मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान मंगळवारी भाऊ सोहेल खानच्या घरी गणपती विसर्जनासाठी कुटुंबीयांसह पोहोचला. खान कुटुंबीयांनी मोठ्या उत्साहात गणपती बाप्पाला निरोप दिला. यावेळी सलमानची कथित प्रेयसी युलिया वंतूरही उपस्थित होती. या सोहळ्यातील अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहेत. मात्र, सलमान आणि त्याची बहीण अर्पिता खान यांच्यातील एक खास क्षण चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. ( Salman Khan Ganpati)
गणपती विसर्जनापूर्वी सलमान खानने कुटुंबीयांसोबत आरती केली. यावेळी आरती करताना त्याच्याकडून पद्धतीत थोडी चूक झाली. ही बाब अर्पिताच्या लक्षात आली. तिने आरतीच्या गोंधळात भावाला हाक मारून त्याची चूक सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोठ्या आवाजामुळे सलमानला तिचे बोलणे ऐकू आले नाही. त्यानंतर अर्पिताने स्वतः पुढे येत सलमानची आरती करण्याची पद्धत योग्य केली. (Ganpati)
Maharashtra weather : महाराष्ट्रात सप्टेंबरच्या मध्यातही पावसाची उघडीप कायम असल्याचे चित्र आहे. मागील काही दिवस बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ...
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
अर्पिताने सांगितल्यानंतर सलमाननेही हसत तिचे म्हणणे स्वीकारले. आरतीनंतर तो आपल्या भाचीला आरती करण्याची योग्य पद्धत समजावताना दिसला. या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, सलमान आणि अर्पिताच्या नात्याबद्दल चाहते प्रतिक्रिया देत आहेत.
या सोहळ्यात युलिया वंतूरनेही आरती केली. सलमानने प्रिंटेड जीन्स, काळा टी-शर्ट, जॅकेट आणि काळी बीनी असा कॅज्युअल लूक केला होता. तर युलिया पिवळ्या रंगाच्या अनारकली ड्रेसमध्ये दिसली.
सोहेल खानच्या इमारतीच्या परिसरात गणपती विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती. यासाठी मोठी पाण्याची टाकी उभारण्यात आली होती. अरबाज खानचा मुलगा अरहान खान यानेही गणपती विसर्जनात सहभाग घेतला. याशिवाय खान कुटुंबीयांचे काही मित्रही या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
दरम्यान, सलमान खानच्या आगामी चित्रपटांचीही चर्चा सुरू आहे. तो अपूर्व लाखिया दिग्दर्शित 'मातृभूमी' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात चित्रांगदा सिंगही महत्त्वाच्या भूमिकेत आहे. याशिवाय सलमानचा आणखी एक चित्रपट दिग्दर्शक वामशी पैडीपल्ली यांच्यासोबत असून, या चित्रपटात नयनतारा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 2027 च्या ईदला प्रदर्शित होण्याची घोषणा करण्यात आली आहे. ( Entertainment News)






