Mumbai Filmcity News: फिल्मसिटीमध्ये मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते विविध उपक्रमांचे लोकार्पण

मुंबई: मुंबईतील गोरेगावमध्ये फिल्म सिटी अर्थात चित्रनगरी आहे. या चित्रनगरीमध्ये मराठीसह हिंदी भाषेतील मालिकांची आणि चित्रपटांची इथे शुटिंग केली जाते. या चित्रनगरीची खरी ओळख ‘दादासाहेब फाळके चित्रनगरी’ म्हणून आहे. प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणाऱ्या कलाकारांसाठी महाराष्ट्र राज्य सरकारने अनेक महत्त्वाच्या सुविधांच्या घोषणा केल्या आहेत. सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते चित्रनगरीत विविध उपक्रमांचे लोकार्पण करण्यात आले.

महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने आयोजित ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत विविध लोकसेवा आणि सांस्कृतिक उपक्रमांचे लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाला फिल्मसिटी व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, सहव्यवस्थापक प्रशांत साजणीकर, एनजीएमएच्या संचालक निधी चौधरी त्याचबरोबर मराठीसह बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक कलाकार, तंत्रज्ञ, गायक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी चित्रनगरीतील स्टुडिओ क्रमांक एकचे मंत्री शेलार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.



दर्जेदार पायाभूत सुविधांमुळे कलाकार, निर्माते आणि तंत्रज्ञांना शुटिंग आणि निर्मितीसाठी अधिक सुविधा मिळणार असून चित्रनगरीला ‘आधुनिक निर्मिती केंद्र’ म्हणून विकसित करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे मंत्री शेलार यांनी सांगितले. मंत्री शेलार यांच्या उपस्थितीत कलाकार, तंत्रज्ञ आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी ‘डॉक्टर्स फॉर यू’च्या माध्यमातून दोन नव्या रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या. यापूर्वी चित्रनगरीमध्ये एकच रूग्णवाहिका उपलब्ध होती, पण आता चित्रनगरीत तीन रुग्णवाहिका उपलब्ध असणार आहेत. शिवाय, चित्रनगरीमध्ये येणाऱ्या तंत्रज्ञ, निर्मिती संस्थांचे कर्मचारी आणि संबंधित मनुष्यबळासाठी विनामूल्य बससेवा सुरू करण्यात आली आहे.

चित्रनगरीतील अग्निसुरक्षा अधिक सक्षम करण्यासाठी अत्याधुनिक अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. तीन टप्प्यांत उभारलेल्या या यंत्रणेत प्रत्येक टप्प्यासाठी १५ लाख लिटर क्षमतेची अग्निशमन पाणी साठवण टाकी आणि स्वतंत्र फायर पंप प्रणाली आहे. अत्याधुनिक अग्निशमन यंत्रणेमुळे १५ स्टुडिओंसह प्रशासकीय इमारत, हेलिपॅड, खंडाळा घाट आणि व्यवस्थापकीय संचालकांच्या निवासस्थान परिसराची अग्निसुरक्षा अधिक सक्षम झाली आहे. अंतिम अग्निशमन ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त करणारी महाराष्ट्र शासनाची पहिली शासकीय मालमत्ता म्हणून चित्रनगरीने महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. नूतन समिती कक्षाचेही मंत्री शेलार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

 



‘दादासाहेब फाळके चित्रनगरी’ केवळ मालिकांच्या आणि चित्रपटांच्या चित्रीकरणाचे ठिकाण नसून महाराष्ट्राच्या कला आणि संस्कृतीची कर्मभूमी आहे. कलाकारांसाठी अधिक सुविधा, तंत्रज्ञांसाठी नव्या संधी आणि तरूणांसाठी आधुनिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. तरूणांना डिजिटल माध्यमातून कला सादरीकरणाची संधी मिळावी यासाठी रील स्पर्धा आणि रील व्यवसाय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे, अशी प्रतिक्रिया सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी दिली. नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट आणि चित्रनगरीच्या संयुक्त विद्यमाने ‘लेन्स अँड लेगसी: बॉलिवूडचा दृक्-प्रवास’ या विशेष छायाचित्र प्रदर्शनाचे मंत्री शेलार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासाचा प्रवास दुर्मिळ छायाचित्रे, पोस्टर्स आणि अभिलेखीय साहित्याच्या माध्यमातून मांडण्यात आला आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त बोलताना सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. शेलार यांनी सांगितले की, प्रधानमंत्री वाढदिवस साजरा करण्याऐवजी ‘सेवा संकल्प’ घेऊन समाजासाठी काम करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार जनसेवा, कर्मचारी सेवा आणि सांस्कृतिक क्षेत्राच्या उत्थानासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या निमित्ताने नागरिकांनीही सेवा भावाची भावना जोपासत देशाच्या विकासासाठी योगदान द्यावे. विकसित भारताच्या संकल्पपूर्तीसाठी प्रत्येकाने आपापल्या परीने योगदान देण्याचा दृढनिश्चय करावा, असे आवाहनही ॲड. शेलार यांनी केले.

Comments
Add Comment

Ahilyanagar News: नगरकरांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले, यंदा सरकारी कॉलेज सुरू होणार

अहिल्यानगर: अहिल्यानगरमध्ये सरकारी वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, हे नगरकरांचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरले

Nitesh Rane On Uddhav Thackeray: "आधी अंगावर लागलेला डाग पुसा, मग...", दिशा सालियन प्रकरणावरून मंत्री नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

मुंबई: मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगरमध्ये राजकीय दौरा काढणाऱ्या उद्धव

Nandurbar News : दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीची आश्रमशाळेत आत्महत्या

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अक्राणी येथील अनुदानित

Pune MHADA Lottery 2026: घर खरेदी करणार्‍यांसाठी आनंदाची बातमी, म्हाडाच्या 4462 घरांच्या लॉटरीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

पुणे: पुण्यामध्ये म्हाडाचं घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. म्हाडाच्या पुणे

Beed Pune direct train : ऐतिहासिक क्षण! बीड-पुणे थेट रेल्वेसेवेचा दिमाखदार शुभारंभ; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते विविध विकासप्रकल्पांचेही भूमिपूजन

बीड :

Sanjay Lathkar : मराठमोळे अधिकारी संजय लाठकर यांची अणुऊर्जा विभागाच्या महासंचालकपदी नियुक्ती

मुंबई : मराठवाड्यातील संजय आनंदराव लाठकर यांच्यावर देशाच्या अणुऊर्जा क्षेत्राशी संबंधित सुरक्षेची महत्त्वाची