Monday, November 2, 2026

शेअर बाजाराचा 'टर्निंग पॉईंट'! एका बातमीने बाजारातील मरगळ झटकली, नेमकं काय घडलं?

गेल्या काही महिन्यात शेअर बाजारात प्रचंड मंदीचं वातावरण होतं. या वर्षी विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर्समधून जवळपास 2.94 लाख कोटीची विक्री केल्यामुळे बाजारात घसरण होत आहे. पण एका बातमीने उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे.

शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांची एका दिवसात चांदी झाली. कारण सोमवारचा दिवस शेअर बाजारासाठी महत्त्वाचा ठरला. कारण या महिन्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्सने 1233 अंकांची उसळी घेतली आणि हे चित्र बऱ्याच दिवसांनी पाहायला मिळालं. शेअर बाजार दिवसाचा शेवटी 75692.78 अंकांवर बंद झाला. या अचानक आलेल्या तेजीमुळे गुंतवणूकदारांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. जागतिक सकारात्मक वातावरण आणि देशांतर्गत कंपन्यांच्या चांगल्या निकालामुळे बाजारात तेजी आल्याचं काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे. असं असलं तरी एका बातमीमुळे बाजारात सकारात्मक वातावरण तयार झाल्याचं बोललं जात आहे. रिपोर्टनुसार, सेबीने सरकारला एक महत्त्वाचा प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावात सेबीने विदेशी गुंतवणूकदारांवरील दीर्घकालीन भांडवली नफा कर पूर्णपणे रद्द करण्याची शिफारस केली आहे. फेब्रुवारी महिन्यात आगामी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.या आधी हा प्रस्ताव आल्याने गुंतवणूकदारांनी ही जमेची बाजू असल्याचं सांगितलं आहे. पण सेबीने फक्त प्रस्ताव पाठवला असून त्यावर काय निर्णय होतो? हे देखील महत्त्वाचं आहे.

विदेशी गुंतवणूकदारांनी पैसे काढल्याने दबाव

गेल्या काही वर्षात विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून विक्रमी पैसे काढू घेतले आहेत. त्यामुळे भारतीय शेअर बाजारावर दबाव वाढत गेला. विदेशी गुंतवणूकदारांनी बाजारात अंदाजे 2.94 लाख कोटी रुपयांचे शेअर्स विकले आणि पैसे काढून घेतले. त्यामुळे बाजारात मोठी घसरण होत गेली. विदेशी गुंतवणूकदारांसोबत सेबीने अनेक बैठका घेतल्या. या बैठकीत गुंतवणूकदारांनी भारताची सध्याची करप्रणाली सोपी आणि उदार करण्याची शिफारस केली होती. त्यामुळे हा प्रस्ताव महत्त्वाचा असल्याचं बोललं जात आहे.
सध्याच्या नियमानुसार, एका वर्षापेक्षा जास्त काळ ठेवलेल्या शेअर्सवरील दीर्घकालीन भांडवली नफ्यावर 12.5 टक्क्यांनी कर आकारला जातो. अल्पकालीन भांडवली नफ्यावर 20 टक्के कर आहे. या शिवाय सिक्युरिटीज ट्रान्जेक्शन टॅक्स आणि डिविडेंडवरही विदहोल्डिग करही द्यावा लागत आहे. त्यामुळे सरकारने सेबीने दिलेला प्रस्ताव मान्य केला तर भारतीय शेअर बाजाराला एक संजीवनी मिळेल. आता येत्या अर्थसंकल्पात काय होते? याकडे गुंतवणूकदारांचं लक्ष लागून आहे. turning point for the stock market A single piece of news shook off the markets lethargy what exactly happened
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >