Sanjay Lathkar : मराठमोळे अधिकारी संजय लाठकर यांची अणुऊर्जा विभागाच्या महासंचालकपदी नियुक्ती

मुंबई : मराठवाड्यातील संजय आनंदराव लाठकर यांच्यावर देशाच्या अणुऊर्जा क्षेत्राशी संबंधित सुरक्षेची महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. लातूरचे माजी पोलीस अधीक्षक आणि नांदेडचे रहिवासी असलेल्या लाठकर यांची केंद्र सरकारच्या अखत्यारीतील अणुऊर्जा विभागाच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. देशातील अणुऊर्जा केंद्रे, संबंधित संस्था तसेच किरणोत्सारी पदार्थांच्या साठ्यांच्या सुरक्षेचे व्यवस्थापन त्यांच्या अखत्यारीत राहणार आहे.


लाठकर यांच्या नेतृत्वाखाली देशभरातील ५०हून अधिक अणुऊर्जा केंद्रे आणि संबंधित संस्थांच्या सुरक्षेशी निगडित व्यवस्था तसेच युरेनियमसारख्या किरणोत्सारी पदार्थांच्या साठ्यांच्या सुरक्षेशी संबंधित जबाबदाऱ्या पार पाडल्या जाणार आहेत. मराठवाड्यातील अधिकाऱ्याला प्रथमच या पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळाली आहे.



संजय लाठकर हे १९९५च्या तुकडीचे झारखंड केडरचे भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी आहेत. प्रदीर्घ सेवाकाळात त्यांनी महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. मराठवाड्यात त्यांनी लातूर आणि परभणीचे पोलीस अधीक्षक म्हणून काम केले. त्यानंतर पुण्यात अप्पर पोलीस आयुक्त म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली. महाराष्ट्रातील दहशतवादविरोधी पथकात पोलिस उपमहानिरीक्षक म्हणूनही त्यांनी काम केले आहे.


गडचिरोली, मुंबई तसेच झारखंडमध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या उपमहानिरीक्षकपदाची जबाबदारीही लाठकर यांनी सांभाळली आहे. कर्नाटक, हैदराबाद, राजस्थान आणि मध्य प्रदेशातील केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या प्रमुखपदाची जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे.


लाठकर यांच्या सेवाकाळातील कामगिरीची दखल विविध स्तरांवर घेण्यात आली आहे. त्यांना राष्ट्रपतींची तीन आणि केंद्रीय गृहमंत्र्यांची तीन पदके मिळाली आहेत. महाराष्ट्र, बिहार आणि झारखंडच्या मुख्यमंत्र्यांकडूनही त्यांना एकूण ११ पदके मिळाली आहेत. महाराष्ट्र शासनाच्या तंटामुक्त गाव मोहिमेसह अल्पसंख्याक विभागाशी संबंधित कामासाठी त्यांना राज्यस्तरीय पुरस्कारही मिळाले आहेत. सेवाकाळात त्यांना एकूण ११ पदके आणि तीन राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत.

Comments
Add Comment

केंद्र सरकारकडून पुणेकरांना दिवाळी गिफ्ट, 21,800 कोटी रुपयांच्या मेट्रो प्रकल्पाची पायाभरणी आणि उद्घाटन

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या (3 नोव्हेंबर- मंगळवार) दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास, व्हिडिओ

दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! मृद व जलसंधारण कामांसाठी समितीची स्थापना

मुंबई: राज्यामध्ये सध्या दुष्काळजन्य परिस्थिती ओढावली आहे. राज्य सरकारकडून दोन टप्प्यांमध्ये दुष्काळ जाहीर

Pune Metro : पुणेकरांसाठी मोठा दिलासा! उद्या पंतप्रधान मोदींच्या हस्ते २१,८०० कोटींच्या मेट्रो प्रकल्पांचे उद्घाटन

हिंजवडी ते शिवाजीनगर ‘पिंक लाईन’ प्रवाशांच्या सेवेत होणार दाखल पुणे : पुणे शहराच्या नागरी

Central Railway News: प्रवाशांनो कृपया लक्ष द्या... मध्य रेल्वेने 'या' दोन लांबपल्ल्यांच्या मेल/एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात केला बदल

मुंबई: मध्य रेल्वेने लांब पल्ल्यांच्या मेल- एक्स्प्रेसबद्दल एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांनो जर

अतिवृष्टी व पूरबाधित शेतकऱ्यांना 291 कोटींची मदत, मदत- पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांची माहिती

मुंबई: यंदाच्या वर्षी राज्य सरकारने जून ते ऑगस्ट महिन्यामध्ये, अतिवृष्टी आणि पुरबाधित शेतकऱ्यांना किती कोटींची

मत्स्यव्यवसाय विभागाच्या 24 योजनांचा लाभ आता ऑनलाइन; मंत्री नितेश राणेंचे आवाहन

राज्यातील सर्व मत्स्यकास्तकार, मच्छीमार, मत्स्यव्यावसायिक आणि मच्छीमार संस्थांनी महाडीबीटी 2.0 (https://mahadbt2.maharashtra.gov.in/)