आहेत, त्यांच्यासाठी कंपनीने Core आणि Premium असे दोन बंडल प्लॅन्स आणले आहेत.
Core Bundle ची किंमत ५४९ रुपये प्रति महिना आहे. यामध्ये इन्स्टाग्राम प्लस, व्हॉट्सॲप प्लस आणि फेसबुक प्लसमधील सुविधांसोबत Meta AI चा अधिक वापर करता येतो. इमेज आणि व्हिडिओ तयार करण्याची सुविधा तसेच Instagram मधील Restyle फीचरचाही यात समावेश आहे. (Meta One Subscription)
यापेक्षा अधिक सुविधा आणि वापर मर्यादा हवी असल्यास Premium Bundle उपलब्ध आहे. याची किंमत १,९५० रुपये प्रति महिना असून Core Bundle मधील सर्व फीचर्ससोबत Meta AI आणि इतर क्रिएटिव्ह टूल्ससाठी वाढीव वापर मर्यादा मिळतात. (Meta One Subscription)
मुंबई : ॲपलने अखेर आपला बहुप्रतीक्षित पहिला फोल्डेबल आयफोन ‘iPhone Duo’ ९ सप्टेंबर २०२६ रोजी सादर केला. $१,९९९ पासून सुरू होणाऱ्या या प्रीमियम फोनने त्याच्या ...
क्रिएटर्स आणि व्यवसायांसाठी वेगळे प्लॅन्स
'मेटा वन' अंतर्गत क्रिएटर्स आणि व्यवसायांसाठी एकूण चार स्तरांमध्ये सबस्क्रिप्शन प्लॅन्स देण्यात आले आहेत.
Essential Plan ची सुरुवात ६३९ रुपये प्रति महिना अशी होते. यामध्ये सुधारित प्रोफाइल, व्हेरिफाईड बॅज, इंपर्सनेशनपासून संरक्षण आणि व्हॉट्सॲपवरील मेटा बिझनेस एजंटचा अधिक व्यापक वापर यांसारख्या सुविधा मिळतात.
Shehnaaz Gill Viral Video : काही दिवसांपूर्वीच ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्री जुई गडकरीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत विमान दुर्घटनेतून थोडक्यात बचावल्याची माहिती ...
यानंतर Advanced Plan असून त्याची सुरुवातीची किंमत २,०९९ रुपये प्रति महिना आहे. या प्लॅनमध्ये स्टोरीज शेड्युल करण्याची सुविधा, ऑर्गेनिक पोस्ट्स आणि रील्समध्ये लिंक्स जोडण्याचा पर्याय, एक्सपोर्ट करता येणारे अॅनालिटिक्स, अधिक सखोल ऑडियन्स इनसाइट्स आणि अतिरिक्त अकाउंट मॅनेजमेंट टूल्स उपलब्ध आहेत. (Meta One Subscription)
व्यवसाय आणि मोठ्या टीम्ससाठी मेटाने Expert आणि Max हे दोन उच्चस्तरीय प्लॅन्सही आणले आहेत. Expert Plan ची सुरुवात ६,३९९ रुपये प्रति महिना, तर Max Plan ची सुरुवात २०,९९० रुपये प्रति महिना होते. या योजनांमध्ये मेटा बिझनेस एजंटच्या अधिक प्रगत सुविधांसह वाढीव वापराची क्षमता देण्यात आली आहे. (Meta One Subscription)






