मुंबई : धुरंधरमधला थरार, गुप्त मिशन्स आणि शत्रूविरोधात खेळले जाणारे बौद्धिक खेळ आवडले असतील, तर ओटीटीवरील ‘तेहरान’ ही स्पाय-थ्रिलर सीरिज तुमचं लक्ष वेधून घेऊ शकते. इथे लढाई फक्त बंदुकीच्या गोळ्यांनी होत नाही, तर एका कम्प्युटर कोडच्या शिताफीपासून सुरू होत, देशांच्या सुरक्षेला हादरा देणारा खेळ! हॅकिंग, हेरगिरी, गुप्त कारवाया आणि सतत बदलणाऱ्या परिस्थितींमुळे ‘तेहरान’ची कथा सुरुवातीपासूनच सस्पेन्स कायम ठेवते. (Spy Thriller Series)
मुंबई: मराठी फिल्म इंडस्ट्रीसाठी अभिमानाची बातमी समोर येत आहे. २०२५ मध्ये रिलीज झालेला संतोष डावखर दिग्दर्शित 'गोंधळ' चित्रपटाची (Gondhal Movie) ऑस्कर 2027च्या ...
काय आहे ‘तेहरान’ची कथा?
सीरिजची मुख्य व्यक्तिरेखा तामार राबिनयान ही इस्रायलची गुप्तहेर संस्था मोसादशी संबंधित हॅकर आहे. इराणमध्ये जन्मलेली आणि इस्रायलमध्ये वाढलेली तामार एका अत्यंत गुप्त मोहिमेसाठी तेहरानमध्ये प्रवेश करते. इराणच्या अणुकार्यक्रमाशी संबंधित यंत्रणेत सायबर हस्तक्षेप करून ती मोहीम यशस्वी करण्याचे तिचे उद्दिष्ट असते. (Spy Thriller Series)
मात्र, मिशन जसजसे पुढे जाते तसतशी परिस्थिती तिच्या नियंत्रणाबाहेर जाते. शत्रूच्या भूमीत अडकलेली तामार स्वतःचा बचाव करताना अनेक धोकादायक परिस्थितींना सामोरी जाते.
‘दे धक्का 2’मधील बाप-लेकीची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर! मुंबई : बाप-लेकीचं नातं, मुलीच्या स्वप्नांसाठी वडिलांची धडपड आणि त्या नात्यातील भावनिक ...
कोडपासून गुप्तहेरगिरीपर्यंत थरार
‘तेहरान’चं वैशिष्ट्य म्हणजे सायबर हॅकिंग आणि पारंपरिक हेरगिरीचा संगम. एका संगणकीय प्रणालीमध्ये केलेला छोटासा बदल किती मोठा परिणाम घडवू शकतो, हे मालिकेत दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे तंत्रज्ञान आणि मानवी बुद्धिमत्तेभोवती निर्माण होणारा सस्पेन्स कथेला वेग देतो. (Spy Thriller Series)
ग्लेन क्लोज आणि ह्यू लॉरी यांची एन्ट्री
सीरिजच्या दुसऱ्या सीझनमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री ग्लेन क्लोज सहभागी झाल्या, तर तिसऱ्या सीझनमध्ये ह्यू लॉरी दिसतात. त्यांच्या सहभागामुळे मालिकेच्या कथानकाला आणखी मोठा आंतरराष्ट्रीय स्तर मिळाला आहे. (Spy Thriller Series)
Diler Kharkiya : हरियाणवी गायक आणि अभिनेता दिलेर खरकियाच्या रेंज रोव्हरवर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. भिवानीतील त्याच्या घराजवळ उभ्या असलेल्या कारला ...
तीन सीझन्समध्ये वाढत जातो थरार
आतापर्यंत ‘तेहरान’चे तीन सीझन्स प्रदर्शित झाले आहेत. पहिल्या सीझनमध्ये तामार तेहरानमध्ये गुप्त मोहिमेवर जाते. दुसऱ्या सीझनमध्ये एका अडकलेल्या वैमानिकाला वाचवण्याची धोकादायक मोहीम समोर येते. तर तिसऱ्या सीझनमध्ये तामार स्वतःच्या एजन्सीपासून वेगळी पडते आणि इराणी लष्कराच्या दबावात स्वतःचा बचाव करण्यासाठी संघर्ष करते. (Spy Thriller Series)
विशेष म्हणजे, ‘तेहरान’ने ४९व्या आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारमध्ये सर्वोत्कृष्ट नाट्यमालिका (Best Drama Series) चा पुरस्कार पटकावला आहे. त्यामुळे स्पाय-थ्रिलर आणि सस्पेन्सचा अनुभव घेऊ इच्छिणाऱ्या प्रेक्षकांसाठी ही सीरिज चर्चेतील पर्याय ठरली आहे. (Spy Thriller Series)



