मुंबई : सध्या ‘हनुमान अंश’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच चर्चा रंगवत आहे. त्यातच अभिनेता रणबीर कपूरची बहुप्रतीक्षित ‘रामायण’ फिल्मही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर प्रभू रामाच्या भूमिकेत, तर सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहे. आता या यादीत आणखी एका बॉलिवूड अभिनेत्याचे नाव जोडले जात असून, सलमान खानही एका पौराणिक व्यक्तिरेखेत दिसण्याची शक्यता आहे.
बॉलिवूडमध्ये ‘दबंग’ आणि ‘भाईजान’ म्हणून ओळखला जाणारा सलमान खान आपल्या कारकिर्दीत प्रामुख्याने ॲक्शन, रोमँटिक आणि दमदार भूमिका साकारताना दिसला आहे. मात्र, आता तो एका वेगळ्या आणि पौराणिक भूमिकेत प्रेक्षकांसमोर येण्याची चर्चा आहे. एकीकडे त्याचा वॉर चित्रपट ‘मातृभूमी’ सेन्सॉरशिपशी संबंधित अडचणी आणि प्रदर्शनाबाबतच्या अनिश्चिततेमुळे चर्चेत आहे. दुसरीकडे, दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्यासोबतच्या त्याच्या आगामी प्रोजेक्टचीही जोरदार चर्चा सुरू आहे. (Salman Khan)
Shehnaaz Gill Viral Video : काही दिवसांपूर्वीच ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्री जुई गडकरीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत विमान दुर्घटनेतून थोडक्यात बचावल्याची माहिती ...
सलमान साकारणार कर्णाची भूमिका?
एका विशेष वृत्तानुसार, सलमान खान राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या आगामी चित्रपटात महाभारतातील कर्णाची भूमिका साकारताना दिसू शकतो. या वृत्तानंतर सलमानच्या चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर या प्रोजेक्टबाबत उत्सुकता वाढली आहे. (Salman Khan)
यापूर्वी याच वर्षी जूनमध्ये ‘बॉलिवूड हंगामा’ने दिलेल्या वृत्तानुसार, राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी सलमान खानला एका चित्रपटाची पटकथा ऐकवली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, ही कथा सलमानला इतकी आवडली की त्याने कथानक ऐकल्यानंतर या प्रोजेक्टला तात्काळ होकार दिला. (Salman Khan)
सलमान आणि राकेश ओमप्रकाश मेहरा पहिल्यांदाच एकत्र
या प्रोजेक्टच्या निमित्ताने सलमान खान आणि राकेश ओमप्रकाश मेहरा पहिल्यांदाच एकत्र काम करणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या जोडीच्या आगामी चित्रपटाकडेही प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
या चित्रपटाची निर्मिती फरहान अख्तरच्या ‘एक्सेल एंटरटेनमेंट’ या निर्मिती संस्थेअंतर्गत केली जाणार असल्याची माहिती आहे. मात्र, चित्रपटाच्या कथानकाबाबत निर्मात्यांकडून अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. (Salman Khan)
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान मंगळवारी भाऊ सोहेल खानच्या घरी गणपती विसर्जनासाठी कुटुंबीयांसह पोहोचला. खान कुटुंबीयांनी मोठ्या उत्साहात गणपती ...
महाभारतावर आधारित चित्रपट की आधुनिक कथा?
दरम्यान, सलमान खान कर्णाच्या भूमिकेत दिसणार असल्याच्या चर्चेनंतर सोशल मीडियावर चित्रपटाच्या कथेबाबत विविध तर्कवितर्क सुरू झाले आहेत. हा चित्रपट महाभारताच्या मूळ कथेवर आधारित असेल की या पौराणिक कथेला आधुनिक काळाच्या पार्श्वभूमीवर नव्या पद्धतीने मांडले जाईल, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
निर्मात्यांनी चित्रपटाची कथा, पात्रांची रचना किंवा इतर तपशील अधिकृतपणे जाहीर केलेले नाहीत. त्यामुळे या प्रोजेक्टबाबतची अधिकृत घोषणा आणि पुढील अपडेट्सची प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे. मात्र, सलमान खान आणि राकेश ओमप्रकाश मेहरा यांची जोडी तसेच कर्णासारखी महत्त्वाची पौराणिक व्यक्तिरेखा यामुळे हा प्रोजेक्ट सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. (Salman Khan)




