Simhastha Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकच्या ब्रँडिंगसाठी व्यापक आराखडा तयार करा; ब्रिजेश सिंह यांचे निर्देश

डिजिटल, सोशल मीडिया आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या माध्यमातून नाशिक-त्र्यंबकेश्वरची ओळख जागतिक स्तरावर पोहोचवण्यावर भर


नाशिक : पुढील वर्षी नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या माध्यमातून नाशिकची धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटनविषयक ओळख देशासह जागतिक पातळीवर पोहोचवण्यासाठी व्यापक माध्यम आराखडा तयार करावा, असे निर्देश माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी दिले. (Simhastha Kumbh Mela)


नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या सभागृहात माध्यम आराखड्यासंदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. संदीप कर्णिक, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक डॉ. किशोर गांगुर्डे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (Simhastha Kumbh Mela)




डिजिटल माध्यमांसह सोशल मीडिया मोहिमेवर भर


नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे १२ वर्षांनंतर कुंभमेळा होत असल्याने त्याचे प्रभावी जागतिक ब्रँडिंग करण्यासाठी पारंपरिक माध्यमांसोबतच डिजिटल, सोशल मीडिया आणि दृक्-श्राव्य माध्यमांचा समन्वयित वापर करावा, अशी सूचना ब्रिजेश सिंह यांनी केली.


कुंभमेळ्याची धार्मिक परंपरा, ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा, गोदावरी नदी आणि प्रमुख तीर्थस्थळांची माहिती देश-विदेशातील भाविक व पर्यटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नियोजनबद्ध प्रचारमोहीम राबवावी, असे त्यांनी सांगितले. (Simhastha Kumbh Mela)




नाशिकची स्वतंत्र पर्यटन ओळख निर्माण करण्यावर भर


कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक-त्र्यंबकेश्वरची स्वतंत्र पर्यटन ओळख निर्माण करण्यासाठी अध्यात्मिक स्थळे, स्थानिक कला-संस्कृती, खाद्यपरंपरा, वारसा स्थळे आणि पर्यटनस्थळांचे प्रभावी सादरीकरण करावे. विविध माध्यमांसाठी स्वतंत्र आशय तयार करून सोशल मीडिया मोहिमेचे सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. (Simhastha Kumbh Mela)


कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सुरू असलेल्या दीर्घकालीन पायाभूत सुविधांच्या विकासकामांची माहितीही नागरिकांपर्यंत पोहोचवावी. तसेच चुकीची माहिती आणि अफवांचे तातडीने खंडन करण्यासाठी प्रभावी यंत्रणा कार्यान्वित ठेवावी, असे सिंह यांनी स्पष्ट केले. (Simhastha Kumbh Mela)


कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी प्राधिकरणामार्फत सुरू असलेल्या विविध विकासकामांची माहिती दिली. बैठकीनंतर ब्रिजेश सिंह यांनी रामकुंड परिसराची पाहणी करून भाविकांसाठीच्या सुविधा, प्रमुख स्थळांचे माध्यमीय सादरीकरण आणि प्रसिद्धीच्या दृष्टीने आवश्यक बाबींचा आढावा घेतला. (Simhastha Kumbh Mela)


 

 
Comments
Add Comment

Devendra Fadnavis : नवोन्मेषाच्या बळावर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘टेक इन एशिया कॉन्फरन्स २०२६’मध्ये महाराष्ट्राच्या स्टार्टअप आणि इनोव्हेशन व्हिजनचे जागतिक व्यासपीठावर

Maharashtra Weather Update : १७ सप्टेंबरला राज्यात हवामानाचा मिश्र अंदाज; काही जिल्ह्यांत पाऊस तर विदर्भात कोरड्या वातावरणाची शक्यता

मुंबई : महाराष्ट्रात १७ सप्टेंबर रोजी हवामानात विभागनिहाय बदल जाणवण्याची शक्यता आहे. राज्यातील १९ जिल्ह्यांत

Nitesh Rane : गडचिरोलीच्या पर्यटनाला मिळणार नवी दिशा; सेमान्यात उभारणार अत्याधुनिक मत्स्यालय, नितेश राणेंचे निर्देश

मुंबई : गडचिरोली जिल्ह्यातील सेमाना येथे प्रस्तावित मत्स्यालयाची उभारणी अत्याधुनिक, नाविन्यपूर्ण आणि आकर्षक

Nitesh Rane : सिंधुदुर्गातील रखडलेले प्रकल्प तात्काळ मार्गी लावण्याचे मंत्री नितेश राणेंचे निर्देश

- वैद्यकीय महाविद्यालय, कणकवली बसस्थानकासह आरोग्य आणि मत्स्यविकासाच्या कामांचा आढावा - आमदार निलेश राणे आणि

Tukaram Mundhe : ११ रुपयांच्या सलाईन नळीची ३२५ रुपयांना विक्री, तुकाराम मुंढेंचे केंद्राला पत्र; ‘ट्रेड प्राइज’ आणि ‘एमआरपी’तील फरकावर नियमनाची शिफारस

मुंबई : रुग्णालयांमध्ये उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या वैद्यकीय साहित्याच्या किमती आणि त्यावर छापलेल्या कमाल

महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष वादाच्या भोवऱ्यात - १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी अबू सालेमची भेट घेतल्याचा विश्व हिंदू परिषदेचा दावा

मुंबई : महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी नाशिक मध्यवर्ती कारागृहात १९९३ च्या