Friday, September 18, 2026

Deepika Padukone Ranveer Singh siddhivinayak : दुसऱ्या बाळाच्या स्वागतापूर्वी 'दीपवीर' सिद्धिविनायकाच्या चरणी; दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंहने कुटुंबासह घेतले बाप्पाचे आशीर्वाद

Deepika Padukone Ranveer Singh siddhivinayak : दुसऱ्या बाळाच्या स्वागतापूर्वी 'दीपवीर' सिद्धिविनायकाच्या चरणी; दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंहने कुटुंबासह घेतले बाप्पाचे आशीर्वाद

बॉलीवूडचे लाडके जोडपे दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंह (Ranveeer Singh) लवकरच आपल्या दुसऱ्या बाळाचे या जगात स्वागत करणार आहेत. या आनंदाच्या प्रसंगापूर्वी, शुक्रवारी (१८ सप्टेंबर २०२६) या जोडीने मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आणि आशीर्वाद मागितले. कुटुंबात नव्या चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होण्याआधी सिद्धिविनायकाच्या दरबारात नतमस्तक होण्याची आपली खास परंपरा त्यांनी यंदाही आवर्जून जपली आहे.

बाप्पाच्या दर्शनाची परंपरा पुन्हा जपली

दीपिका आणि रणवीर शुक्रवारी सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाच्या चरणी लीन झालेले पाहायला मिळाले. डिलिव्हरीच्या काही दिवस आधी मंदिरात जाणे ही या स्टार कपलची एक गोड सवय बनली आहे. याआधी सप्टेंबर २०२४ मध्ये आपली पहिली मुलगी 'दुआ' हिच्या जन्माच्या अवघ्या दोन दिवस आधी, म्हणजेच ६ सप्टेंबर रोजी त्यांनी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले होते. त्यानंतर लगेचच त्यांनी मुलगी झाल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती.

कडक सुरक्षेत कुटुंबासह घेतले दर्शन

 
View this post on Instagram
 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

या धार्मिक प्रसंगी रणवीरचे आई-वडील, अंजू आणि जगजीत सिंह भवनानी हेसुद्धा त्यांच्यासोबत उपस्थित होते. सध्या गणेशोत्सवाचा काळ असल्याने मंदिरात भाविकांची अथांग गर्दी पाहायला मिळत आहे. ही गर्दी लक्षात घेता, अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्थेत या कुटुंबाला मंदिरात आणण्यात आणि बाहेर नेण्यात आले. गेल्या वेळचा अनुभव पाहता, आता अवघ्या काही दिवसांतच दीपिका-रणवीरच्या दुसऱ्या बाळाच्या आगमनाची खूशखबर चाहत्यांना मिळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

रणवीरने घेतले 'लालबागच्या राजा'चेही आशीर्वाद

सिद्धिविनायक मंदिराच्या दर्शनाआधी, गुरुवारी (१७ सप्टेंबर) संध्याकाळी रणवीर सिंहने मुंबईतील प्रसिद्ध 'लालबागचा राजा'च्या दरबारात हजेरी लावली होती. यावेळी पांढऱ्या रंगाच्या पारंपरिक कुर्त्या-पायजमामध्ये आलेल्या रणवीरने आपल्या गाडीतूनच चाहत्यांना नमस्कार करत प्रेमाचा स्वीकार केला होता.

एप्रिल महिन्यात दिली होती गरोदरपणाची बातमी

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांनी १९ एप्रिल २०२६ रोजी आपल्या दुसऱ्या गरोदरपणाची अधिकृत घोषणा केली होती. त्यांनी मुलगी 'दुआ' हिचा एक अत्यंत गोंडस फोटो शेअर करत ही खूशखबर चाहत्यांना दिली. "बाळ दुआ आणि आमचे हृदय आणखी मोठे होत आहे!" असे सुंदर कॅप्शन त्यांनी या फोटोला दिले होते. सप्टेंबर २०२४ मध्ये मुलगी झाल्यानंतर आता सप्टेंबर २०२६ मध्ये हे दांपत्य दुसऱ्यांदा आई-बाबा होणार असून, काही दिवसांपूर्वीच त्यांनी केलेल्या मॅटर्निटी फोटोशूटचे फोटोही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >