मुंबई : पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते खासदार पार्थ पवार यांना आरोपी करण्यात यावे, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. आरटीआय कार्यकर्ते आणि भारत अगेंस्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी ही याचिका दाखल केली असून, तक्रारी करूनही पार्थ पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. राजकीय प्रभावामुळे पोलिसांकडून त्यांना या प्रकरणात आरोपी करण्यात आले नसल्याचा आरोपही याचिकेत करण्यात आला आहे.(Mundhwa Land Scam)
होबार्ट: ऑस्ट्रेलियन क्रिकेट जगतातून एक मोठी बातमी समोर येत आहे. ऑस्ट्रेलियाचा अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज मॅथ्यू वेडने बिग बॅश लीग (बीबीएल) क्रिकेटमधून ...
मुंढवा पोलीस ठाणे तसेच पुणे पोलीस आयुक्तांकडे तक्रारी करूनही अपेक्षित कारवाई झाली नसल्याचे पाटील यांनी याचिकेत म्हटले आहे. अमेडिया एंटरप्रायझेसमधील पार्थ पवार यांच्या कथित भागीदारीचा मुद्दाही याचिकेत उपस्थित करण्यात आला आहे. कंपनीमध्ये एक टक्के भागीदारी असलेल्या व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे; मग पार्थ पवार यांना आरोपी का करण्यात आले नाही, असा सवाल याचिकाकर्त्यांनी केला आहे.(Mundhwa Land Scam Parth Pawar)
मुंढवा येथील जमीन व्यवहाराबाबत याचिकेत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. सुमारे १ हजार ८०० कोटी रुपये बाजारमूल्य असल्याचा दावा केलेली जमीन अवघ्या ३०० कोटी रुपयांना खरेदी करण्यात आल्याचे याचिकेत म्हटले आहे. तसेच या व्यवहारासाठी सुमारे २१ कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी माफ करून अवघे ५०० रुपये शुल्क भरल्याचा दावाही करण्यात आला आहे. उद्योग संचालनालयाने अवघ्या ४८ तासांत स्टॅम्प ड्युटी माफ केल्याचा उल्लेख याचिकेत करण्यात आला आहे.(Mundhwa Land Scam Parth Pawar)
Jalgaon Gold Silver Rate : गणेशोत्सवाच्या काळात जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेत सोन्या-चांदीच्या दरात मोठी चढ-उतार पाहायला मिळत आहे. सलग दोन दिवस दरवाढ झाल्यानंतर ...
२०२५ मध्ये पार्थ पवार यांच्याशी संबंधित व्यक्तींची भागीदारी असलेल्या अमेडिया एंटरप्रायझेसला ही जमीन विकण्यात आल्याचा आरोप याचिकेत आहे. या प्रकरणातील कथित मुख्य सूत्रधार शीतल तेजवानी यांची पुणे पोलिसांनी दोन वेळा चौकशी केली आहे. मात्र पार्थ पवार यांना आरोपी का करण्यात आले नाही, याबाबत पोलीस महासंचालकांकडून उत्तर मागवावे, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.(Mundhwa Land Scam Parth Pawar)






